-
Chakra (चक्र)
मध्यमवर्गीय मराठी साहित्याला एका नव्या अनुभवविश्र्वाची जोड सहज, सफाईदार आणि सामर्थ्यशील शैलीने मिळवून देणारी ही कादंबरी. गलिच्छ झोपडपट्टीत, गटाराच्याकडेशी जीवजंतूंप्रमाणे वळवळणार्या मानवांच्या एका पुंजक्यावर इथे प्रकाशझोत टाकला गेला आहे. इथे जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुर्या होण्यापूर्वीच त्या इथे पिळवटून विकृत होतात आणि सफल, सुंदर जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थितीच्या निष्ठूर, अप्रतिहत चक्रात त्यांचा चक्काचूर होतो. जयवंत दळवी यांची ही पहिलीच कादंबरी असली, तरी मराठी वाचकांना ते अपरिचित नाहीत. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रकाशित साहित्यातील खुसखुशीत अनुभवांच्या चुरचुरती चित्रणाने आणि प्रवाही भाषाशैलीने वाचक प्रभावित झाले. परंतु `चक्र’ कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत.
-
Himalayachi Haak (हिमालयाची हाक)
लेखिकेने हिमालय आणि उत्तर भारतात केलेल्या विविध दौ-यातून त्यांना आलेले विविध अनुभव या पुस्तकात लिहिलेले आहेत. त्यांनी हिमालयाविषयी सरसकट माहिती न देता तेथील पर्वतरांगांनुसार पूर्व हिमालय (सिक्कीम, दार[...]
-
Soodakadoon Karunekade (सूडाकडून करुणेकडे)
यासर आराफातच्या निवडक तुकडीतीला नेमबाज जवान. पॅलेस्टाइनच्या मुक्तिसाठी शिर तळहातावर घेउन लढणारा. मानसं टिपण हत्या करणं चकमकी लढईची धुमश्चक्री हेच त्यांच आयुष्य बनलेल आहे अचानक एक दिवस त्यांच्या कानी पडली येशुची मानवतावादी शिकवण आणि मानत रुजल करुनेच रोपट . रक्तपाताच्या रस्त्याने चालणारी पावल आता सलोखाच्या, शांततेच्या , मैत्रीच्या अन सम्न्व्यच्या वाटेने चालू लागली. आयुष्याचा अर्थच बदलणार्या या अवघड प्रवासाची सत्यकथा
-
Majhi Kahani (माझी कहाणी)
सामान्यातल्या असामान्य 'स्त्री'चं हे आत्मकथन ! पार्वतीबाई आठवले! १८७० मध्ये जन्मलेली, कोकणच्या खेडयात लहानाची मोठी झालेली एक निरक्षर स्त्री... वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी! पण मुलाच्या काळजीनं पुण्यात बहीण बाया कर्वे यांच्याकडे म्हणजेच मेहुणे धोंडो केशव कर्वे यांच्या घरी आली आणि तिचं सारं जगच बदललं. या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले. कर्वे यांचा 'अनाथ बालिकाश्रम' हे तिचं जीवनकार्य झालं. या संस्थेला मदत मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत ती भारतभर फिरली, इंग्लंड-अमेरिकेतही जाऊन आली. तिनं केलेलं हे आत्मकथन.
-
Tadev Lagnam (तदेव लग्नम्)
लग्न करताय ? स्वत :च ? दुसर्याचं ? धार्मिक ? रजिस्टर ? संस्कार म्हणुन ? इव्हेंट म्हणून ? साधंसं ? जंगी ? कसही करा, पण अर्थ घेउन करा या पुस्तकाच्या मदतीनं नियोजन करा मग तुम्ही उस्फुर्त पाने म्हणाल, तदेव लग्नम
-
Snehyatra (स्नेहयात्रा)
भारत आणि फ़्रांस हे दोन देश तसे लांबलांबचे... ते जवळ यावेत, परस्परांचे मित्र व्हावेत , एकमेकांची संस्कृति समजुन घेण्यासाठी दोन्ही देशांच्या नागरिकांनी याव जाव, भेटीगाठी तुन सहकार्य- सामंजस्य वाढत जाव. यासाठी पुण्यात स्थापन झाल फ़्रांस मित्र मंडळ त्या मंडळांची प्रतिनिधि म्हणून सुमारे चाळीस वर्षापूर्वी निर्मला पुरंदरे नावाची एक तरुण कार्यकर्त्ता वर्षभरासाठी फ्रांसला जाऊन राहून आली. देशाची अनाधिकृत राजदूत म्हणून तिकडे वावरली प्रदेशप्रवासताले नाविन्य ओसरले नव्हते, अशा वेळी त्या वास्तवात तिन घेतलेल्या अनुभवांच आणि केलेल्या निरिक्षनाचं हे प्रांजळ कथनं ...
-
Athvanitale Babasaheb (आठवणीतले बाबासाहेब)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात आलेल्या नऊ व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी. त्यांधून बाबासाहेबांचे एक आगळेवेगळे दर्शन होते.
-
Aamar Meyebela (आमार मेयेबेला)
तसलिमा नासरिन या बंगाली लेखिकेचे नाव गेली काही वर्षे जगभर गाजत आहे. सलमान रश्दीप्रमाणे तसलिमा नासरिनवरही देश सोडून जाण्याची वेळ आली. आपल्या 'लज्जा' या कादंबरीत बंगालमधील हिंदू शेजार्यांवर झालेल्या अत्याचाराचे वर्णन केल्यामुळे तिला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपली मते अभ्यासपूर्ण रीतीने, ठामपणे, निर्भीडतेने मांडणे हे तसलिमांच्या विचारसरणीचे बलस्थान आहे. तसलिमा अशा कशा घडल्या याचे उत्तर आपल्याला त्यांचे 'आमार मेयेबेला’ वाचून मिळते. आमार मेयेबेला म्हणजे 'माझा मुलगीपणाचा काळ’. वयाच्या तेरा-चौदा वर्षापर्यतच्या आठवणी या पुस्तकात आहेत. तिचे कुटुंब या लेखनातून वाचकांपुढे उभे राहते. त्यात कोठेही उदात्तीकरण केलेले नाही. व्यक्तिमत्त्वाचे वास्तव दर्शनच घडवलेले आहे. तसलिमाचे वडील रजब अली डॉक्टर आहेत. देखणे, बुद्धिवादी, अहंकारी आहेत. स्वत:च्या पुरुषपणाचा त्यांना अभिमान आहे. तर आई कुरूप, कमी शिकलेली आहे. आपला नवरा कधीही आपल्याला तलाक देईल या भीतीने कायम धास्तावलेली आहे. या विजोड जोडप्याला चार मुले आहेत. तसलिमा स्वत:चे पूर्वायुष्य, त्यातील व्यक्ती, त्यांचे वागणे, बोलणे, स्वभावविशेष याबद्दल औचित्य-अनौचित्याचे दडपण न ठेवता लिहिते. तसलिमांच्या व्यक्तिमत्त्वात आणि तिच्या पारिवारिक ताण्याबाण्याचा प्रभाव मोठाच पडलेला आहे. तसलिमांचे संवेदनशील मन पानोपानी प्रकट होते. तीच या लेखनाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रसंगातून तसलिमाचं बंडखोर व्यक्तित्व वाचकाला जागवत राहते.
-
Shunya Aani Bindu (शुन्य आणि बिंदु)
शून्य आणि बिंदू यातील फरक तू जाण नाही कळलं तर कबूल कर अज्ञान ! जीवनाचं अतिंम सत्य साठीनंतर कळतं साठीनंतर माणसाचं मन सत्य शोधात पळतं !
-
Gabhallela Aabhal (गाभाळलेलं आभाळ)
कुणाच्या खांद्यावर ठेवू मान कानाच्या चरणी टेकवू माथा येत-जाता, जो-तो गातो आपल्याच ओव्या आपल्याच गाथा रामायणाने शिकवलं माणसाने कसं जगावं महाभारताने शिकवलंय आपण कसं मारावं