-
Ratricha Suryaprakash (रात्रीचा सूर्यप्रकाश)
पद्ममताईची कथनशैली व त्यांनी कथेकारिता निवडलेले विषय पाहता प्रसिद्ध लेखक महादेवशास्त्री जोशी यांच्या शैलीची आठवण येते. संकटातून मनोधेर्याने सारासार विचार करून मार्गे काढता येतो. ही शिकवण या कथा वाचकांना देऊनं जातात. कोणत्याही उपमा, उत्प्रेक्षा अलंकाराचा फापट पसारा नाही. त्यामुळे या सर्व कथा वाचतांना जणू कुणीतरी आपल्याशी बोलतोय अन् जीवन कहानी सांगतोय असं वाटतं.
-
Reportingche Divas (रिपोर्टिंगचे दिवस)
अनिल अवचट गेली चाळीसाहुन अधिक वर्ष विविध सामाजिक प्रश्नांवर लिहित आहेत. आज लेखक म्हणून प्रसिद्द असलेले अवचट मुलात पिंडाने पत्रकार. त्या भुमिकेतुनच ते पंतप्रधान इंदिरा गाँधीपासून चलावालितल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत अनेकांसोबत वावरले. त्यांना दिसनारं जग त्यातल्या कंगोर्यांसह लेखणीतून उतरवत राहिले. त्यांचं हे लेखन आजच्या पिढीला ज्ञात नाही. अवचटांचं हे लिखाण म्हणजे सामाजिक वास्तवाचं भान ठेवून केलेल्या राजकीय पत्रकारितेचा वस्तुपाठच. वृत्तपत्रीय रिपोर्टिंगची रूढ़ चौकट मोडून आपल्या चित्रमय लेखनशैलीने राजकीय-सामजिक अंत प्रवाहांना आवाज देणारा हां दस्तावेज.
-
Jag Badal Ghaluni Ghaav ( जग बदल घालुनि घाव)
जातीय दुःखावर उत्तरे शोधता शोधता स्वतःसोबत हजारो दलितांच्या जीवनात सन्मानाची ज्योत पेटवणा-या एकनाथ आवाड यांचे दलित साहित्याच्या प्रवाहात एक पाऊल पुढे टाकणारे आत्मकथन. जगण्याच्या लढाईत आलेल्या यशापयशाची व्यक्तिगत पातळीवरची नोंद यातून या पुस्तकाची वीण तयार होते, तर या लढाईला जातिअंताच्या लढाईचं परिमाण लाभल्यामुळे एका सार्वजनिक चळवळीचा इतिहास त्यातून प्रतिबिंबित होतो. जातिअंताच्या लढाईत समाज किती पुढे सरकला, या प्रश्नाचं उत्तर काहीसं निराशाजनक आहे, तरी पण हे स्वकथन कार्यकर्त्यांना निराश करत नाही. कारण मुळात ज्याच्याविरुद्ध आपण लढाई सुरू केली तो शत्रू किती बलवान आहे हे समजून-उमजून ही लढाई केल्यामुळे इथला पराभवसुद्धा चळवळीतल्या कार्यकर्त्यांला एक वेगळा उत्साह देणारा आहे, याचाच प्रत्यय येत राहतो. या लढाईत स्वजातीच्याच एका माणसाने आवाडांवर प्राणघातक हल्ला करावा आणि एका परजातीच्या प्रौढेने हात जोडून आवाडांची विचारपूस करावी, यातील अंतर्विरोध जातिअंताच्या लढाईतल्या कार्यकर्त्यांना वेगळं बळ देणारा आहे.
-
Yugpravartak (युगप्रवर्तक)
"मला मृत्यूची पर्वा अजिबात नाही. ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस तो एक आलेख लिहिलेलाच असतो. त्यामुळे मृत्यू केंव्हा आणि कसा येईल याची पर्वा मी करीत नाही. पण तो जेव्हा येईल तेव्हा मर्दासारखा असावा . मी माझं संपूर्ण शरीर देवतांपुढे वाहून टाकलेलं आहे. त्यांना जे हवंय ते त्या करतील. मला चिंता नाही ." शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहणाऱ्या या पुस्तकात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे लेख आहेत. बाळासाहेब हयात असताना त्यांच्यावर निघालेल्या विविध पुरवण्या आणि विशेषांकातील मान्यवरांचे वाचनीय लेख यात आहेत. त्याचबरोबर त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयीचे अग्रलेख आणि लेख यामध्ये आहेत.
-
Kala Khandak (काळा खंदक)
विजू, बाबूजी जीभ टाळ्याला चिकटली होती. त्यांचे पांढरे फक्क चहरे पाहून ते केंव्हाही खाली पडतील असे वाटत होते. "अ..अव्या!" मी धीर गोळा करीत घसा साफ़ करीत म्हटलं. पण अवि समोर पाहत होता माझ्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हत. मीही समोर पाहिलं आणि गोठला! भितिनं आमची ह्रदय बंद पडतील असं वाटत होतं. विजू, बाबु डोले बाहेर आल्यासारखे वाटारल्या नजरेने पाहत राहिले. त्या रेशमी पडद्यामागुन एक गोरी पान नाउ वारी पातळ नेसलेली कुणी मावशीबाई हळूहळू आमच्या दिशेने येत होती. पण आम्ही काही करू शकत नव्हतो. तेथून पळून जाणं शक्य नव्हतं. पायात शिसे भारल्यासारख ते जड झाले होते. त्या बाईच्या हातातील बांगडया कीणकीणल्या. आश्चर्याने आणि अनुकंपेने आमच्याकडे पाहात त्या बाई बोलल्या "कसे रे आलात इकडे?...आणि उघडे? तुम्हा कोवाल्या तरुण पोरांना पाहिलं टार तो राक्षस सोडेल का तुम्हाला?"
-
Mafiyachya Magarmithit (मफियाच्या मगरमिठीत)
अमेरिकेत स्थायिक झालेला एक सिविलियन तरुण आपल्या आजीला भेटण्यासाठी म्हणून माय देशात येतो. त्याचा आगमनाने कही लोकांच्या पोटात भीतीचा गोला उठतो. त्याला मारन्याचाही प्रयत्न होता. त्याचा धर्मगुरु असनार आजा त्याला सुरुवातीला मदत करीत नाही. एका रात्रि पुरेशी ओळख असणारी एक तरूणी! त्याच्या पाठीशी उभी राहते. त्याचा बाप कोण होता? त्याने ठेवलेला वारसा के होता? मानवी संबंध आणि गुन्हेगारिचे विश्व ह्यांचे चित्रण करणारी थरारक कहाणी. (फिलीप लॉरेन ह्यांच्या 'ए माफिया किस' ह्या कादंबरीवर आधारित.)
-
Kasturicha Game ( कस्तुरीचा गेम)
कस्तूरी आता बेडवर होती. पण कस्तुरीचं पीणं थांबत नहव्त. मानेकाका एकदा म्हणाले, "विजू भाऊ, कस्तुरीनं तुम्हाला खोट्या आरोपावरून जेलमध्ये टाकालं. तुम्हाला देश सोडावा लागल पण तिथे रुबाबात राहते आहे." "तीनं केलं ते बरं केलं." विजू म्हणाला. "काय म्हणता?" माने काकानं आश्चर्यानं विचारलं. "तीनं काय बरं केलं?" "ती अशी वागली म्हणून मी जेल मधे गेलो. मला आशा सारखी बायको मिळाला. भगवान सारखा मित्र मिळाला. तुमच्यासारखे काम मिळाले. हे सगळ कस्तूरीमुले झालं. तीनं गेम केला पण फ़ायदा माझा झाला."
-
kanyavatibhav (कन्यावतीभव)
'आज मुलीही मुलांप्रमाने प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेत. त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पेक्षा वरचढ, सरस कामे करीत आहेत. कुठेही कमी पडत नाहीत. अत्युंच्य पदी पोहोचल्या आहेत. भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी एक स्त्रीच होत्या. एवरेस्ट सर करणारी बचेंन्द्रपाल आहे. आवकाश यात्री कल्पना चावला आहेत. पहिला न्यायाधीश फापिता बीबी आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत. तेंव्हा मलाही माझ्या मुलींचा अभिमान आहे. त्याही उच्च शिक्षीत आहेत. त्यांचा पायावर आज त्या उभ्या आहेत. त्या माझ्या मुली नाहीत टार मुलेच आहेत!'
-
Balachi Chahul (बाळाची चाहुल)
"केशव तू उगाचच बाऊ करतोस बग. त्यात कठीन काय आहे? माधवरावांच्या पत्नीची रमाबाईची भूमिका तू उत्तम वथावली होतीस. त्या भूमिकेबद्दल तुला बक्षीशही मिळालं होतं.' "श्री हवं ते बक्षिस तुला घे. पण मला या नासत्या भानगडीत अदाकवु नकोस. माला जाऊ देत." "सारखं काय रे पळायला पाहातोस. सिनेमात सुध्हा पुरुष स्त्री पार्ट करताच ना. मग तुला के झाल?" "ए ते नाटक सिनेमातलं वेगळं असतं आणि ते लोकांना ठाउकही असतं. ते त्यांचाकड़े एक विनोद म्हणून पाहतात. पण इथे प्रत्यक्षात करायचयं लोक माझी टर उड़वतील. माझ जीवन बरबाद होइल रे श्री. हयात मला ओढू नकोस आधीच मला नोकरी नाहिये. त्यात माझ्या किशोरीला हे कळलं तर, तर ती मला मिळण्यापूर्वीच सोडून जाईल रे. ही तुझी अफलातून आयडीया तुझ्या जवालाच ठेव. माझं असं हसं करू नकोस रे."
-
Bhramjal (भ्रमजाल)
आपल्या आईच्या चारित्र्यावर कोणी गरळ ओकावी हे त्याला कधीच सहन झाल नह्व्त. पण सत्यही तो नाकारणार नव्हता. सत्य हे होतं की त्याच्या आईचे अशा पुरुषाशी संबंध आले होते की ज्यांच नाव ती कोणालाच सांगू शकत नह्व्ती. पृथ्वीराज चौहान. अतुल, तुझी आई पृथ्वीराज चौहानच्या प्रेमात पडली होती. आपल्या परींन ही गोष्ट कोणाला कळू नये याची ती खटपट करीत होती. पण ही गोष्ट मी ओळखली होती. अतुलन दोन्ही हातान चेहरा झाकला. छाती खुसमाटावी असा एक हुंदका त्यानं दिला. अखेरीस त्याच्या जन्मदात्या आईनेच त्याला फसवले होते. एक गुन्हेगाराचे रक्त त्याच्या अंगात खेलत होते. वान नाही पण त्याचा गुण त्याच्या रक्तात उतरला होता. अतुलने पनावालेले डोळे टिपले. कोणावर दोषारोप करायची वेळ केव्हाच निघून गेली होती. हा चरचरता व्रण सोबत घेउन त्याला जगावे लागणार होते.
-
Tiger Hevan (टायगर हेवन)
वाढती लोकसंख्या, जंगलतोड, वाढत्या लोकसंख्येला अन्न मिळावं यासाठी लागवडीखाली येणारी जमीन अशा मानवनिमिर्त समस्यांमुळे वन्य प्राण्यांचं क्षेत्र कमी होऊ लागलं आणि त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं. हिमालयाच्या पायथ्यापासून ते नेपाळच्या हद्दीपर्यंत पसरलेल्या दाट जंगलाचा आणि जंगली प्राण्यांचा विनाश पाहूनच एकेकाळचे शिकारी अर्जनसिंग यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी प्राण्यांच्या रक्षणाकरता अभयारण्यच उभारण्याचं ठरवलं. शिकारी ते संरक्षणवादी असा त्यांचा झालेला विलक्षण प्रवास आणि त्या प्रयत्नांतून झालेली 'दुधवा अभयारण्या'ची उभारणी 'टायगर हेवन'मध्ये आहे. आज दुधवा राष्ट्रीय अभयारण्य दिसतंय ते केवळ अर्जनसिंग यांच्या अथक प्रयत्नांमुळेच. इंदिरा गांधींनी १९७२मध्ये व्याघ्रप्रकल्प व राष्ट्रीय उद्यान जाहीर करण्याआधीची ही कथा आहे. या पुस्तकात लेखक वाचकाला स्वत:बरोबर जंगलात घेऊन जातो. वन्य प्राण्यांच्या सवयी, लकबी, तेथील निसर्ग यांची ओळख करून देतो आणि जंगलसफरीचं अफलातून दर्शन घडवतो. मूळ पुस्तक मराठीतच लिहिलं असावं, असं वाटण्याइतकं ओघवतं भाषांतर विश्वास भावे यांनी केलं आहे. वन्य प्राण्यांचं संरक्षण व संवर्धन म्हणजे केवळ शिकारीवर बंदी नव्हे, तर त्यांचा अधिवास संरक्षित करणे. त्यांना लागणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे पाणी, भक्ष्याचा पुरवठा, नरमादी गुणोत्तर आणि महत्त्वाचं म्हणजे माणसं आणि गुरांना संपूर्ण बंदी... खरंतर संवर्धन करणे म्हणजे एखाद्या जंगलात माणसाने 'काहीही न करणं'... निसर्ग आपोआप स्वत:ची काळजी घेतो... असं लेखक म्हणतो.