-
Man, Interrupted
जेम्स बेली हा विचित्र आणि खचवून टाकणा-या 'आॅब्सेसिह कंपल्सिह डिसआॅर्डर (ओसीडी)'ने ग्रासला होता. मनावर परिणाम करणारी औषधं आपल्या शरीरात जातील आणि आपल्या मनावर ताबा मिळवतील, या भीतीने तो पछाडला होता. भीतिदायक प्रश्नांनी नेहमी त्याच्यावर पगडा बसवलेला असायचा. लोक त्याच्या अन्नात काहीतरी मिसळतील का ? मारिजुआनाच्या पानांच्या फोटोला हात लावला तर नशा चढेल का ? अमेरिकेतील एका विशेष रुग्णालयात, त्याच्यावरच्या उपचार कार्यक्रमामध्ये तो आपल्या सर्व भयानक दु:स्वप्नांना सामोरा गेला. त्याने स्थानिक भणंगांमध्ये मिसळावं, त्यांच्याशी हात मिळवावेत आणि त्यांनी जे काय घेतलं आहे ते त्यांच्या आणि आपल्या त्वचेमार्फत आपल्या शरीरात जाईल, या भीतीवर मात करावी; असं त्याला सांगण्यात आलं होतं. हात धुण्याची प्रबळ इच्छा तो जेवढी पुढे ढकलू शकेल, तेवढा तो सुधारेल. हे कथन म्हणजे बेलीच्या अजिंक्य चैतन्याचा आविष्कार आहे, की जो, स्वत: ज्या अतर्क्य प्रसंगांत होता, त्यातली विसंगती आता सांगू शकत आहे आणि ही मिश्कील विनोदबुद्धी आणि त्याच्या जोडीला असलेली चारित्र्यातली शक्ती यामुळेच त्याला बरं हायला आणि परत येऊन जगाला सामोरं जायला बळ मिळालं आहे. 'मॅन इंटरप्टेड' हे आपल्याला माणसाच्या दिवसेंदिवस अधिकच दृष्टीस पडणा-या, पिळवटून टाकणा-या एका जगाची ओळख करून देतं. पण हा एक मानसिक आजाराचा नीरस वृत्तान्त राहत नाही; तर एक अत्यंत खुलं, प्रचंड करमणूक करणारं आणि अतिशय समाधान देणारं रंजक कथन होऊन जातं.
-
Prasthan (प्रस्थान)
आपल्या मनातच घोंघावणारं वादळ आणि निश्चल उभा हिमालयही असतो. हे सुख-दु:ख अंगावर चालून येतं. वादळासारखं ! व्यक्तिमत्त्वाच्या चिंध्या करतं; पण एक लक्षात ठेव प्रणव, समुद्री वादळात जेव्हा जहाज अडकतं आणि कॅप्टन गोंधळतो, तेव्हा त्याला 'आय ऑफ स्टॉर्म' दाखवला जातो. त्या वादळाचा मध्यबिंदू म्हण. त्या मध्यबिंदूत नीरव शांतता असते. अगदी आश्चर्यकारकरित्या ! जहाजाला त्या 'आय ऑफ स्टॉर्म'मध्ये नेलं की जहाज सुरक्षित राहतं. तसंच अंतर्मनात एक कोपरा एवढा निश्चल, निवांत निर्माण करावा लागतो, की आयुष्यात कितीही वादळं आली तरी त्या क्षणी मनाला त्या कोप-याचा आसरा घेता यायला हवा. असा कोपरा प्रयत्नानंच निर्माण करता येतो. स्वत:ला विसरून, विखरून, ध्यानात किंवा एखाद्या कामात हे जीवनाचं रूप आहे.