-
Sugraniche Vidnyan (सुगरणीचं विज्ञान)
माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हापासून त्याच्या उत्क्रांतीतील वाटचालीनं एक महत्त्वाचं वळण घेतलं. किंबहुना माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हाच ङहन्टर गवररछ हे स्वरूप सोडून त्यानं आपल्या सुसंस्कृत आधुनिक मानव बनण्याच्या वाटचालीला सुरुवात केली. अन्न शिजवून खायला लागल्यामुळे पचनसंस्थेत जसे उत्क्रांतिनुरूप बदल होत गेले तसा माणसाचा सांस्कृतिक विकास होत गेला. आयुर्वेदात शिजवणं या प्रक्रियेला अन्नावर संस्कार करणं असंच म्हटलं आहे. म्हणजेच शिजवण्याची प्रक्रिया हीही एक वेगळ्या अर्थानं संस्कृतीजन्य प्रक्रिया ठरते. खाण्याजोगं अन्न तयार करणं यासाठी उष्णता देण्याआधीही काही प्रक्रिया कराव्या लागतात. पूर्वतयारी करावी लागते. प्रमाण नेमकं किती असावं याचं व्यवधान राखावं लागतं. ही सगळी अवधानं पार पाडताना आपण एक वौज्ञानिक प्रक्रियाच पार पाडत असतो याची जाणीव सुगरणींना असतेच असं नाही. त्या प्रक्रियेपाठी विज्ञानाची जी संकल्पना अनुस्यूत आहे असं मी मानलं ते कितपत बरोबर आहे? आणि सवा|त महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची विज्ञानाशी फारशी जवळीक नाही अशा सुगरणींना हे विज्ञान कितपत रुचेल? की तो घास गळ्याखाली उतरणारच नाही? अशा प्रश्नांची उकल करणारे हे पुस्तक.
-
I lost My Love In Bagdad (आय लॉस्ट माय लव्ह इन बगद
आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद लहानपणापासून लष्कर, शस्त्रास्त्रं, युद्ध याबद्दल खूप कुतूहल आणि आकर्षण असलेला मायकेल हेस्टिंग्ज मोठा झाल्यावर ङन्यूजवीकछचा वार्ताहर होतो आणि इस्राइल, व्हिएतनाम इत्यादी ठिकाणी अनुभव घेतल्यावर त्याची नेमणूक इराकमधील वार्ताहर म्हणून होते. ते काम त्याला आवडतं; परंतु त्याच सुमारास अॅन्डी या अतिशय हुशार, सुरेख आणि आदर्शवादी तरुणीच्या तो प्रेमात पडतो आणि एकमेकांपासून दूर राहणं दाघांना खूप जड जातं. आदर्शवादी अॅन्डी सद्दामच्याधील राजकीय पक्षांना लोकशाही मूल्यं प्रस्थापित करण्यास मदत करण्याच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि मायकेल आहे त्या देशात राहायला मिळेल म्हणून इराकमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक इन्स्टिट््यूटमध्ये नोकरी मिळवून बगदादला येते, उत्साहानं कामाला लागते. परंतु इराकमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट असते. जी हिंसा चालू असते, ती विश्वास बसणार नाही, कल्पना करता येणार नाही, समजणार नाही अशी असते. अमेरिकन सौनिकांच्या मनातही कडवटपणा असतो, कठोर उपहास असतो. किती अमेरिकन कुटुंबांचा सत्यानाश करीत असतं हे युद्ध हे त्यांच्या सरकारला समजत नसतं? 2006 साल संपतं तेव्हा छत्तीस हजार इराकी मेलेले असतात, आठशेहून जास्त अमेरिकन्स मेलेले असतात, पन्नास कोटी डॉलर्स खर्च झालेले असतात. शिया आणि सुन्नी एकमेकांना तर मारत असतातच; परंतु अमेरिकन लष्कर आणि अमेरिकन माणसं तर तेथे कोणालाच नको असतात म्हणून तेही मारले जात असतात. अशा भयानक वातावरणात उत्साह आणि चिकाटी टिकवून धरून काम करूपाहणार्या मायकेल आणि अॅन्डीच्या प्रेमकथेचा जो अत्यंत दुर्दैवी आणि भयानक अंत होतो, त्याबद्दल प्रत्यक्षच वाचा.
-
Nothing To Lose
होप’ आणि ‘डिस्पेअर’च्यामध्ये जी सीमारेषा होती, ती खरोखरच रस्त्याच्यामध्ये एक रेषाच होती. एका गावाचा रस्ता संपून दुसNया गावाचा जिथे सुरू होतो, तिथे ती सीमारेषा तयार झाली होती. ‘होप’ म्हणजे ‘आशा’ तर ‘डिस्पेअर’ म्हणजे ‘निराशा.’ जॅक रीचरला कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे त्याला चालत जावे लागते, फक्त एक कप कॉफी साठी. पण त्याला रेस्टॉरंटमध्ये आलेल्या चौकडीमार्पÂत जाळ्यात अडकवले जाते. चूक... चूक... चूक... ते चुकीच्या माणसाला धरतात. जॅक रीचर हा त्याच्या क्षेत्रात मोठा असतो कामधंदा नसलेला, कायमस्वरूपी पत्ता नसलेला, सामानसुमान नसलेला फक्त मनस्वी जिज्ञासू. भटकेपणाचा आरोप ठेवून त्याला गावातून हद्दपार केले जाते. अशी कोणती गुपितं आहेत की जी स्थानिक प्रशासनाने दडवून ठेवली आहेत? मिलिटरीतून निवृत्त झालेला अतिशय कठोर वृत्तीचा जॅक रीचर हे नाजूक धागे पकडून अमेरिकेच्या सर्वात मोठ्या प्रतिष्ठा धुळीला मिळविणा-या धक्कादायक आणि गूढ प्रकरणाचे कारस्थान उकलण्यासाठी सज्ज होतो. कारण काहीही झालं तरी जॅक रीचरला काहीच गमवावं लागणार नव्हतं. एक रहस्यमय थरारकथा म्हणून या पुस्तकाकडे बघता बघता त्या वाटेने सुरू झालेला प्रवास देशभक्ती, कडवे धर्मवेड अशा अनेक भावनांपाशी, आग्रहांपाशी येऊन थांबतो. कोणतीही गोष्ट जेव्हा अतिरेकाकडे झुकते तेव्हा ती दुराग्रहामध्ये रूपांतरित होते. या दुराग्रहांचे, माथेफिरू धर्मवेडाचे जे दर्शन या पुस्तकात घडते ते भयचकित करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ एक रहस्यमय थरारकथा राहात नाही; तर ते मानवी प्रवृत्तींना आव्हान देत राहते.
-
Digital Fortress
एन.एस.ए. या संस्थेने एका महासंगणकाच्या साहाय्याने कोणत्याही गुप्त मजकुराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकुराचा भेद मात्र त्यांच्या महासंगणकाला करता येईना. पाच मिनिटात होणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदर गणितज्ञ स्त्री होती. तिला त्या वेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. एन.एस.ए. संस्थेला ओलीस धरले गेले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे, तर फक्त एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका राष्ट्र पांगळे होण्याची वेळ जवळ येत चालली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत पळापळ करावी लागली. तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. शेवटी काय झाले? ते या खिळवून ठेवणार्या, श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शौलीत अनुवाद केलेल्या कादंबरीत वाचा.
-
Annapuraan
चरकाचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी आहारातून रोग उत्पन्न होतात असें म्हटले आहे. त्याकाळी पाणी व आहारद्रव्ये प्रदुषित व भेसळयुक्त नव्हती. आज २१ व्या शतकात प्रदूषण, रासायनिक खते व भेसळ यामुळे आहारद्र[...]
-
Seawitch
समुद्र म्हटला की संघर्ष! जीवन-मरणाचा संघर्ष! असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणार्यांचा एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाचे अंगार फुलतात. समुद्र म्हटला की साहस! ...एका तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर म्हणजे त्याच्या साम्राज्याचे केंद्र. हा तेलसम्राट. संपत्तीच्या जोरावर काहीही करण्याची हिंमत असणारा. त्याची दोन मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी! संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांनी रंगलेले एलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.