-
Gubugubu (गुबूगुबू)
सुभाष खैरे यांच्या या कथासंग्रहात ग्रामीण भागातील जीवन विविध कथांमधून आपल्यासमोर येते. शेतकऱ्यांचे हाल, नंदीवाला व त्याच्या कुटुंबावर व नंदीवर बेतलेलं संकट याची कथा हळहळ वाटायला लावते. 11 कथांमध्ये आलेली अस्सल ग्रामीण भाषा वेगळ्या जगात नेते. भाषेचा गोडवा आणि नेमकं चित्रण यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.
-
Don Yashswi Lokyudhe (दोन यशस्वी लोकयुद्धे)
व्हिएतनाम युद्ध यशस्वी झाल्यावर, स्थापन झालेल्या व्हिएतनामी सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधींनी जगात प्रथम मान्यता दिली होती. नंतर हो-ची-मिन्ह व्हिएतनाम अध्यक्ष भेटीवर आले असताना त्यांनी मोहन धारिया - प्लानिंग कमिशन उपाध्यक्ष यांच्याशी बोलताना वरील उद्गार काढले होते. मोगल विरुद्ध मराठे व फ्रेंच-अमेरिकन विरुद्ध व्हिएतनाम या दोन लोकयुद्धांतील साम्यस्थळे व तुलना दाखविण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. ज्या छोट्या राष्ट्रांवर साम्राज्यवादी लोकांची आक्रमणे होतील त्या राष्ट्रांना वरील युद्धनीतीच्या अभ्यासाचा फायदाच होईल.
-
Divtya (दिवटया)
दलित साहित्यात आत्मकथनाला मोठे स्थान आहे. वर्षानुवर्षे अन्याय सहन करणारा, पिचलेला हा समाज आज थोडेफार चांगले जीवन जगत असला तरी ‘दलित’ शिक्का अजूनही पुसला गेलेला नाही. म्हणूनच या समाजातील अनेकांनी आत्मकथनातून झालेल्या अन्यायाचे चित्रण केले आहे. परिस्थितीचे चटके सहन केलेल्या खुशाल डवरे यांनीही ‘दिवट्या’ ही आत्मकथा लिहिली. पण त्यात इतरांकडून होणार्या अन्यायापेक्षा स्वतःमुळे कुटुंबावर झालेल्या अन्यायाचे चित्रण त्यांनी केले आहे. एका देवदासीमुळे त्यांच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या त्याबद्दल त्यांनी प्रामाणिकपणे लिहिले आहे. कोणालाही न दुखवता स्वतःच्या आयुष्याचा पट त्यांनी अलिप्तपणे मांडला आहे. म्हणूनच हे पुस्तक वेगळे ठरते.
-
Gulabi Sir - The Pink Headed Duck ( गुलाबी सिर - द
नव्या शतकाच्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये लिहिलेल्या या कथा. माणसाचं व्यक्तिगत आणि सामूहिक अस्तित्व कधी वेढून, कधी उजळून, कधी झाकोळून तर कधी भोवंडून, चक्रावून टाकणारी ही वर्षं. माध्यमं, तंत्रज्ञान, संधी, आव्हानं, आवाहनं, मूल्यं, माणुसकी, परस्परसंबंध, शोषण, सामाजिक वास्तव… सगळंच ढवळून काढणारी वर्षं. सोबतीला निसर्गाच्या सतत होणार्या र्हासाची गिरमिटयुक्त जाणीव. पण कुठेतरी, आशेची एक न संपणारी लकेरही. ‘गुलाबी सिर – द पिंक हेडेड डक’मधील कथा म्हणजे ‘अपेक्षाभंग’ आणि ‘भ्रमनिरास’ या जुन्या दोस्तांच्या सोबतीनंच पण आशेच्या त्या लकेरीसह या सगळ्या जाणिवांना, बदलांना एका ताज्या, लिहित्या मनानं दिलेला सकारात्मक प्रतिसाद.