-
Ancient Indian Empirical Sciences
The name of the book Ancient Indian Empirical Sciences imply that the knowledge described is of a period much earlier than even the 12th century A.D. and Indian means geographical limits of that portion of the earth where scientific volumes were being written in Sanskrit and which scientific culture is considered as its ownheritage. Aim of this book is just to indicate how much scientific knowledge was obtained by our forefathers and what a vast treasure-trove of reference literature is available. This small effort to present in some form, the same heritage-but of normal life-achieved with physical sciences-is made here. May this effort be liked by the readers and awaken their interest in this subject-is the only success desired. The book proves to be a useful collection in the field of Indian Knowledge Systems, especially now on the backdrop of NEP 2020. - Prof. Gauri Mahulikar (Academic Director, Chinmaya International Foundation)
-
Ram Aryavartache Punarutthan Bhag 1 (राम आर्यावर्त
वाल्मिकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात , परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे . रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचे स्वरूप आणि कार्य ,जटायूचं वास्तविक स्वरूप ,वानरे,पुष्पक विमान ,रावणाचे साम्राज्य ,दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण ,आदी गोष्टी ,घटना आजच्या शोधांशी ताडून पहिल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचत आहोत याचा अनुभव देणारे पुस्तक
-
Chandravansh Bharat - Bhag - 2 (चंद्रवंश भरत - भाग
ईश्वरेच्छेनं आलेला भरत कसा आहे हे पूर्णत: तर कुणाला कळणार नाही; पण अल्पमात्र कळलं तरी आपण त्याच्याकडून अनेक गुण घेऊ शकतो. हा धरित्रीवरचा श्रीविष्णू आहे. तो जिथे पाऊल ठेवील तिथे केवळ श्रीलक्ष्मी त्यालाच प्राप्त होईल असं नव्हे तर तो परिसरं वैभवशाली बनेल. याचं दर्शन पापविनाशी आहे. "- महर्षी कश्यप ऋषी संस्कृतीचं संगोपन अणि संवर्धन जे अनेक नृपतींनी केलं त्याचं वर्णन, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, कृषी विज्ञान, राजे आणि ऋषी यांचं एकत्रित कार्य, यांचा विस्तृत पट या कादंबरीमध्ये मांडला आहे. चंद्रवंशी राजांचं जीवन आणि कार्य यात पहायला मिळतं. अत्री ऋषींपासून चंद्रवंश सुरू होतो. पुरुरवा, ययाती, दुष्यंत आणि भरत यांच्या स्वभाववृत्तीचं भिन्न भिन्न चित्रण येतं. ऋषींच्या कार्याचा सुप्त प्रवाह या कादंबरीत वहात रहातो. दुष्यंत आणि भरत या चक्रवर्ती सम्राटांच्या पराक्रमाचा विस्तृत पट मांडणारी वर्णनात्मक कादंबरी
-
Chandravansh Yayati - Bhag 1 (चंद्रवंश ययाती - भाग
चंद्रवंशीय राजांच्या परंपरेवरील द्विभागीय अद्भुतरम्य वर्णनात्मक कादंबरी... ऋषी संस्कृतीचं संगोपन आणि संवर्धन जे अनेक नृपतींनी केलं त्याचं वर्णन, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, कृषी विज्ञान, राजे आणि ऋषी यांचं एकत्रित कार्य यांचा विस्तृत पट या कादंबरीमध्ये मांडला आहे. चंद्रवंशी राजाचं जीवन व कार्य यात पहायला मिळतं. पुरुरवा ते ययाती हा चंद्रवंशीयांचा विशाल कालखंड रेखाटणारी वर्णनात्मक कादंबरी
-
Eka Dollerchi Goshta Ani Itar Katha (एका डॉलरची गो
लघुकथा हा साहित्यप्रकार अत्यंत प्रभावी आणि ताकदवान आहे. जशा तीन-साडेतीन मिनिटांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय होतात तशाच लघुकथाही वाचकप्रिय ठरतात. आणि हे जगभरातील शेकडो प्रसिद्ध लेखकांनी सिद्ध केलेले आहे. एक पानाची कथाही परिणामकारक ठरते, तर 'अलक' (अतिलघुकथा) अलीकडे बऱ्याच प्रमाणात रूढ झाली आहे. विषयांनाही मर्यादा नाही. प्रेम, गूढ / रहस्यमय, गुन्हेगारी, विनोद, सूड, कल्पनारम्य, बालवाचकांसाठी, भविष्यकालदर्शक अशी शेकडो कथानके असू शकतात. १७व्या शतकापासून जगभरात असंख्य लेखकांनी साहित्यविश्वात फार मोलाची भर टाकलेली आहे. ओ हेन्री, मोपासा, टॉलस्टॉय, एडगर अॅलन पो, सर ऑर्थर कॉनन डॉयल, वॉल्टेयर, जॉन आयटन, मॅक्झिम गॉर्की आदि दिग्गज लेखकांच्या, विषयांचे वैविध्य असलेल्या निवडक कथांचा अनुवाद म्हणजे “एका डॉलरची गोष्ट आणि इतर कथा"
-
Jivanopayogi Ramayan (जीवनोपयोगी रामायण)
महर्षी वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष देणारा महान ग्रंथ म्हणजे रामायण. सहस्त्रो वर्षांचा कालावधी उलटून गेला पण श्रीरामायण आजही आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान आहे. भारताच्या दशदिशा श्रीरामकथेच्या अमृतकुंभातील अमृताचा आस्वाद घेत याच अमृतरसाला 'रामरस' म्हणत त्याच्या वर्षावात तृप्ततेचा अनुभव घेत असतात. आपल्याला रामकथा माहित असूनही ती पुन्हा पुन्हा वाचण्याचा, ऐकण्याचा मोह आपण आवरू शकत नाही हीच या कथेची आणि वाल्मिकींच्या प्रतिभेची महती आहे. भक्तीमार्गाहून मुक्तीमार्गाची ओढ लागलेल्या फक्त वृद्धांसाठी रामायण आहे असा गैरसमज कोणीही करू नये. संस्कारक्षम वयात योग्य संस्कारासाठी, व्यवस्थापनाचे धडे गिरविणाऱ्यांसाठी, सामाजिक एकोपा कसा वृद्धिंगत करावा हे समजण्यासाठी, सर्वांसाठी श्रीरामायण उपयुक्त आहे. रामायण डोळसपणे अभ्यासून त्याची शिकवण अंगी रुजविल्यास राष्ट्रनिर्मितीस उपयुक्त ठरेल आणि संस्कारक्षम पिढीही निर्माण होईल यात शंका नाही
-
Kabjadhish - Accidental Hacker (कब्जाधीश-ॲक्सिडेंट
या 'वेळेस तुरुंगात कैदी नव्हेत पण असंख्य फाईल कैदी बनवल्या गेल्या आहेत 1 या वेळेस कोणतीही लुटमार नाही पण सत्रांची अपहरणे होत आहेत 0 या वेळेस डोकी नव्हेत तर गुप्त परवलीचे शब्द फुटत आहेत आमचे युद्ध सुरु आहे पण आम्हालाच त्याची कल्पना नाही.. जगातल्या कोनाकोपऱ्यात घडणारे गुन्हे, सायबर जगातील थरार आणि त्यांचा एका समान धाग्याशी असणारा संबंध, अशा अतर्क्य घटनांची मालिका असलेली कादंबरी.
-
Aacharya (आचार्य)
शंकरच्या कुंडलिनी शक्तीने त्याच्यातील सप्तचक्रांना जाग्रत केलं होतं. प्रत्येक चक्रावर विविध रंगाचं कमळ उमललेलं होतं. प्रत्येक पाकळीवर प्रकाशमान बीजाक्षरं होती. सहस्रार चक्रातलं कमळ शंकरच्या मस्तकाच्या दशांगुळे वर होतं. मधल्या गेंदामध्ये शिव होते. सर्वांत खालच्या थरातील प्रत्येक पाकळीत ब्रह्मदेव होते. त्यावरच्या पाकळी-पाकळीवर वसिष्ठ होते. त्यावर वसिष्ठपुत्र शक्ती होते. त्यावर पराशर होते. त्यानंतर व्यास. त्यानंतर शुकाचार्य आणि सर्वांत वरती गौडपादाचार्य होते. गोविंदपादाचार्य ते अद्भुत दृश्य एकाग्रतेनं बघत होते. सगळ्या कमलदलांमधून प्रकाशाचे कण आणि प्रणवचिह्नं उधळली जाऊ लागली. ती सर्व प्रणवचिह्नं ध्यानस्थ गोविंदपादाचार्यांच्या देहामध्ये उतरत होती. असाच समय गेला. मग गोविंदपादाचार्यांच्या देहातील चक्रांवर शंकरप्रमाणेच कमळं उमलली. ती सर्व कमळं सुगंधित झाली आणि त्याचा वर्षाव शंकरवर झाला... त्यातून नाद घुमला - “आचार्य... आचार्य... आचार्य... आचार्यऽऽ!” वैदिक विचारधारेची पताका संपूर्ण भारतभर फडकवत, खऱ्या अर्थाने वैदिक धर्माचे पुनरुत्थान घडवून आणणाऱ्या आद्य शंकराचार्यांचा जीवनपट उलगडणारी महाकादंबरी..
-
Maya Modi Azad (माया मोदी आझाद)
भारतीय राजकारणातल्या दलित पटलामुळे विश्लेषणात्मक कठीण कोडं समोर येतं. गेल्या दशकात बहुजन समाज पक्षाला लागलेली ओहोटी, त्याच जोडीने भारतीय जनता पक्षाने पुनरुज्जीवीत केलेल्या हिंदुत्वाकडे वळलेला दलितांचा एक विभाग आणि नव्या दलित संस्थांनी अत्याचार आणि उजव्या विचारसरणीच्या वर्चस्वाविरुद्ध सुरु केलेली निदर्शनं. अशा प्रकारे आज दलित राजकारणावर दोन विरुद्ध पद्धतींचा ठसा उमटलेला दिसतो - उजव्या विचारसरणीविरुद्ध राजकीय निदर्शनं आणि तरीही निवडणुकीत उजव्या विचारसरणीकडे असलेला कल. बदलत्या सामाजिक-राजकीय संदर्भाला दलित वक्तव्याने कसा प्रतिसाद दिला आहे हे या पार्श्वभूमीवर लक्षात घेतलं पाहिजे. विशेषकरून उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित करत 'माया, मोदी, आझाद' या सदर पुस्तकात बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला आहे. या राज्यात दलितांना गाभ्याशी ठेवत मायावतींनी नवी 'अम्ब्रेला पार्टी' निर्माण करायचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात नरेंद्र मोदी यांनी दलितांच्या एका भागाला भगव्या कळपाकडे आकर्षित केलं. गेल्या दोन दशकांत या दोघांनी या राज्यात दलित राजकारणाला आकार दिला आहे. याच राज्यातून नवे दलित नेते चंद्रशेखर आझाद हे हिंदुत्व वर्चस्व आणि बसप यांना आव्हान देत दलित चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहेत. सन २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे स्पष्ट विभागणी होऊ शकते हे लक्षात घेतलं, तर या त्रिकोणी स्पर्धेचं सुधा पै आणि सज्जन कुमार यांनी केलेल्या चपखल आणि आंतरदृष्टी जोपासणाऱ्या विश्लेषणातून केवळ दलितांचंच नाही, तर संपूर्ण भारताच्या लोकशाहीचं राजकारण समजून घेता येईल.
-
Prateeksha (प्रतीक्षा)
अनाथाश्रमातली एक पाच वर्षांची मुलगी दत्तक जाते. तिच्या बालपणीच्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. ती जसजशी मोठी होत जाते तशी आपलं बालपण शोधू लागते. हे बालपण खेळ, खाऊ एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर आपण कोण, कुठच्या, आई-वडील कोण, त्यांनी आपला त्याग का केला? त्याग केला की आपण हरवलो ? हरवल्या असू तर शोध घेतला गेला का? नसेल तर का? एका मूळ समस्येतून निर्माण झालेले अनेक प्रश्न- उपप्रश्न. हा सगळा शोध तिच्या एकटीचाच आहे. त्यांची उत्तरं शोधण्यासाठी तिनं केलेली धडपड, ती आणि तिची मनस्वी वृत्ती, ती आणि तिची वेदना, ती आणि तिला हुलकावणी देणारं तिचं बालपण यांची ही कहाणी आहे. या सर्वांतून या कादंबरीचे धागेदोरे विणले आहेत. - गिरिजा कीर
-
Nandini (नंदिनी)
नंदिनी, समाजाने आखून दिलेल्या नातेसंबधाची चौकट ओलांडत, जे गमावलंय ते मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. आयुष्यातील दोन घटनांच्या दरम्यान घडणाऱ्या एका स्त्रीची भावनिक, आर्थिक, शारिरीक आंदोलने मोठ्या तरलतेने कादंबरीत टिपलेली आहेत. इथे एका बाजूला आईचे मुलीसाठी तुटणारे काळीज दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला तीच आई तिच्या आवडत्या माणसाच्या प्रेमासाठी होरपळताना दिसत आहे. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय... स्त्रीचे स्वतंत्र असे काही अस्तित्व असते का? तिला प्रेम करण्याचा हक्क असतो का...? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कांदबरीत लेखिका शोधत आहे. मराठी कादंबरीविश्वातील स्त्रीवादी विचारांचा प्रवास 'कळ्यांचे निश्वास' पासून 'भिन्न' कादंबरीपर्यंत पोहचला आहे. या प्रवासातील एक पुढचे आशादायी वळण म्हणजे शिल्पा गंजी यांची 'नंदिनी' ही कादंबरी आहे. -शिल्पा कांबळे (लेखिका आणि पटकथाकार)