-
Sambhram (संभ्रम)
'संभ्रम ' हे बुवाबाजी ,अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगांचे चित्रण करणारे बोलके पुस्तक आहे. य़ात रजनीश ,रमामाता ,न्यायरत्न विनोद ,सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे . मीरा दातारच दर्गा , समर्थांच्या पादुकांचा आगमन सोहळ, शिर्डीच्या साईबाबांचा रामनवमी, उत्सव, काळूबाईची जत्रा, वारकरी संमेलन यांसारख्या अंधश्रद्धांच्या केंद्रावरील वातावरण डाक्युमेंटरी पध्दतीने घडवले आहे . जैन समाजात अल्पवयीन मुलींनाहि संन्यासदीक्षा दिली जाते . यल्लम्मास अल्पवयीन मुली सर्रास सोडल्या जातात . या अंधश्रद्धांच्या बळींचाही येथे वेध घेतला आहे . या अंधश्रद्धांचा वैचारिक परामर्ष घेणारी प्रस्तावना सुप्रसिध्द विचारवंत मे. पुं. रेगे यांनी लिहिली आहे .
-
Shahamrug (शहामृग)
प्रत्यक्षातल्या माणसाच असण आणि दिसण त्याच जगण आणि वागण त्याचे वासना विकार त्याचा हे सगळचं तर्कातीत असत. गोचरत्वाचा पलीकडच केवळ एवढावरच चिमटीत धरून माणसाच मोठेपणा वा श्रुद्रत्व दाखविता येत नाही ते तस ठरविता येत नाही. तर माणसाचा मुळापर्यंत पोहोचण्याचा या काही पायरा. केवळ चाचपडण्यापुरता. बेवरवशाच्या या चाचपडण्यातून काही हाती येत का ? कुठलं सत्य गवसत का? आणि हे सत्य तरी कुठल्या आधारवर सत्य म्हणून स्वीकारायचा? ललित लेखनाचा केंदीभूत माणसाचा शोधाची हि अखंड प्रक्रिया. प्रत्येक कलावंत आपापल्या कुवतीनुसार या प्रक्रियेचा एक भाग होतो. रवींद्र शोभने याच्या शहामृग मधील दीर्घकथांनी माणसाचा मुळापर्यंत पोहोचण्याचा केलेला हा प्रयल तटस्थ्. तरीही उत्कट आणि सयंत.
-
Mi Aani Mi (मी आणि मी)
हो मी मी व्यक्तीरिक्त काही बोलत नाही. मी ना समाजसुधारक आहे ना समाजसेवक. इतकेच नव्हे तर सामाजिक प्राणी सुद्धा नाही. माझ्या बाहेर जे काही घडतं ते माझ्या मी चा हिस्सा बनल्याशिवाय मी त्याला कागदावर उतरवू शकत नाही. सगळे कलाकार हेच करतात. जर ते खोट बोलत नसतील तर ! मी खोट बोलतो साहित्याबद्दल नाही तर मी लिहतो आपल्याबद्दल, ध्येयाचा शोध घेतो तो आपल्या पध्दतीने. मी माझ्या मी ची बाजू घेणारा आहे. अभिव्यक्त करणारा आहे. मी माझ्या मी वर प्रेम करणारा आहे. एकानिष्ठेने प्रेम फक्त स्वतावर केल जात.
-
Bhakatichya Ubaratyavar (भक्तीच्या उंबरठयावर)
अनेक दिवाळी अंकांतून ,मासिकांतून कथा ,कविता ,लेख प्रकाशित . अनेक संत चरित्रावर आजपर्यंत जवळजवळ ५४ प्रवचने . शेगावच्या गजानन महाराजांच्या विजयग्रंथावर गजानन गीतगंगा हि काव्यात्मक रचना . गजानन गीतगंगेच्या जवळजवळ १०० कार्यक्रमात निवेदक म्हणून कार्यरत . गजानन गीतगंगा या पुस्तकाची राज्य मराठी विकास संस्थेच्या मराठी ग्रंथ सूचीत(१९७९-८९) या संदर्भ ग्रंथात नोंद
-
Choukatibaherch jag khnd 2(चौकटीबाहेरच जग खंड 2)
न. चिं. केळकर यांनी एका ठिकाणी म्हंटले आहे कि , वाड:मयसेवकांना म्हणजेच अभ्यासकांना नवी दृष्टी येण्यासाठी नवीन सृष्टी निर्माण करायची असते . अशा पध्दतीची जीवनदृष्टी देण्यासाठी 'चौकटीबाहेरचं जग ' हा उपक्रम राबविण्यात येतो .
-
Choukatibaherch jag khnd 1(चौकटीबाहेरच जग खंड १)
साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्याथ्यांनी जीवनातील सर्व क्षेत्रांचा आणि विद्याशाखांचा किमान परिचय करून घेतला पाहिजे, त्यातूनच त्यांची बहुश्रुतता आणि समज वाढू शकेल आणि त्यामुळेच त्यांना साहित्याचेही नीट आकलन होऊ शकेल असे मला नेहमी वाटत आले आहे .'ज्याला समाज कळतो त्यालाच साहित्य कळू शकते ' अशी माझी धारणा आहे . - डॉ. मनोहर जाधव