-
Majhi Mulukhagiri (माझी मुलुखगीरी )
निसर्गाचं वेड लावणारं सोंदर्य अनुभवत मिलींद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडापासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवापर्यंत अन पालच्या अभयरण्यापासून ते तडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातल्या काही ठिकाणं ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळ्या सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी 'भटक्याला' हि माहीत नाहीत.आज भटकंती करणा-याची संख्या वाढत आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक. खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छ णा-या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी... माझी मुलुखगीरी....
-
Shilaharkalin Nagari Dive Aagar (शिलाहारकालीन नगरी
दिवेआगार... कोकण किना-यावरील निसर्गरम्य गाव. केवढा प्रदीर्घ आणि रोमांचकारी इतिहास ह्या गावाला ! तो प्रकाशात आला तिथे घरच्या अंगणात 'सुवर्ण गणपती' सापडला त्यामुळे. असं बरंच जुनं, शिलालेखादी साहित्य तिथे आढळत आहे. त्याबरोबर, 'श्रीवर्धनी रोठया' मुळेही हे गाव प्रसिद्धीत असतं अशा बहुढंगी, समृद्ध गावाची ललित शैलीतील ही मनोरम कहाणी.
-
Smita, Smit Aani Me (स्मिता स्मितं आणि मी)
मला दिसलेली, मला उमजलेली, मला जाणवलेली, मी अनुभवलेली आणि मी समजून घ्यायचा प्रयत्न केलेली - अशी ही स्मिता. आणि म्हणूनच या पुस्तकातली स्मिता सुरवातीपासून शेवटपर्यंत माझाच संदर्भातली. तिचं असणं आणि तिचं जिवाला चटका लावून जाणं, सगळंच कसं मनावर कोरल्यासारखं आखीव-रेखीव! असं वाटतं, कुठच्याही क्षणी तिची हाक ऐकू येईल - कशी आहेस? आणि पाठोपाठ तिचं ते मुक्त, मोकळं, मनापासून हसणं! दुर्दैवानं तिचं हे 'असणं' आणि 'हसणं" आता उरलंय फक्त आठवणीतून.
-
Kabandha (कबंध)
गूढकथा म्हणजे काय ? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले. परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का ? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्ति-चित्रण, मनाची पकड घेणार्या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरण-निर्मिती, या सार्यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणार्याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे. अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले. पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल. एवढी खात्री नक्कीच आहे.
-
Rangandhala (रंगांधळा)
मध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी 'खळ्ळ्' आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले ! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती. आणि दार सावकाश उघडू लागले होते.... जागच्या जागी खिळल्यासारखा, जगन्नाथ ते दृश्य पाहत राहिला. दारात एक जख्ख म्हातारा उभा होता. बोडका. लांबुडक्या डोक्याला तुळतुळीत टक्कल पडलेले, चेहरा सुरकुत्यांनी मढलेला. गालाची हाडे वर आलेली, आणि अस्थिपंजर शरीर. डोळे मात्र निखा-यासारखे चमकत होते. नजर जगन्नाथवर रोखलेली होती. जगन्नाथने किंकाळी मारली, पण ती ओठातून बाहेर फुटलीच नाही. त्या बोडक्या म्हाता-याने त्याला आपल्याबरोबर चलण्याची खूण केली. जगन्नाथ चालू लागला. खरेतर त्याला जायचे नव्हते, पण स्वत:च्या इच्छाशक्तीवर जणू त्याचा ताबाच राहिलेला नव्हता. ....सर्व शक्ती एकवटून तिथून पळून जावे, असे वाटत होते, पण मनाचे सांगणे पाय मानत नव्हते. कुठे निघाले होते ते दोघे ? अगदी नेहमीच्या वास्तवातून उठवून, रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचे बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पाने उलटत जातो... तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणा-या, मतकरींच्या वैशिष्ट्यपूर्ण आगळ्यावेगळ्या गूढकथांचा संग्रह.