-
Sthitpragya Darshan (स्थितप्रज्ञ-दर्शन)
बुध्हि कुणाच्या ठिकानीं कमी असो, कुणाच्या ठिकानीं अधिक असो, त्याचें महत्व नाही. महत्व आहे स्वच्छ बुध्हिचें. अग्नीची एक लहानशी ठिणगी कापसाच्या ढीगाली जाळू शकते. उलटपक्षी भला मोठा कोळसा असला तरी तो दाबुन जातो. बुध्हिच्या कमीजास्तपाणाचा प्रश्न नाही. निखल बुध्हिची एक लहानशी ठिणगी, एक लहानशी ज्योत असली तरी पुरें. बुध्हिच्या शक्तिची हीच खूबी आहे. शारीरिक शक्तिचें तसें नाही. एखाद्या अल्पबुध्हीच्या आणि अशिक्षित मानासालाही या जन्मात स्थितप्रज्ञ होण्याची शक्यता नि:संशय आहे. त्याला भाराभर बुध्हिची गरज नाही. प्रज्ञेची एक ठिणगी पुरे.
-
Karya Aani Karyakarte (कार्य आणि कार्यकर्ते)
समाजकार्य करणे ही फॅशन झाली आहे; पण आजही तळमळीचे कार्यकर्ते सामासाठी काम करीत आहेत. वंचितांसाठी लढत आहेत. अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे काम, त्यांचे अनुभव 'कार्य आणि कार्यकर्ते' मधून वाचायला मिळतात. मरा[...]
-
Vivah Te Varshasanachi Gani ( विवाह ते वर्षसणाची ग
देवपूजन,घाना, गौरीहार, मंगलाष्टका, सप्तपदी ,विहीन ,झाल, आंबा शिंपने यांसारख्या विधी आणि विविध प्रकारची आधुनिक व पारंपारिक नावं - उखाणे .
-
Jag Janukanche (जग जनुकांचे)
शेकडा दोन टक्के व्यक्ती जनुकदोषांचा कसलाही पूर्वेइतिहास नसताना सव्यंग जन्मतात. हे दोष गर्भाध्ये शारीरिक व्यंगाच्या किंवा बुध्दिमांद्याच्या स्वरूपात दिसू शकतात. जनुकशास्त्रासंबंधित समस्यांबाबत थोडीशी काळजी घेतली, योग्य सल्ला मिळाला तर हे रोग निश्चित टाळता येतील. अशा इच्छेपोटी उपजलेले हे पुस्तक...
-
Sankhyadarshan (संख्यादर्शन)
संख्याशास्त्राचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. त्याचा शास्त्र म्हणून विकास झाला तो गेल्या दीड-दोन शतकांत. शेती, व्यापार, जगनणना वगैरे क्षेत्रांत संख्याशास्त्र वापरले जातेच, पण कोणत्याही विज्ञान क्षेत्रातील प्रयोगांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी संख्याशास्त्र हे एकमेव साधन आहे. संगणकामुळे संख्याशास्त्रातील आकडेोड गतीने होऊ लागली आणि संगणकही या शास्त्राचा अविभाज्य घटक बनला. ही रोचक आणि अभ्यासपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक.
-
Kaliyug (कलियुग)
‘मला विकत घेता येणं शक्य आहे असं मालकांना वाटणं यातच माझा पराभव आहे; म्हणूनच मित्रांनो, मी तुमच्या कामगार संघटनेचं, नेतृत्व करण्यास अपात्र आहे’ या भूमिकेतून कामगार लढ्याला रामराम ठोकणारे आणि सध्या काब्रा अँड मल्होत्रा प्रा. लि. चे असोशिएट व्हाइस प्रेसिडेण्ट असणारे कत्रे... पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात कामगार – संघर्ष प्रवेशतो आणि मोकाट सोडतो त्यांच्यातल्या हिंस्र श्वापदाला... औद्योगिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवरची हमो मराठे यांची आणखी एक सशक्त लघुकादंबरी कलियुग.
-
Chorghade yanchi Katha (चोरघडे यांची कथा)
मराठी कथा ज्या महत्त्वाच्या कथाकारांनी नावारूपाला आणली त्यांच्या निवडक कथांचे संपादित संग्रह कॉन्टिनेन्टलने वेळोवेळी प्रकाशित केले आहेत. त्यांपैकी चोरघड्यांची कथा जुनी लघुकथा आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नवकथा यांना जोडणारा दुवा म्हणून मान्यता पावली आहे. प्रस्तुत संग्रहात या कथेचे पुरेसे दर्शन वाचकांना घडेल.
-
Freedom At Midnight (फ्रीडम अॅट मिडनाईट)
भारतीय लेखकाने नव्हे, इंग्लीशमननेही नाही तर फ्रेंच व अमेरिकन जोडगोळीने लिहिलेली भारतीय स्वातंत्र्याची रोचक कहाणी भारतीय स्वातंत्र्याच्या संपूर्ण लढ्याचा हा इतिहास नसून हा लढा भारतीय स्वातंत्र्याकडे कसा गेला, ह्या स्वातंत्र्याचा मुहूर्त कसा ठरला, त्यासाठी काय हालचाली झाल्या, काय उलथापालथी झाल्या व त्या कोणी कशा केल्यात ह्याचा छडा लावण्याचा हा विलक्षण वाचनीय प्रयत्न केवळ ऐकीव वा लिखीत माहितीवरच आधारलेला नव्हे तर संबंधित व्यक्तींना समक्ष भेटून त्याची शहानिशा लावणारा त्या ऐतिहासिक मध्यरात्रीपर्यंतच येऊन हे लेखन थांबलेले नाहीतर ह्या लढ्यातील सर्वार्थाने एक आगळेच व्यक्तिमत्त्व ठरलेल्या महात्मा गांधीच्या अखेरीपर्यंत येऊन ते थबकलेले आहे, त्याने वाचकांना दिढमूढ करून टाकलेले आहे. अनुवादही तितकाच उत्कंठावर्धक.
-
Vadyavedh (वाद्यवेध)
कंठसंगीत अधिक प्रिय असलेल्या महाराष्ट्रात वाद्यसंगीताबद्दल आस्था निर्माण होण्याची क्षमता फक्त वाद्यांची माहिती देऊन होणार नाही. वाद्यांची माहिती देणारी पुस्तके भरपूर आहेत; परंतु सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक शिवाय वस्तुनिष्ठ ग्रांथिक आणि प्रत्यक्ष अनुभवाधिष्ठित अशी साग्रसंगीत, नुसती माहिती नव्हे तर ज्ञान वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्त्वे या पुस्तकातून होते.या पुस्तकाचे दोन भाग आहेत.पहिला भाग वाद्यांविषयी आहे तर दुसरा भाग भारतीय संगीताच्या मूलतत्त्वांबद्दल बोलतो. कोणत्याही ज्ञानशाखेचे शास्त्र आणि कला पक्ष, हे एकमेकांत किती प्रेमाने सामावलेले असतात हे या पुस्तकातून सहज प्रतीत होते.
-
Madhushala (मधुशाला)
हिन्दी गीति-काव्य के महान कवी बच्चन की 'मधुशाला' ने ७५वे वसन्त की भीनी और मोहक गन्ध के बिच मदभरा स्वप्न देख लिया। स्वप्न ऐसा की जो भविष्य की ओर इंगित करता है की अभी और बरसेगा मधुरस और पियेगे अभी पाथाकगन, युगों-युगों तक याद रहेगी 'मधुशाला'। रस भीनी मधुरत मैं डूबी यह वह 'मधुशाला' है, जिसने पहला वसन्त १९३५ मई देखा और अब तक कई पीढ़ियों ने इसका रसपान किया। 'मधुशाला' की एक-एक रुबाई पाठक के रागात्मक भावों को जगाकर उसके कोमल और एकान्तिक क्षणों को अद्भुत मादकता मैं रसलीन कर देती है । स्वर्ण जयन्ती के अवसर पर बच्चन जी लिखी गई चार नै रुबाइया भी पुस्तक शामिल कर लि गई हैं।
-
Bahushrutatechi Margadeepika (बहुश्रुतातेची मर्गाद
' जी नवीन माहिती आपणास मिळाली असेल ती आपल्याजवळील नोंद वहीत संग्रहित करून ठेवण्याचीही सवय असणे अत्यावश्यक आहे. आणि आवडीने अशी नोंद घेतलेली माहिती खरी आहे याची नोंद करत रहा. अशी खात्रीशीर नवी सवडीनुसार अधूनमधून वाचण्याची सवय ठेवल्याने हि माहिती कायम लक्षात राहण्यास मदत होते. एकपाठी, द्विपाठी, त्रिपाठी असे माणसाच्या स्मृतीबाबत प्रकार आहेत. काही व्यक्ती एकदा, काही व्यक्ती दोनदा तर काही व्यक्ती तीनदा वाचल्यावर त्यांच्या ध्यानात ती गोष्ट पक्की बसते. मात्र सामान्य माणसाला स्मरणशक्ती ताजी- तवानी ठेवण्यासाठी वेळोवेळी गोष्टींचे अध्ययन, पठण आवश्यक असते व तेच केल्याने त्याचे व्यक्तिमतत्व प्रभावी होते जाते.'