-
Videshi Kanya (विदेशी कन्या)
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राइलमधून जहाजात बसून भारतात आलेले काही बेने इस्त्राईल हे आपले पूर्वज आहेत आणि त्याची मुले कुठपर्यंत खोलवर गेलेली आहेत,हे शोधण्याचा तिचा ध्यास असतो. या ध्यासापोटी ती आपल्या आजीला याचा शोध घेण्याचे आश्वासन देते ते पूर्ण करण्यासाठी ती प्रथम भारतात येते. तिने ज्यू धर्माच्या लोकांविषयी जे काहीं आजवर ऐकलेले होते, त्याहीपेक्षा ते अधिक वेगळे असल्याचा तिला शोध लागतो. निरनिराळ्या धर्म संस्कृतींचा मिलाफ असलेला एक समान धागा तिला सापडतो आणि हा धागा पकडून ती आपल्या पूर्वजांबद्दल माहिती मिळऊ लागते. त्यातच आपला धर्म नेमका कोणता? आजीचा (ज्यू),आईचा (मुस्लिम) कि वडिलांचा (खिश्चन) अशा विचारचक्रात ती अडकते...
-
To Ek Pakistani (तो एक पाकिस्तानी)
आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रमावस्था निर्माण करणारी एक सत्यकथा! या ग्रहावरील सर्वात धोकादायक अशा उद्दाम आणि युद्धखोर देशांमध्ये अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा फैलाव करण्यासाठी केवळ एक माणूस कसा वागतो, कोणत्या ठरला जाऊ शकतो; ताबाबत धोक्याची सूचना देणारे तसेच सर्वकाही ज्ञात असूनही अमेरिकेच्या सरकारने हे सर्व होऊ कसे दिले, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
-
Mi Eric (मी एरिक)
मेंदू शेंगदाण्याच्या आकाराचा असूनही मी पटपट शिकणारा आहे, असे आठवड्याच्या शेवटी जाहीर करण्यात आले, परंतु खरच जर का माझ्या 'शेंगदाण्याच्या आकाराच्या' मेंदूत ते डोकावून पाहू शकले असते, तर त्यांना हे कळले असते की, मी त्यांच्या मताप्रमाणे वागतोय; ते मी त्यांची आज्ञा पाळावी या जाणीवेने नव्हे ; तर माझ्या सोईसाठी मला ते करावेसे वाटते म्हणून! …विचार करणे, आठवून गोष्टी करणे,हृदयाला जाणवणे आणि प्रेम करणे... यासाठी देवाने आम्हाला मेंदू दिला आहे. भले,तो मेंदू दुसर्यांच्या मेंदूपेक्षा थोडा लहान आहे! …त्यमुले 'निव्वळ कुत्रा'असे म्हणण्यामागे लोकांना काय अभिप्रेत असते?
-
Sad Uttungachi (साद उत्तुंगाची)
जीवावर उदार होऊन गिर्यारोहणाचा आनंद स्वतः लुटणाऱ्या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देणाऱ्या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण! साहस, महत्वाकांक्षा आणि जबरदस्त सहनशक्ती यांचं मूर्तीमंत प्रतिक असलेल्या स्कॉट फिशरच्या जीवनाचा आलेख वाचता- वाचता आपण त्याच्या समवेत जगभरातील विविध उत्तुंग, दुर्गम शिखरांवर फेरफटका करून येतो. आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक अनुभवात आपणसुद्धा समरसून जगतो. आयुष्यभर ज्या एव्हरेस्ट पर्वताचा त्याला ध्यास लागलेला होता,त्याच पर्वताच्या कुशीत विसावून अखेरचा श्वास घेणारा स्कॉट फिशर आपल्या हृदयाचा ठाव घेतो!
-
The Partner (द पार्टनर)
चार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस. लॅनिगन. फेब्रुवारी,१९९२ मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली. तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणारया कंपनीत 'पार्टनर' होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं - सुंदर पत्नी,गोड मुलगी आणि उज्वल भविष्यकाळ! त्याच्या मृत्युनंतर,सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एव्हडी प्रचंड मोठी रक्कम गायब होते! आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं - हो, अजूनही तो जिवंत आहे!
-
Majhi Jivanyatra Swapne Sakartana... (माझी जीवनयात
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तीदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढ निश्चय,धाडस,चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवन यात्रेदरम्यांच्या आठवणी,भेटलेली माणसं. ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती,त्यांचे जिवलग, मार्गदर्शक,गुरु या सगळ्यांबद्द्ल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहिलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग,संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक,स्फूर्तीदायी आणि प्रेरक आहे.
-
Jamilchya Sahaskatha (जमिलच्या साहसकथा)
जमिल राहत असलेल्या तातासी प्रदेशात दोन महत्वाच्या, पण दु:खद घटना घडतात आणि सगळ्या गोष्टी बदलूनच जातात! मोठ्ठा भूकंप होऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्यामुळे मुख्य भूभागापासून तातासी तुटून वेगळं होतं आणि त्याचं रुपांतर एका बेटामध्ये होतं. त्यानंतर लगेचच, समुद्रात एक राक्षस असल्याचं लक्षात येतं आणि तो बेटवासीयांना त्रास देऊ लागतो, त्यांची अडवणूक करून ठेवतो. जमिल आणि त्याच्या प्रत्येक मित्राचं एकच स्वप्न असतं - एके दिवशी या राक्षसाला चांगलाच धडा शिकवायचा आणि सगळ्या बेटवासीयांना भीती आणि असुरक्षितता यांपासून मुक्त करायचं. जमिलचं आणखीही एक स्वप्न असतं - हरवलेली किल्ली शोधण्याचं! कारण या किल्लीमुळेच भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून तातासी बेटवासियांचा बचाव ह्पोणार असतो. साहसी योजना आखून समुद्रराक्षसाला तर जमिल हरवतो, पण त्याचं पुढचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्यासाठी त्याला वाळवंट पार करावं लागतं, सामुद्रीचाच्यांना तोंड द्यावं आणि भयंकर चीमेरांशीही सामना करावा लागतो........ हि कथा आहे एका मुलाची,त्याच्या स्वप्नांची आणि त्यासाठी त्याने केलेल्या दिव्य साहसांची...
-
Chavni (छावणी)
नामदेव माळी यांची 'छावणी' हि कादंबरी मराठीतील ग्रामीण कादंबरीच्या परंपरेत आपल्या वेगळेपणाने उठून दिसावी अशीच आहे. ग्रामीण संस्कृतीच्या उदात्तीकरणाची भ्रामक भूमिका हि कादंबरी घेत नाही, त्याऐवजी या कादंबरीमधून ग्रामीण जगण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय भान व्यक्त होते. ती वास्तववादी धारणेतून लिहिली गेलेली असली तरी हा वास्तववाद सरधोपट वाटत नाही. त्यामागे सांस्कृतिक चिकित्सा करण्याची इच्छा आहे. दुष्काळात पाळीव जनावरे जगवण्यासाठी निर्माण झालेल्या चारा छावणीचे आणि त्या अनुषंगाने प्राण्यांच्या भावविश्वाचे प्रत्ययकारक दर्शन छावणीमधून घडते. हे प्राण्यांचे जग अनित्याच्या भोवतालचे माणसांचे जग नामदेव माळी एकमेकांच्या शेजारी ठेवतात. हि दोन जगे आपापल्या जागी स्थिर राहत नाहीत. या भाष्यांमधून ग्रामीण जीवनाचे नवे व चिकित्सक भान छावणीमधून व्यक्त होऊ लागते.
-
Vrat Ani itar katha (व्रत आणि इतर कथा)
फकीर मुहम्मद कात्पदी यांची कथा आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून आम्हाला अपरिचित असलेले मुस्लिम समाजातले चढ-उतार दाखवतात. तेही आधुनिकतेची कस न सोडता. या लेखनातून जाणवणारा मानवी स्पर्श आणि अंत:करणाची आद्रता वाचकाच्या मनाला भावल्याशिवाय राहत नाही. तसंच कुठलाही धर्म स्वत:पुरता असतो,तेव्हा काही अडचण नसते. ते धर्म समोरासमोर ठाकतात,तेव्हा त्यात राजकारण येते. हा सगळ्यांनाच येणारा अनुभव या कथा देतात.
-
Sat Sakam Trechalis (सात सक्कं त्रेचाळीस)
लेखक किरण नगरकर यांची ही जळजळीत आणि बेधडक कादंबरी एक अस्वस्थ अनुभव देते. माणूस आणि त्याचे जगणे केद्रस्थानी असलेली आणि त्यातील असहायता, नश्वरता उलगडून दाखवीत देह व मनाच्या अपरिहार्य भोगाचे विखारी चटके देणारी ही कांदंबरी वास्तवाला थेट भिडते. ते सादर करण्याचे तंत्रही निराळे, स्तिमित करणारे, वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे, भाषाही तशीच आपल्यावर थेट येऊन आदळते, चक्रावते कधी ओळखीची कधी अनोळखी! विनोद, कारुण्य, दुःख, भयानकता, मृत्यू, फोलपणा... भावनांचा कल्लोळ उसळवत, विस्कटून टाकते. वेगळे अनुभवण्याची इच्छा असणा-या सर्वांनाच जिवंत अनुभव देणारी ही कादंबरी.
-
Tamil Tiger Prabhakaran (तमिळ टायगर प्रभाकरन)
श्रीलंकेतील तामिळींना स्वतंत्र राष्ट्र हवं - 'तमिळ इलम' यासाठी प्रभाकरनचा खटाटोप चालला होता. स्वत:चा स्वप्न त्यानं सर्व तमिळ बंडखोरांमध्ये संक्रमित केलं. या स्वप्नासाठी त्याच्या मृत्युपर्यंत जवळपास ७० हजार तम्नील नागरिकांना प्राण गमवावे लागले. 'जगभर अनेक स्वातंत्र्ययोद्ध्ये पराभूत झाले. त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं. जे जिंकले ते राष्ट्रानिर्माते ठरले. क्रांतिकारक झाले. श्रीलंकेच्या दृष्टीने प्रभाकरन दहशतवादी होता. देशद्रोही होता. देशद्रोह्याला जी शिक्षा द्यायची ती त्यांनी प्रभाकरनला दिली... ठार मारले. तो अपयशी झाला म्हणून लोक त्याला दहशतवादी म्हणतील. मात्र तो विजयी झाला असता तर त्याच्याकडे बघायची बघायची लोकांची दृष्टी बदलली असती.
-
Karmayog (कर्मयोग)
जीवनात श्वास जसा महत्वाचा,तशी परमपिता परमात्म्याची ओळख महत्वाची आहे. सर्व व्यवहार त्याच्या साक्षीनेच झाले पाहिजेत. सर्व व्यवहारात त्याचा आशीर्वाद पाहिजे,त्याशिवाय कोणत्याही कार्यात यश संभवणार नाही. मानवी जीवनात यश हि अत्यंत महत्वाची बाब आहे. यशप्राप्तीसाठी मेहनत हा एकच सर्वोत्तम मार्ग आहे. मेहनत फलदायी होत असते,अन्य मार्ग फलदायी असतीलच असे नाही. मेहनतीच्या मार्गातून मिळणारे यश फसवे, क्षणिक किंवा मृगजळाप्रमाणे भूलभुलैय्या असते. जे शेवटपर्यंत टिकणार नाही,ते त्याच्या अस्तानंतर आपणास त्रासदायक ठरते, आणि त्रासदायक ठरणारे मिळण्यापेक्षा न मिळणे बरे,असे शेवटी वाटते. मिळून पश्चाताप होण्यापेक्षा न मिळता झालेला पश्चाताप कमी त्रासदायक असतो.