-
Aadpaya (आडपाया)
श्री. बागल यांचा 'आडपाया' हां ग्रामीण कथा संग्रह आहे. ग्रामीण परिसर, ग्रामीण माणूस आणि ग्रामीण कुटुंब व्यवस्था यांच्याशी त्यांच्या कथा निगडित आहेत. या कथा संग्रहातील प्रत्येक कथा वाचल्यावर विसरली जात नाही. ती वाचकाला अस्वस्थ करते, अंतर्मुख करते. गावातल्या मातीत आणि माणसाला रमलेले लेखकाचे भाउक मन अनुभवही अधिक उत्कंटपाने साकाराताना दिसते. लेखकांनी पाहिलेली, न्याहाळलेली, अनुभवलेली, पारखालेली, ग्रामीण मानसे, त्यांचं, जगण, त्यातील त्यांची ओधाताण, तरीही ग्रामीण जगानारी मानसे श्री. बगालांच्या कथांतून व्यक्त होताना दिसतात.
-
Dukhri Nas (दुखरी नस)
हलक्या फुलक्या विषयांची दखल घेत मयुरेश वाटावे या तरुण, होतकरू पत्रकाराने 'दुखऋ नस' नेमकी पकडली आहे. वाटावे यांची शैली कधी उपरोधिक असते टार कधी चिंतानाची गंभीर किनार तिल असते. मात्र उपदेश, संदेश, लोकशिक्षण वा प्रबोधानाचा आव ते आगत नाहित अन् त्यातच त्यांच्या लिखाणाचे मर्म आहे.
-
Gomantak Sanskrutichya Paulkhuna (गोमंतक: संस्कृती
प्रस्तुत पुस्तकाच्या निर्मितिने गोमंताकातील रसिक मराठी वाचाकाना त्यांच्या लोक्संस्क्रुतिचा पुन: प्रत्यय घेता येइल. त्याच्याबरोबर महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रतील जीज्ञासु मराठी वाचाकाना गोमंताकातील लोकसंस्कृतीचा नव्याने परिचय करून घेण्याची संधी मिळेल. प्रस्तुत पुस्तकातील प्रतिपाद्य विषयाला डॉ. फळदेसाइ यानी विविध दृष्टीकोनतुन सदर केले आहे. त्यामद्धे जाशी विविधता आहे तशीच तत्संबंधीच्या भविष्य कालीन गरजाकड़े लक्ष वेधान्याची प्रयत्न आहे. प्रस्तुत पुस्तकांच्या रुपाने गोमंताकाच्या मराठी वाड्मयसृष्टीतील एक मोलाच्या ग्रंथाची भर पडलेली आहे.
-
Shesh-Vishesh (शेष-विशेष)
गंभीर जीवनदृष्टी असणार्या व्यक्तींच्या लेखनात त्याच्या जीवनदृष्टी निखळ प्रत्यय येत असतो. त्याच्या लेखनात आपोआपच ती कळत- नकळत पझारत असते. लिहणार्याला चकवूनसुद्धा ती कधी कधी लेखनात उपस्थित होते. लिहणार्यालाही ती अश्चर्याच्या धक्का देत असते. हे सारे विवेंचन एवढ्याठी की कोणताही लिहिणारा एक कृति करत असतो. त्या कृतीत त्यांची जीवनदृष्टी भूमिका या सार्याची जाणीवपूर्वक उपस्थित असते. लेखकाच्या त्या कृतिवारून तो समाजातल्या कोणत्या वर्गाचा बाजुच्या आहे याचा निर्णय क्षणार्धात लागत असतो. त्याच्या आस्थेच्या परिघचा विस्तार आणि जगण्याचा पैस आकालत असतो.
-
Adhuri Ek Kahani (अधुरी एक कहाणी)
काश्मिरी वातावरण, गूढ तसंच निसर्गरम्य अशी पार्श्वभूमी लाभलेल्यावेद राहींच्या काही कथांचा हा सरस प्रत्ययकारी अनुवाद.
-
Jamala Tar Ganit (जमलं तर गणित)
गणिताबद्दलची भीती घालवून त्याची रुची वाढविणारे पुस्तक.
-
-
Harwlelya Watewarcha Prawasi ( हरवलेल्या वाटेवरचा
समताधिष्ठित समाजनिर्मिती हा लोकशाही समाजवादी विचारांच्या संघटना व कार्यकर्त्यांच्या चळवळीचा मूळ उद्देश असतो. समाजातील संख्येने अधिक असलेल्या सर्वहारा वर्गाला संघटित करून त्यांना सामाजिक, राजकीय व सांस्कृ़तिकदृष्टय़ा सक्षम करण्याचं आव्हान स्वीकारणाऱ्या आणि त्यासाठी प्रसंगी प्रखर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीच एकेकाळी महाराष्ट्रात होती. त्यातील एक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकत्रे शांताराम चव्हाण. नाशिक शहर व परिसरातील हातगाडीवाले, चहाच्या टपरीवाले, रॉकेल, फळविक्रेते तसेच भंगार वेचणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी तब्बल ३० वष्रे एकहाती संघर्ष करणाऱ्या चव्हाण यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं 'हरवलेल्या वाटेवरचा प्रवासी' हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचताना त्यांच्या लढाऊ बाण्याचं पानोपानी दर्शन होतं.
-
Deshodeshichya Vivek Pantapradhan (देशोदेशीच्या पं
जगात अनेक देशांच्या प्रमुखपदी महिलांची निवड झाली. आपल्याला इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व आणि त्यांचे कार्य माहीत आहे. त्यानंतर अन्य देशांतील काही महिला पंतप्रधान माहीत असतात. पण जगात 193 देशांपैकी पन्नास देशांत पंतप्रधानपदावर किमान एकदा तरी महिला निवडली गेली आहे. या महिला पंतप्रधांनाची ओळख या पुस्तकामुळे होते. अर्थात या पदावर निवडल्या गेलेल्या महिलांना आपला कार्यकाळ पूर्ण करताच आला, असे नाही. यापैकी काहींना केवळ दोन दिवस काम करता आले, तर काही जणींना 15 वर्षांचा काळ मिळाला. महिला पंतप्रधान निवडण्यामध्ये केवळ प्रगत देशच होते असे नाही, तर विकसनशील आणि आफ्रिका खंडातील अविकसित देशांनीही पंतप्रधानपदी महिलांची निवड केली आहे. या पंतप्रधान, त्यांचा कार्यकाळ, ते देश आणि त्यांच्याबद्दलची रोचक माहिती या शिल्पा विवेक बेळे यांनी या पुस्तकात दिली आहे.