-
Devil's Advocate (डेव्हिल्स अॅडव्होकेट)
या पुस्तकामध्ये करण यांनी त्यांचं बालपण, डून स्कूलमधील शालेय जीवन, नेहरू-गांधी घराण्याशी असलेली जवळीक आणि तारुण्यामध्ये फुललेली प्रेमकथा अशा अनेक व्यक्तिगत आठवणी शब्दांकित केल्या आहेत. न्यूज चॅनेलवर होणार्या मुलाखतींच्या कार्यक्रमांमुळे करण थापर मुख्यत: ओळखले जातात. पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, जयललिता, परवेज मुशर्रफ, बराक ओबामा, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदी ही त्या मुलाखतींची काही प्रातिनिधिक उदाहरणं. करण यांच्या गाजलेल्या मुलाखती, त्या वेळी पडद्यामागे घडलेल्या अनपेक्षित घटना हा या पुस्तकातील महत्त्वाचा भाग आहे. एका पत्रकारानं त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांचा, सुख-दु:खाच्या क्षणांचा रिपोर्ताज वाचकांसमोर सादर केला आहे. तो वाचताना आपण त्याच्याशी समरस होतो. त्यामध्ये रमून जातो.
-
Antaral Spardha (अंतराळ स्पर्धा)
अंतराळाकडे कुतूहलानं बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असं वाटायला लागलं आणि एक नवं युग सुरू झालं. यासाठीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच अद्भुत आहे. या सगळ्याची निर्मिती कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन यांच्यासारख्या महामानवांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालल्यामुळे साध्य झाली असली तरी तिचा कळस विसाव्या शतकाच्या मध्यावर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महासत्तांमध्ये एकमेकांवर हरप्रकारे कुरघोडी करण्यासाठीची रस्सीखेच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकमत गाजवण्याचा होता. कहर म्हणजे हिटलरच्या नाझी राजवटीत यासाठीच्या तंत्रज्ञानाची पाळंमुळं रचली गेली, हे ऐकून आपण सर्दच होऊ. अंतराळामध्ये प्रथम जाण्यासंबंधीच्या या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक, भारावून सोडणारी आणि वेगळ्याच विश्वात नेणारी कहाणी म्हणजे `अंतराळ स्पर्धा`! फॉन ब्राऊन आणि कोरेलियॉव्ह हे दोघे विलक्षण हुशार आणि अफाट जिद्दीचे तंत्रज्ञ या शर्यतीमधले मुख्य प्रवासी ठरले. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणारी ही रंजक सफर खास मराठी वाचकांसाठी!
-
Teenagers A Natural History (टीनएजर्स-अ नॅचरल हिस्
प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणारे पालक वयात येणं का समजून घेऊ शकत नाहीत? कारण ‘वयात येणं’ या घटनेमागे फक्त शारीरिक बदल नाहीत, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असे सगळेच संदर्भ टीनएजला आहेत. उत्क्रांतीपासून सामाजिकतेपर्यंत सगळीकडेच टीनएजर्सची पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. एरवी पालकांसाठी ‘प्रवेश निषिद्ध’ असणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अद्भुतरम्य जगाची सफर या पुस्तकाने घडवून आणली आहे. एखादं न सुटणारं अवघड कोडं सोडवताना जसा आनंद मिळतो, तसाच आनंद निसर्गाने घातलेलं कोडं सोडविण्यात आहे.‘टीनएजर्स’चं तर्कापलीकडचं गणित उकलताना जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो.