-
Mi Anubhavleli America (मी अनुभवलेली अमेरिका)
अमेरिकेला जाताय? ही अमेरिका आहे तरी कशी? कसं जायचं? केव्हा पोहचायचं? नव्या नवलाईचं जग कसं न्याहाळायचं? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. पासपोर्ट,व्हिसापासून अमेरिकेत फिरण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत आपल्यासमोर प्रश्नचिन्ह असते. अशा या नवख्या अमेरिकेचं बारकाव्यासहीत इत्थंभूत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं आणि हे अनोळखी जग क्षणार्धात आपलंसं होऊन जातं.
-
Grace-Sarangsudha (ग्रेस-सारंगसुधा)
'सारंगसुधा' हे कवीचे काव्यनाम. या नावावरूनच लक्षात येते कि या कवीचे अंत:करण सौंदर्यलोलुप 'कवी'चे आहे : त्याला जीवनातील प्रत्येक सुखदु:खात सौंदर्याचाच प्रत्यय येतो. हा सौंदर्यप्रत्यय तो मुख्यतः रंगप्रतिमांतून व्यक्त करतो. हे ठीक आहे; पण असे करताना स्वाभाविकच त्याच्या आवडत्या कवीची छाया त्याच्या शैलीवर पडते : कवीने कोणाचेच - स्वतःच्या जुन्या कवितांचेही- अनुकरण करू नये! प्रतिभेस नवनवोन्मषशाली प्रज्ञा' म्हणतात ते उगाचच नव्हे! कवी सारंगसुधा हे मराठी साहित्याचे प्रशिक्षित अभ्यासक नव्हत; त्यांचे कार्यक्षेत्र वेगळेच आहे. त्या क्षेत्रातील जाणीव आणि प्रतिमा त्यांच्या काव्याला पृथात्मता मिळउन देतील!
-
Tichi Katha: Stree Atmcharitracha Magova (तिची कथा: स्त्री आत्मचरित्राचा मागोवा)
या पुस्तकात जवळपास १०० स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा व आत्मकथनांचा मागोवा (आढावा/मीमांसा) घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आलेल्या स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांचे अनुभव आणि त्यांनी समाजात व कुटुंबात बजावलेली भूमिका या पुस्तकातून समोर येते.