-
Pariman (परिमाण)
विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या सानिया यांच्या कथांचा `परिमाण’ हा नवा कथासंग्रह. मध्यम किंवा उच्चमध्यमवर्गीयांचे जीवन, त्यातले भोगोपभोग, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या कौटुंबिक किंवा वैवाहिक जीवनातले ताण आणि तणाव यांची सूक्ष्मचित्रणे सानिया यांच्या या कथांमधून येतात. प्रौढ स्त्री-पुरुषांमधले अनुबंध हा विषय त्यांच्या कथांमधून येतो. मात्र व्यक्ती, परिसर व त्यांचे व्यवसाय भिन्न भिन्न राखल्याने कथा रोचक व सुरस होतात. खूप काही चांगले, अर्थवाही, पृथगात्म वाचल्याचा प्रत्यय या कथा देतात. रूढार्थाने कथानक नसलेल्या या कथा एक प्रकारच्या आंतरिक उसळीतून, उमाळ्यातून आलेल्या असतात. कथा आकर्षक होण्यासाठी घ्यायचे विषय, लेखनात चलाखी किंवा दिखाऊ कारागिरी या कथांमध्ये दिसत नाही. व्यक्तींमधील मानसिक, भावनिक संबंधांना त्यांच्या कथांमध्ये महत्त्व असते. समकालीन तरुण पिढीचं चित्रण त्यांच्या या कथांमधून आढळतं.
-
Hatya (हत्या)
श्री.ना. पेंडसे यांच्या कादंमबरीविश्वात 'ह्त्या' ही कादंमबरी विशेषत्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तावाच्य्या पातळीवरील, तर्कसंगत आणि ह्रदय अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादाम्बरिसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खर्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली;परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने, पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाडःमयाभिरुचिच्या चौकटीत न बसणारी गोष्टी होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दू:खार्त अशी मान्दानी करणारी आणि काळजाला हात घालणारी ही कादंबरी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबर्यांच्या विकासाची बिजी या कादंबरीत सुप्त्पने विखुरलेली दिसतात. 'ह्त्या' च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील 'हीरो' ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे.
-
Vajanatil Chadhautar (वजनातील चढउतार)
भारतातील लठ्ठपाणावरील वैद्यकीय चिकित्सेचे जन्मदाते म्हणून डॉ. विनोद धुरंदर यांना ओळखले जाते. १९४५ साली एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बालचिकित्सेवरील पदवी मिळविली. त्यानंतर हेक्स्ट ङ्गार्मा, पार्क डेव्हिस ङ्गार्मा या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. मुंबई महानगर पालिकेचे दवाखाने आणि शाळा यांमधून वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्याचप्रमाणे मुंबईतील केइएम इस्पितळातही काही काळ ते कार्यरत होते. सुरुवातीच्या काळात स्वतः लठ्ठ असलेले डॉ. विनोद धुरंधर यांनी स्वतःवरच वजन कमी करण्याचे विविध प्रयोग केले आणि नंतर लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये उपचार केंद्र सुरू केले. पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपचार केंद्राचा आजवर सुमारे पावणेदोन लाखांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. All India Association for advancing Research in Obesity ( AIAARO) ‘ना नफा ’ तत्त्वावर चालणार्या व्यावसायिक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अन्न आणि आहार या विषयावर एम.एस. पदवी प्राप्त केलेले डॉ. निखिल धुरंधर हे डॉ. विनोद धुरंधर यांचे पुत्र असून लठ्ठपणा या विषयावरील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. रॉचेस्टर सेंटर फॉर ओबेसिटी रिसर्च ऍण्ड ट्रिटमेंट या संस्थेचे मानद संचालक म्हणून काही वर्षे डॉ. विनोद धुरंदर कार्यरत होते. ‘द ओबेसिटी सोसायटी’ या संस्थेच्या विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. सध्या ते अमेरिकेतील पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटर, इन्फेक्शन्स ऍण्ड ओबेसिटी लॅबोरेटरी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी’, ‘ओबेसिटी रिसर्च’, ‘द ओपन ओबेसिटी जर्नल’ या लठ्ठपणाशी संबंधित नियतकालिकांच्या संपादकीय कार्यकारिणीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडियाचा १९९० सालचा ‘युवा वैज्ञानिक पुरस्कार’ त्यांना लाभला होता.
-
Charles Dickens (चार्ल्स डिकन्स)
' पिकविक पेपर्स ', ' ऑलिव्हर ट्विस्ट', ' डेव्हिड कॉपरफील्ड', ' ए टेल ऑफ टू सिटीज' या कादंब-यानी पाश्चत्य साहित्यविश्वात अजरामर झालेल्या चार्ल्स डिकन्सने कादंबरीकार म्हणून मानाचे स्थान मिळवले. साहित्याच्या क्षेत्रात त्याने सातत्याने केलेले विविध प्रयोग व त्याचा विविधांगी कार्यातुन प्रकटनारे सामाजिक बहन यांमुळे त्याला न भूतो न भविष्यात अशी प्रसिद्धी मिळाली. १८१२ साली इंगलैंडमध्ये जन्माला आलेल्या डिकन्सने तत्कालीन सामाजिक परिस्थितच्या पार्श्वभूमीवर आपले महत्वपूर्ण लेखन केले. घरच्या आत्यंतिक गरीबीमुळे लहानपानीच हलाकिसलकी कामे करण्याची वेळ त्याच्यावर आली. त्या परिस्तिथिवर कष्टपूर्वक मात करत त्याने आपले कर्तुत्व सिद्ध केले. पत्रिकारितेपासून सुरवात करत कादंबरी, कथा, कविता, नाटक, अशा बहुविध साहित्यप्रकारांत त्याने आपला कायमचा ठसा उमटवला. त्यावेळच्या इंगलैंडमधील बालकामगारांचे शोषण, गुन्हेगारी, दारिद्र्य, निरक्षरता , राज्यकत्यांची अनास्था यांकडे त्याने आपल्या लिखानापासुन सार्र्या जगाचे लक्ष वेधले. डिकन्सच्या या जीवन यात्रेची, त्याचा साहित्यसेवेची, त्याचा प्रेमजीवनाची, समग्र कहानी प्रदीप कुलकर्णी ह्यानी अतिशय प्रासादिक शैलीत शब्दबद्ध केली आहे.
-
Ramabai Mahadevrao Ranade-Vyaktitva Aani Kartutav
एकोणिसावे शतक हा महाराष्ट्राचा प्रबोधनाचा कालखंड . थोर विचारवंत आणि समाजसुधारकांचा परिसस्पर्श लाभलेला महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा गौरवशाली कालपट . याच काळात स्त्रियांच्या दुःस्थिती - निवारणाचे महत्त्वपूर्ण कार्य ज्या काही मोजक्या स्त्रियांकडूनही घडले , त्यांपैकी रमाबाई रानडे हे एक ठळक नाव . खरेतर सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने घेण्यायोग्यतेचे नाव . मात्र त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा जेवढा परिचय देशवासियांस व्हावयास हवा होता तेवढा दुर्दैवाने झालेला दिसत नाही . खुद्द महाराष्ट्रालाही त्यांचे विस्मरण झाले आहे की काय अशीच परिस्थिती अपवाद वगळता जाणवू लागली होती . २०१२ हे वर्ष रमाबाईंचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्म - वर्ष . या निमित्ताने त्यांचे असाधारण जीवन आणि अतुलनीय कार्य परिचित करून देण्याचा स्तुत्य उपक्रम मॅजेस्टिक प्रकाशनने हाती घेतला आणि विलास खोले यांच्यासारख्या जाणकार , संशोधक प्रवृत्तीच्या लेखकाने रमाबाईंचे चरित्र सिद्ध करून तो तडीस नेला .
-
Satya agrahi Ambedkar (सत्यआग्रही आंबेडकर)
"... सत्य म्हणजे काय, याची खून सत्याग्रहिस पटने आवश्यक आहे. ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे ते सत्कार्य, त्यासाठी केलेला आग्रह हा सत्याग्रह बुद्धिशुद्ध नसेल, टार लोकविग्रह होइल. जिथे लोकसंग्रह आहे, तिथे सत्कार्य आहे; ही आमची विचारसरणी आहे.." "हिंसा, अहिंसा ही केवळ त्या अग्रहाच्या सिद्धिची साधने आहेत, जसे कार्याच्या अनुरोधाने अग्रहाचे नैतिक स्वरुप बदलत नाही. कारण, एखाद्या दुराग्रहिने आपला आग्रह पार पाडण्यास अहिंसेचे मार्ग म्हणून सत्याग्रह केला, तर त्याचा दुर्ग्रहाला सत्याग्रह म्हणता यावयाच नाही." ' बाबासाहेबांचे सत्याग्रहसबंधची विचार खरोखर चिंतन व मनन करण्यासारखे आहेत. त्यांच्या या व्याख्येची फुटपट्टी म. गांधीजीनी पुढील काळात गांधीजींचा आदर्श समोर ठेवालेल्याना लावली, तर त्यांचा सत्यग्रहामध्ये त्यांच्या ' स्व ' दुराग्रहाचा अंश अधिक होता, असेच आढळून येइल.'
-
Asa Ghadala Bharat (।। असा घडला भारत ।।)
भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे. गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !