-
Manavi Manogunancha Shodh Ghenarya Katha
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोपर्यातल्या जनमासाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत. या कथांमधील आशावाद, बुद्धीवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटकून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे 'अशक्य' शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या आयुष्याचा मार्ग उजळून टाकणार्या आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखाद्या मित्र-मैत्रिणीला स्फूर्ती द्यावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण द्यावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हृदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्की उपयोगी पडेल.
-
Kharekhure Idals ( खरेखुरे आयडॉल्स )
समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या कार्यमग्न, प्रेरक व्यक्तिमत्त्वांची ओळख तसेच पथदर्शक अन् प्रेरणादायी प्रयोग-प्रयत्न-प्रकल्पांमधून नवा भारत घडवणा-या लोकांच्या विचारांचा मागोवा घेणारं पुस्तक!
-
Nirbachit Kalam (निर्बाचित कलाम)
पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि स्त्रीमुक्ती ह्यांविषयी जे काही बोलले जाते, त्यामध्ये बांगलादेशच्या लेखिका तसलिमा नासरिन यांचा आवाज नि:संशय सर्वाधिक वरचा आणि सर्वांत अधिक खळबळ माजविणारा आहे. रूढी न मानणार्या, वादविवादपटू आणि स्पष्टवक्त्या तसलिमा यांच्या ह्या पुस्तकामुळे बांगलादेशात प्रचंड वाद उठले आणि त्यामुळे तसलिमा चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या. त्यांच्या ह्याच धक्कादायक पुस्तकाला 'आनंद-पुरस्कार’ मिळाल्यामुळे आपल्या देशातही विविध स्तरांवर कुतूहल जागृत झाले. या विस्फोटक पुस्तकात मूळ लेखांबरोबरच, त्याच प्रकारच्या आणखी काही लेखांची भर घालण्यात आली आहे. या पुस्तकात, लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी, कोणताही आडपडदा न ठेवता, लिहिल्या आहेत. ह्या आठवणी अतिशय कटू आहेत; पण त्या अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत, ह्यात शंका नाही. या पुस्तकात, पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोगवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्र् सुद्धा, कशी बेडी अडकवू पाहते; एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे, व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पतिपत्नी-संबंधांत - थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात - पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टी दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयी आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.