-
Ambedkari Samajache Nivdak Prashna (आंबेडकरी समाजा
भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे पूर्ण झालीत, मात्र काही अपवाद वगळता, बहुसंख्य आंबेडकरी समाजाचे प्रश्न आजही त्याच स्वरुपात व त्याच तीव्रतेचे आहेत. जागतिकीकरणानंतरही प्रश्न आणखी गंभीर होताना दिसत आहे. हे प्रश्न प्रत्येकाच्या जीवन - मरणाशी निगडीत आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आंबेडकरी समाजाच्या अशा महत्वाच्या निवडक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.
-
He Jivan Sundar Jhale (हे जीवन सुंदर झाले)
वाळूच्या घड्याळातून कण निरंतर झरतच असतात; पण खालच्या काचपात्रात पडून त्या वाळूकानांची फुले व्हावी तसे माझे 'हे जीवन सुंदर झाले' डॉ. श्रीमती चारुशीला ओक हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यांची वाटचाल मी ''आणि काशिनाथ घाणेकर'' या पुस्तकातून बघते आहे. ते पुस्तक मला विलक्षण आवडले होते. लेखिका म्हणून या पुस्तकाने त्यांना उत्तम नाव मिळवून दिले. त्यानंतरही त्या कथा, लेख अशा माध्यमातून अनेक नियतकालिकातून भेटत राहिल्या. एक समुपदेशक म्हणून बालक - पालक केंद्रात पार्ले येथे काम करणाऱ्या चारुशीला बाई, नामवंत नात्त्कात आपला ठसा उमटवणारी गुणवंत अभिनेत्री, उत्तम वक्ता, प्रेमळ कर्तव्यदक्ष पत्नी, मुलांची लाडकी आई, नातवंडाना मैत्रीण वाटणारी आजी. अशा कॅलिडोस्कोपिक बिलोरी व्यक्तिमत्वाची ही सौदामिनी मी ज्या कोनातून बघते त्या कोनात ती आकर्षकच वाटते. विश्वकोशाच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. 'हे जीवन सुंदर झाले' हे त्यांचे आत्मचरित्र. ते खरोखर सर्वांग सुंदर झाले आहे. ते वाचताना आपण कधी डोळे पुसतो, कधी मनी ओलावतो... तर कधी स्तिमित होतो. आत्मचरित्र हा लेखन प्रकार एक प्रकारे अत्ममग्नतेकडे घेऊन जाणारा आहे. तरी स्मृती, शैली, आणि स्वतःचा शोध घेत ललित लेखनाच्या रुपात अभिव्यक्त होण्याची मागणी करणारा हा अवघड आणि हळूवार साहित्य प्रकार आहे. चारुशीलाताईंचे हे आत्मचरित्र चिंतन, निरीक्षण, उत्कट अनुभव कथन करतानाच "हे जीवन सुंदर झाले" ह्या तृप्त समतोल वृत्तीचे दर्शन घडविणारे आहे.
-
Kimayagar (किमयागार)
सामान्य माणसातील असमान्यत्व त्यांचे जमिनीवर रोवलेले पाय कुठल्याही परिस्थितीत मुळांन पासून फारकत न घेण्याची वृत्ती अदम्य जीजीविषा मनात सतत झंकारत असलेली नि:स्पृहतेची तार निरंतर 'एकला चलो रे' चे अभियान आणि खांद्यावर निरंतर समाजिक जाणिवेच्या बांधलीकीची चिरंजीव पताका हीच या पुस्तकातील 'किमयागारां' ची किमयागारी आहे. यांच्या बाबतीत सांगयाचं तर एवढचं सांगता येईल. ये तो अकेले हि चले थे जानीबें मंजिल मगर लोग मिलते गये, कारवां बनत गया// मला विश्वास आहे, त्यांच्या हे जीवनातील सारतत्व आपल्याला या पुस्तकाच्या शब्द चिंतनातून सतत जाणवत राहील.
-
Yedyachi Jatra (येडयाची जत्रा)
गावगाडा बदलला तरी माणसांचे स्वभाव बदललेले नाहीत. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, प्रसंगातून सहजपणे विनोदनिर्मिती होत असते. तेच विनोद कथांमध्ये सोपान खुडे यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. मनावरचा तान आणि शरीराचा शीण कमी करण्यासाठी हा कथासंग्रह आपण सर्वानी वाचलाच पाहिजे.
-
Alamgir (आलमगीर)
'' तुम्ही, गिरफ्तारित टाकुन, आमचा छळ सुरु केला. तरीही आपला बाप - बेटे का रिश्ता तुटणार नाही. तुमच्या अम्मीजान या दुनियेतून जाताना, आमच्या हाती देऊन पालन करण्याची, जिम्मेदारी सोपवली. तेव्हा पासून परवरिश करून तुमचे खुप लाड- प्यार केले. परंतु तुम्ही सगळ विसरून गेलात. आपल्या सख्या भावना नष्ट करून, आम्हास या लाल किल्ल्यात बंदिस्त केलंत खरोखरच आम्ही नालायक, डरपोक आहोत. म्हणुनच कुजात पडलोय. तुमच्या सारख्या पुत्राचा वालिद झाल्याबद्दल, आम्हास फार फार शरम वाटते. तुम्ही करीत असलेल्या हा छळ म्हातारपणाचा आहे. तुम्हालाही आमच्यासारख्या बुढ़ापा प्राप्त होणार आहे. हे ध्यानी ठेवा.''