-
Manoj Bajpeyee - Jidda Kahi Milavnyachi (मनोज बाजप
प्रत्येकासाठी नायक झालेला 'फॅमिली मॅन' ! मनोज बाजपेयी यांच्याविषयी खूप काही लिहिलं गेलं आहे; पण या मुरलेल्या कलाकाराच्या आयुष्याचे अनेक पैलू आजही अपरिचित आहेत. कुणीही गॉडफादर नसताना या कलाकारानं बॉलिवूडमध्ये केवळ स्वतःचं स्थानच निर्माण केलं नाही, तर आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट समीक्षकांना आपलं श्रेष्ठत्व मान्य करायला भाग पाडलं. मनोज बाजपेयी आज स्वतःच अभिनयाची कार्यशाळा झाले आहेत. खास त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची पावलं चित्रपटगृहांकडे वळू लागली आहेत. 'मनोज बाजपेयी' ही त्यांच्या वडलांच्या गावाची बेलवाची मुख्य ओळख झाली आहे. गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटातील त्यांच्या देशी रूपानं एक इतिहास घडवला आहे; तर सत्या, राजनीती आणि अलीगढ अशा चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मनोज बाजपेयींशी संबंधित असलेले वरिष्ठ पत्रकार पीयूष पांडे यांनी लिहिलेलं हे चरित्र म्हणजे मनोज बाजपेयींच्या जिद्दीची, धडपडीची कथा आहे. रोचक किस्से सांगत लिहिलेलं हे चरित्र मनोज बाजपेयींना जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा सिनेप्रवास समजून घेण्यासाठी आवश्यक पुस्तक आहे.
-
Hyo Turung Fodayacha Hai Ga (ह्यो तुरुंग फोडायचा ह
ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं ! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सहभागाचा जिवंत अनुभव मंडणारा दस्तैवज! गेल म्हणतात, गरीब शेतकरी स्त्रियांच्या लढाऊ संघर्षाच्या अनेक कथा तो पर्यंत मी ऐकल्या होत्या... या शेतमजूर स्त्रिया आंदोलनात, मोर्चात सहभागी व्हायच्या, पोलीसांचे कडे तोडायच्या... मला प्रश्न पडायचा की, आपले स्वत:चे स्त्री असणे या बद्दल भारतातील खालच्या वर्गातील स्त्रिया नेमका कसा विचार करतात ? खेड्यातील जीवनावर तो पर्यंत शेकडो मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अहवाल तयार झाले होते...या सर्व अहवालात असे गृहित धरले होते की, सर्व स्त्रिया निमूटणे दडपणूकीला बळी पडतात... हे खरे आहे का ?, या स्त्रिया कसा विचार करतात ? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि भारतीय स्त्रियांशी जिवंत नाते निर्माण करणारा हा संवाद ... गेल ऑम्वेट यांच्या अस्सल राजकीय जाणिवांचा पट उलगडणारा वैयक्तिक अनुभव ...
-
Origin Story Characharacha Mahaitihas(ओरिजिन स्टोर
Origin Story Characharacha Mahaitihas काळाचा उदय होण्याच्या आधीपासून ते सुदूर भविष्याच्या दूरवरच्या टोकापर्यंत बहुतेक सगळे इतिहासकार काळाचे सर्वांत लहान-लहान तुकडे अभ्यासत जातात. ते करत असताना त्यांचा भर विशिष्ट तारखा, व्यक्ती आणि दस्तऐवजांवर असतो. मात्र बिग बँगपासून ते आजपर्यंत संपूर्ण इतिहासाचा आणि अगदी सुदूरच्या भविष्याचा अभ्यास करायचा झाला तर तो कसा असेल? काळाच्या सबंध पटाकडे बघितल्याने आपला या विश्वाविषयीचा, पृथ्वीविषयीचा आणि चक्क आपल्या अस्तित्वाविषयीचा दृष्टिकोन कसा बदलेल? या प्रश्नांची उत्तरं शोधायला डेव्हिड ख्रिश्चन “बिग हिस्ट्री" कल्पनेचा माग काढत गेले. आपण कुठे होतो, कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत हे समजून घेण्याचा हा सर्वांत रोमांचक असा नवीन मार्ग आहे. आपल्या ओरिजिन स्टोरी या पुस्तकातून डेव्हिड ख्रिश्चन, ज्याला आपण 'इतिहास' म्हणून ओळखतो अशा सबंध १३.८ अब्ज वर्षांच्या विलक्षण प्रवासावर वाचकांना घेऊन जातात. या इतिहासाला आकार देणाऱ्या घटना (टप्पे), महत्त्वाचे कल आणि आपल्या मुळाविषयीचे गहन प्रश्न यांच्यावर लक्ष केंद्रित करून, सर्व चराचराला एकत्र बांधणारे अदृश्य धागे ख्रिश्चन दाखवून देतात. त्यात ग्रहाच्या निर्मितीपासून ते शेतीचं आगमन, अणुयुद्ध आणि त्यापलीकडच्या गोष्टींचा समावेश होतो. विश्वाची उत्पत्ति, जीवसृष्टीची सुरुवात, मानवांचा उदय आणि भविष्यात दडलेल्या शक्यता यांविषयीचं चित्तथरारक अंतर्दर्शन घडवत ही उत्पत्तिकथा' आपली या विश्वातली जागा नवीन चौकटीत धिटाईने दाखवून देते.