-
Gandhiji (गांधीजी )
१९७० साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीतील मनोगत: महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सार्या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे. भारतातले सुप्रसिद्ध चित्रकार मुरलीधरपंत आचरेकर यांच्या कुंचल्याचा जादूचा स्पर्श ह्या पुस्तकाला झाला. आता हे पुस्तक पाहताना मला असे वाटते की, आचरेकरांची चित्रेच इतकी बोलकी आहेत की, माझा मजकूर त्या चित्रांच्या बोलण्याच्या उगीचच मध्येमध्ये येऊ लागला आहे. त्यांनी श्रद्धायुक्त अंत:करणातून केलेले हे कार्य असल्यामुळे त्यांच्याबद्दल आभाराची भाषा वापरणे औचित्याला सोडून होईल. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. हे चरित्र लिहिताना श्री. फ्रान्सिस फ्रेटस् ह्यांनी मला केलेल्या साहाय्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. ~ पु. ल. देशपांडे
-
Bhatkanti (भटकंती)
या ना त्या निमित्ताने सह्याद्रीच्या व सातपुड्याच्या रांगांमधून मनमुराद भटकण्याची संधी मिलिंद गुणाजी यांना मिळाली आणि त्या भटकंतीमध्ये त्यांना भरभरून समाधान मिळाले. त्या परिसरातल्या मर्हाटमोळ्या मंडळी[...]
-
Gangemadhe Gagan Vitlale (गंगेमध्ये गगन वितळले )
गांधी - काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर. गांधींनी एका धाग्यात देश जोडला! मनं सांधली! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत. धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा. पण त्यांच्या समोर मात्र धर्माच्या नावावरच रक्त सांडलं-सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी. पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं. महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी... या आणि अशाच काही जिवलग सहकार्यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच नयानवेला गांधी रेखांकित होतो.
-
Baba Amte (बाबा आमटे)
पर्यावरण सार्वभौमत्वाच्या वाटेवरला मी योगी? छे मी तर वियोगी! मिळाले नाही मला मागितले ते सर्व पण पाहिलेली सर्व स्वप्नं साकारली आहेत. माझी म्हणूनच आज आयुष्याचा मावळतीला निघालोय पकडायला नर्मदा किना-यावरचा सूर्योदय. मला ठाऊक आहे हे समान्य माणसाचे शतक आहे. न्यायोचित माणसाला अन्याय अवस्थेत जागा एकच : जागा किंवा एकच तरुंग किंवा मृत्यू तरुंगाबद्दल मला प्रेम आहे आणि मृत्यूचे मला भय नाही. या माझ्या लोकमतेचं लावण्य कुणी हिरावून घेऊ नये म्हणून माझं मी जीवन उधळत राहणार आहे जगत राहणार आहे मी...
-
Majhi Mulukhagiri (माझी मुलुखगीरी )
निसर्गाचं वेड लावणारं सोंदर्य अनुभवत मिलींद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडापासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवापर्यंत अन पालच्या अभयरण्यापासून ते तडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातल्या काही ठिकाणं ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळ्या सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी 'भटक्याला' हि माहीत नाहीत.आज भटकंती करणा-याची संख्या वाढत आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक. खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छ णा-या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी... माझी मुलुखगीरी....
-
Richard Fenman
एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन. अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक. 'आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट' असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र
-
Kadambari Don (कादंबरी दोन )
’शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रद्धा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवतो, परंतु असे काही घडविल्याच्या आरोपातून नामनिराळा राहतो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.’ आटपाट नगरासारख्याच एका अजब नगराच्या कहाणीतून ’कादंबरी दोन’ सुरू होते. फक्त इथे उंदीर धटिंगण आणि माणसे उंदरांप्रमाणे जिवाला भिऊन जगतात. अत्यंत निष्णात शल्यविशारदानं संपूर्णपणे शवविच्छेदन करून शरीराचा कानान् कोपरा उघडून दाखवावा त्याप्रमाणे राजकारण आणि राजकारण्यांना सोलून काढणारी ही - ’कादंबरी दोन’
-
Jagachya Pathivar Apurna Atmacharitra ( जगाच्या प
सुप्रसिद्ध संगीतकार कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांचे हे अपुरे आत्मचरित्र म्हणजे वणवण भटकणार्या आणि कंगाल अवस्थेतही संगीतसाधना करीत राहिलेल्या एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. उत्तरायुष्यात त्यांना मिळालेल्या प्रचंड यशामागे दडलेले त्यांचे अपयश आणि त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तकसुद्धा लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे. ललिता फडके यांनी सांगितलेल्या हृद्य आठवणींच्या आणि असंख्य दुर्मीळ छायाचित्रांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत अधिक भर पडली आहे.