-
Out Of The Box
क्रिकेट म्हणजे भारतीय नागरिकांचा श्वास असे म्हटले जाते. जगात कोठेही भारतीय संघ सामना खेळत असू दे, तो पाहण्यासाठी दूरचित्रवाणीसंचासमोर ठाण मांडून बसलेले क्रिकेटवेडे रसिक पाहायला मिळतात. या खेळाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची सवय हर्ष भोगले यांनी लावली. किक्रेटचे समालोचन कसे करावे याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. खेळ चालू असताना, संपल्यावर व अन्य वेळी ते जे विश्लेषण करतात ते वाचून, ऐकून सामना न पाहिलेल्यांनाही तो प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव येतो. आवाज, अचूक व चपखल शब्द, माहितीचे भांडार व महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे हर्ष भोगले हे नाव क्रिकेटशी संबंधित सर्वांनाच ओळखीचे आहे. त्यांच्या या अनुभवाचा प्रत्यय वाचकांना ‘आऊट ऑफ द बॉक्स’ या पुस्तकातून येतो. यात त्यांनी या खेळातील अनेक ‘आऊट ऑफ’गोष्टी सांगितल्या आहेत. कोणालाही न दुखवता, कोणावरही टीका न करता व कोणावरही राग धरता त्यांनी या खेळाबद्दल, खेळाडूंबद्दल अनुभवकथन केले आहे.
-
Karmayogini Nivedita
अठराव्या व एकोणीसाव्या शतकाच्या संधीपर्वात जगावर दूरगामी परिणाम करणारया दोन घटना घडल्या. अठरावे शतक संपायच्या एक दशकआधी, शिकागो सर्व धर्म परिषेदेपासून स्वामी विवेकनंदांनी अध्यात्मिक ज्ञानाचा सुवर्णध्वज जगात फडकवला. जे शाश्वत, सनातन, अद्वैत, तत्वज्ञान, आद्यशंकर चर्यांनी भारतात रूजविले त्याचे एकप्रकारे जागतिकीकरण स्वामी विवेकनंदानी सारया विश्वात करून टाकले. असेच एक समप्रित व्यक्तीमत्व, वंशाने आयरिश, रंगाने गोरया असूनही भारताच्या पारतंत्राच्या काळात भारतातील गोरगरीब, अशिक्षीत आणि पिडीत लोकांसाठी आपले सर्वस्व अर्पण करून वयाच्या ४४ वर्षी भारतात सेवा करत असताना आपला देहसुद्धा या मात्तीत अर्पण करण्यारया भगिनी निवेदिता (मार्गरेट नोबल); ज्यांनी स्वामी विवेक नंदांचे शिष्यत्व पत्करले व एन तारुण्यात आपला प्रगत देश सोडून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी लेखन करून, व्याख्याने देऊन, स्त्रियांसाठी शाळा काढून, एवढच नव्हे तर भारताला राष्ट्रध्वजाची संकलल्पना दिली. त्याच भगिनी निवेदितांचे हे प्रेरणा दायी चरित्र.
-
Sarvansathi Pranayam
नाडीशुद्धी प्राणायामास प्राणयमांचा राजा म्हटले जाते. संपूर्ण लक्ष श्वसनाकडे, श्वसनाच्या प्रमाणाचे पालन केल्याने, प्राणधारणा झाल्याने बाहेरील वातावरणातून येणारया संवेदेनांकडे लक्ष जात नाही. मन आत वळून एकाग्र झाले की शरीराच्या आतील भागाकडून येणारया संवेदना जाणवू लागतात . अशावेळी बौद्धिक विश्लेषणाचे काम अहंकाराशी संबंधित असणारे विचार प्रवाह संपतात. मन शांत शिथिल होते, स्थिर होत जाते. मनातील खळबळ, चिंता, अस्वस्थता कमी झाल्याने भावनांचा प्रकोप व ताण नाहीसा होतो. व्यक्तिमत्व विकसित होऊन पुर्णत्वाकडची वाटचाल विकसित होऊ लागते. ध्यानासारख्या प्रगत तंत्राची पूर्वतयारी म्हणून या अभ्यासाचा उपयोग होईल.
-
Katha Maruti Udyogachi
भारताने १९८० च्या दशकात तंत्रज्ञान व आधुनिकीकरणाची कास धरली. याच काळात म्हणजे १९८३ मध्ये भारताची पहिली अत्याधुनिक गाडी ‘मारुती’ रस्त्यावर धावू लागली. ‘मारुती उद्योग’ या सार्वजनिक उद्योगाची स्थापना झाली. जपानी कंपनीच्या सहकार्याने ‘मारुती’ने इतिहास घडविला. औद्योगिक क्रांतीबरोबरच अनेक वाहन उद्योग देशात उदयाला आले. ‘मारुती’चा हा सुवर्णप्रवास मारूती सुझुकी कंपनीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी ‘कथा मारुती उद्योगाची’मधून कथन केला आहे. आणि मराठी अनुवाद महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य उप संपादक जॉन कोलासो यांनी केला आहे. भारतीय उद्योगाच्या विकासाची वाटचाल यातून जाणून घेता येते.
-
Sattantar
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.