-
South Boy Java Head
दुसर्या महायुद्धात पृथ्वीवरील पूर्व गोलार्धात जपानने सागरावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा वेळी एक तेलवाहू बोट धाडसाने प्रवास करीत होती. त्यावर निर्वासित व ब्रिटिश सैन्यातील माणसांनी आश्रय घेतला होता. पुढच्या तीन महिन्यांच्या जपानच्या आक्रमणाची लष्करी गुपिते असलेली कागदपत्रे घेऊन एक हेर पळून जात होता. तर बहुमोल किंमतीचे हिरेही या धामधुमीत हलवले जात होते. शेवटी यातून बॉम्बिंग, जाळपोळ निर्माण होत गेली. त्या थरारक पाठलागात एक दोन वर्षांचे अनाथ पोर सापडले. आठवडाभर पाण्यावरून हालअपेष्टा सहन करीत किनारा गाठला. पण विमाने, पाणबुडी, सैन्य हात धुऊन मागे लागले. या लष्करी धामधुमीत एक मूक प्रेमकथा फुलत होती. मानवी शरीराची व मनाची कमाल क्षमता ताणली जात होती. शेवटी काय झाले ?
-
For Men
पन्नाशीचा गृहस्थ हा अठठावीस वर्षांच्या जवानापेक्षा तंदूरूस्तीच्या व्यायामांची आखणी या पुस्तकात सादर केलेली आहे. पन्नाशीकडे झुकलेले पुरुष नेहमीच्या स्वस्थाविषयी, फारच काळजी करताना आढळतात. याशिवाय व्यायामाच्या अभावामुळे हाडं ठिसूळ होणायचा, दुसरया क्रमांकाचा मधुमेह, कर्करोग आणि हृदय विकार यांचा त्रास होण्याची शक्यता डोक्यावर सतत टांगत्या तलवारी सारखी असतेच. या पुस्तकात व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन परुषांना डोळ्यासमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबिक्स, वजन उचलण्याचे व्यायाम बळकटी वाढविण्याचे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. या पुस्तकात दिल्याप्रमाणे व्यायामाला लागा आणि आयुष्य भर निरोगी राहा
-
For Women
पन्नाशीनंतर तंदुरूस्ती या पुस्तकात मध्यमवयाकडे झुकत असेलेल्या स्त्रियांसाठी फार सध्या सोप्या भाषेत तंदुरूस्तीच्या व्यामांची आखणी सादर केलीली आहे. या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबीक्स, वजन उचलण्याचे व्यायाम बळकटी वाढविण्याचे व्ययाम आणि कटिभागाला मजबुती देणारे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. हा व्यायामाचा वास्तव, चपखल आणि संतुलित आराखडा आहे.
-
26-11 Mumbaivaril Halla
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी,साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजीत थैमान घालतात.त्याची ही प्रत्यक्षदक्षी कहाणी.परदेशी पर्यटक,श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे,ते ताज आणि हॉटेल ट्रायडेंट-ओबेरॉय पर्यंतच्या मुक्त संचारात नरीमन हाउस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला.हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत,याची कारणमीमांसा ज्येष्ट पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.
-
The Private Papers Of Eastern Jewel
पेकिंग १९१४.प्रिन्स सू यांच्या सगळ्यात लहान उपस्त्रीची आठ वर्षाची मुलगी ईस्टर्न ज्यूवेल तिच्या वडिलांची त्यांच्या एका नोकरानिशी चाललेली रतिक्रीडा एका कोरीव अडोशामागून चोरून बघितली. त्यानंतर भविष्याच्या कृष्णछायेच मळभच जणू दाटून आलं आणि ईस्टर्न ज्यूवेलच्या वादळी आयुष्याचा प्रवास सुरु झाला. ईस्टर्न ज्यूवेलचा शरीरसंबंधांमधला चौकसपणा लक्षात आल्यामुळे तिला टोक्योला त्यांच्याच एका दूरच्या नातेवाईकाकडे पाठवून देण्यात आलं. त्यानंतर वैरण आणि बर्फाळ अशा मंगोलीयातल्या राजकुमाराशी तिचा तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करून देण्यात आला. वारंवार एकटेपणामुळे तिला अस्वस्थ करणारे चमत्कारिक आभास आणि तशीच दु: स्वप्न पडू लागली; पण ती स्वभावात:च धीट, बंडखोर आणि कोणाच्याही, कमीत कमी पुरुषांच्या तरी वर्चस्वाखाली राहण्याची तयारी नसलेली अशी होती. द प्रायव्हेट पेपर्स ऑफ ईस्टर्न ज्यूवेल ही अतिशय वादळी ,बहुरंगी,दुसरे महायुद्ध आणि तीन देशांच्या पार्श्वभूमीवर घडलेली सत्यकथा आहे.
-
Belonging
सामीम सात वर्षाची होईपर्यंत इंग्लंडमधील एका अनाथालयात पूर्णपणे ब्रिटीश संस्कारात वाढली.आईवडिलांनी तिला घरी नेण्याचे ठरविल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.परंतु समीम ज्या वातावरणात मोठी झाली,त्यापेक्षा तिचे कुटुंब,त्यांची भाषा,रितीरिवाज पूर्ण वेगळे होते.नऊ वर्षाची होईपर्यंत तिची खात्री झाली होती की,त्या कुटुंबात तिला एका गुलामाइतकीसुद्धा किंमत नव्हती.समीम तेरा वर्षाची झाली तेव्हा तिच्या आईने तिला अचानक पाकिस्तानात घेऊन जाण्याचे ठरवले आणि समीम सुट्टीची स्वप्ने रंगवू लागली.
-
Anandacha Passbook
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो.श्याम बुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये यशाची अनेक शिखरे गाठली.साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली .वि.स. खांडेकर,आचर्य अत्रे,पु.ल. देशपांडे,रणजित देसाई अशा अनेक नामवंतसंबधीच्या आठवणी आनंददायी आहेत.ज्याला आयुष्यात मोठ व्हावंसं वाटत,यशस्वी व्हावंसं,आनंदी राव वाटत त्याला हे पुस्तक प्रेरणा देईल.
-
Ashru
या विसाव्या शतकानं जगाला बर्यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.
-
Don Mane
माणसाला दोन मनं असतात बाळासाहेब ! एक पशूचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं ! पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे काहीच दिसत नाही. दुसऱ्याला त्याच्यापलीकडे असणा-या उदात्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामर्थ्य दिलं आहे. दुसरं त्या मानानं फार दुबळं असतं. या दुस-या मनाचं बळ वाढवण, दोन्ही मनांचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याच्या आयुष्यात या दोन्ही मनांचा झगडा नेहमीच सुरु असतो. या झगड्यात ज्यांचं दुसरं मन विजयी होतं, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो, जिवलग माणसांशीही प्रतारणा कृ लागतो, आणि मग...
-
Hirva Chafa
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन-तीन दशकांमध्ये समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांसारख्या तत्त्वज्ञानांमुळे तसेच स्त्री-शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती अशा घटनांमुळे भारतीय जीवनात मोठे स्थित्यंतर घडून आले. व्यक्तिजीवनावरील बंधने सैल झाली. रूढसमजुतींना व नातिकल्पनांना तडे गेले; समाजातील सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर होऊ लागला. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली. समाजातील काहींनी या नव्या जीवनपद्धतीचा सहज स्वीकार केला, काहींनी आपल्याला सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या, तर उरलेले जुन्यालाच धरून राहिले. 'हिरवा चाफा' ही कादंबरी प्रथम १९३८ साली प्रकाशित झाली. यामध्ये या नव्या काळातील आरंभीच्या बदलांचे चित्रण आहे. यातील क्रांतिकारी विचारांनी भारलेला मुकुंद किंवा ध्येयाने प्रेरित झालेली सुलभा हे नव्या पिढीचे, तात्यासाहेब जुने ते सोने मानणार्या पिढीचे, तर विजय पूर्णपणे नवे न स्वीकारलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत.