-
Vavtal Peral Tar Vadalach Ugvel
प्राचीन काळात व्यापारी उद्देशाने सौदागरांचे तांडे देशीविदेशीचा भूगोल पालथा घालत. या तांड्यांबरोबर नट, नर्तक, वैदू, हेर, चोर असे घटकही सोबत जात. क्वचित परक्या भूगोलावर गुन्हेगारी धुडगूस घालत. आजचे भूराजकारण असेच काहीसे आहे. पृथ्वीवरील खनिजसंपत्ती आणि ती वाहून नेण्याचे व्यापारी मार्ग हे फक्त युरोप-अमेरिकेच्या ताब्यात हवेत, ही आजची अटीतटी मोठी आहे. त्यासाठी पाश्चात्त्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रलॉबी हातात हात घालून काम करतात. व्यापारी मार्गांवरील देशांना मांडलिक बनवण्याच्या नादात युद्धाचे वणवे पेटवून देतात. मध्यपूर्वेतील अशा युद्धकहाराची ही गोष्ट!
-
Thakare Viruddha Thakare (ठाकरे विरुद्ध ठाकरे)
‘ठाकरे’ म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले घराणे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. ‘शिवसेना’ स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दरारा असलेले नाव. पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत ‘शिवसेने’त फूट पडली अन् ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ जन्माला आली. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले ! दोन सेना. दोन सेनापती. काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ? महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध
-
Palvi (पालवी)
पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला तो. बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणीचा जिव्हाळा, काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली. तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता. br>अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन.
-
Raavan Aryavartacha Shatru (रावण आर्यावर्ताचा शत्र
अंधार नसेल, तर प्रकाशाला काही हेतूच उरत नाही. खलनायक नसेल, तर देवांचे काम काय? भारत, ख्रि.पू. ३४०० हाहाकार, दारिद्र्य आणि गोंधळ यांनी ग्रासलेला देश. बहुतांश लोक चुपचाप सहन करणारे. काही बंड करतात. काही अधिक चांगल्या जगासाठी लढा देतात, काही स्वतःसाठी लढतात. काही कशाचीच पर्वा करत नाहीत. रावण, त्या काळातील अत्यंत ख्यातनाम पित्याचा पुत्र. देवांकडून सर्वोच्च बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेला. नशिबाकडून टोकाच्या परिस्थितींमध्ये परीक्षा देण्याचा शाप मिळालेला. किशोरवयात भयावह जलदस्यू म्हणून त्याच्यात धैर्य, क्रौर्य आणि भयंकर निश्चय यांचं मिश्रण आहे. मानवांमधील दैत्य होण्याचा निश्चय; आपल्या हक्काची महानता जिंकण्याचा, लुटण्याचा, बळकावण्याचा निश्चय. अमानुष हिंसा आणि प्रकांड विद्वत्ता अशा विरोधाभासाचा पुरुष. कोणत्याही प्रतिफलाशिवाय प्रेम करणारा आणि कोणत्याही अनुतापाशिवाय हत्या करणारा पुरुष. राम चंद्र मालिकेतील हे तिसरं उल्हसित करणारं पुस्तक लंकापती रावणावर प्रकाश टाकतं. आणि हा प्रकाश सर्वांत काळ्याकुट्ट अंधारात चमकून दिसतो. तो इतिहासातील सर्वांत महान खलपुरुष आहे, की केवळ सर्वकालच्या काळोखातील एक मनुष्य आहे? एका अत्यंत गुंतागुंतीच्या, हिंसक, उत्कट आणि सर्वकालीन यशस्वी पुरुषाचं महाकाव्य वाचा.