-
Rajmudra (राजमुद्रा)
या पुस्तकात नामांकित अधिकाऱ्यांची माहिती दिली आहे.लहान गावातून येऊनही उत्तुंग इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी मिळवलेल्या यशाचे वर्णन त्यांच्याचकडून वाचावयास मिळते.
-
Hasat Khelat Dhyandharana (हसत खेळत हसत-खेळत ध्य
हे ओशोंचे ध्यानविषयक विचार प्रकट करणारे पुस्तक आहे. ध्यान ही एक गंभीर अध्यात्मिक गोष्ट आहे, असा समज पूर्वीपासून रूढ झालेला आहे. जगापासून दूर कोठेतरी एकांतात देवाचे ध्यान करत बसणे किंवा त्याच्या प्रतिमेची कल्पना करत बसणे म्हणजे ध्यान अशीच समजूत आहे. ओशोंच्या मते ध्यान ही कला आहे. मनाला हलके फुलके करण्याची निर्मळ , निर्विचार करण्याची. आणि कोमल, निर्मळ अवस्थेच्या आनंदात डुंबून जाण्याची. ध्यानाबद्दलचे ओशोंचे विचार वेगवेगळ्या दृष्टीकोनातून या पुस्तकात प्रश्नोत्तर रूपात मांडले आहेत. ध्यान आत, अंतरंगात आहे. आनंद आत आहे. त्याचे एक विज्ञान आहे. ओशोंचे हे पुस्तक त्या विज्ञान आणि कलेचा व्यवस्थित बोध देते. दिशा दाखवते. यातूनच ओशोंच्या व्यक्तीमत्वाचे मनोज्ञ, कधी गूढ तर कधी प्रक्षोभक दर्शन घडते. आपल्या मानसिक, वैचारिक, अध्यात्मिक प्रेरणांचा विकास घडवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचायला हवं.
-
-
Hrudayastha (हृदयस्थ)
हृदयस्थ’ ही कहाणी आहे नितू मांडके या बिनधास्त, महत्त्वाकांक्षी मराठी माणसाची. त्यांचे शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि भव्य स्वप्नं हे सारे यथार्थपणे उभे केलंय त्यांच्या सहचाणिरीने. आपल्या पतीच्या आकांक्षात विरघळून गेलेल्या, त्याच्या मृत्युचं दुःख पचवून त्याचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एकाकीपणे झटणाऱ्या डॉ. अलका मांडके यांनी या वादळासोबतच्या आपल्या सहजीवनाचा पट उलगडलाय तो मनाला न भिडला तरच नवल!