-
Zimma (झिम्मा)
' झिम्मा '. हा आहे कॅलिडोस्कोप ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या आयुष्याचा... बाईंच्या आत्मशोधाचा , कारकिर्दीचा. हे केवळ विजया मेहता यांचं आत्मचरित्र नाही, तर तो मराठी रंगभूमीवरचा मौल्यवान दस्तऐवजही आहे. बाईंच्या आठवणींच्या धाग्यांचा हा गोफ वाचकांना बांधून ठेवील, यात शंका नाही. एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते बाईंमुळे. वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत. आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय!
-
Bhinna (भिन्न)
माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद, आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित भेद... अशावेळी ’एड्स’सारख्या शारीरिक रोगानं पीडित, समाजाच्या विखारी आरोपी नजरांच्या विळख्यात आणि कुटुंबाच्या गिलोटीन खाली जगण्याचा प्रयत्न करणार्यांचं काय होत असेल? हे सगळे मिळून किती तर्हांनी डोकी ’भिन्न’ करतात. पण एका क्षणी अशांचं हे वेगळेपणच शक्ती, ऊर्जा, चेतना झालं तर? आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागलेलं असतानाच मरणंही निरर्थक आहे, याची पाठोपाठ झालेली जाणीव! अशावेळी आपल्या वाट्याला येणार्या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा असं वाटणार्या, जगावंसं वाटणार्या, चांगलं जगावंसं वाटणार्या ’एड्स’ ग्रस्तांची ही कहाणी. माणसांना ’भिन्न’ करणार्या शकलित बुद्धीच्या माणसांपेक्षा या अशा प्रकारे ’भिन्न’ ठरलेल्यांची कहाणी-
-
Vadyavedh (वाद्यवेध)
कंठसंगीत अधिक प्रिय असलेल्या महाराष्ट्रात वाद्यसंगीताबद्दल आस्था निर्माण होण्याची क्षमता फक्त वाद्यांची माहिती देऊन होणार नाही. वाद्यांची माहिती देणारी पुस्तके भरपूर आहेत; परंतु सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक शिवाय वस्तुनिष्ठ ग्रांथिक आणि प्रत्यक्ष अनुभवाधिष्ठित अशी साग्रसंगीत, नुसती माहिती नव्हे तर ज्ञान वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्त्वे या पुस्तकातून होते.या पुस्तकाचे दोन भाग आहेत.पहिला भाग वाद्यांविषयी आहे तर दुसरा भाग भारतीय संगीताच्या मूलतत्त्वांबद्दल बोलतो. कोणत्याही ज्ञानशाखेचे शास्त्र आणि कला पक्ष, हे एकमेकांत किती प्रेमाने सामावलेले असतात हे या पुस्तकातून सहज प्रतीत होते.
-
Mi Izadora! (मी इझाडोरा!)
एक सुप्रसिद्ध अमेरिकन नृत्यांगना! प्रस्थापित नृत्यातंत्राविरुद्धची तिची बंडखोरी. तिची कलानिष्ठा, जिद्द ! हे सगळंच भावलं एका भारतीय कलावतीला. समरसून अनुवाद केलेलं आत्मचरित्र.
-
Congressne Aani Ghandhijinni Akhand Bharat Ka Nak
भारताच्या फाळणीसाठी कॉंग्रेसला व गांधीजींना ‘जबाबदार’ धरायचे की त्यांना फाळणीचे ‘श्रेय’ द्यायचे? ‘गांधीजींमुळेच आम्ही फाळणी स्वीकारली,’ असे नेहरू म्हणाले ते काही खोटे नव्हते. एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली. ..ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी सखोल संशोधन करून ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे. राजहंस प्रकाशनतर्फे तो प्रसिद्ध होत आहे
-
Rangmudra( रंगमुद्रा)
हे सारेच जण मोठे कलावंत. प्रत्येकानं आपल्या कर्तृत्त्वानं कलेच्या क्षेत्रात ठसा उमटवलेला. या कलावंतांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची जडणघडण, त्यांचं योगदान यांचा वेध घेत घेत रंगभूमीचं प्रयोजन, समाजाच्या अभिरुचीची घडण, सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया यांचाही शोध.
-
Stri Virudh Purush?(स्त्री विरुद्ध पुरुष?)
त्री आणि पुरुष या दोघांचे अस्तित्वच मुळी एकमेकांशिवाय अशक्य असताना परस्परांमध्ये सामंजस्याऐवजी संघर्षच जास्त का, भेदाभेदांचे निमित्त करून विषमता का, अशा अनेक प्रश्नांचा निखळ मनुष्यवादी दृष्टिकोनातून ऊहापोह करणारे हे पुस्तक संवेदनशील वाचकांच्या मनातील असंख्य समजुतींना धक्का देते. स्त्री-पुरुष नात्याचे नर आणि मादी याखेरीजही किती लोभस फुलोरे आहेत, हे पटवून देत नव्या सहजीवनाच्या मार्गाकडे सहजपणाने घेऊन जाते. नकळत परिवर्तन घडवून आणते.