-
Lopalelya Suvarnamudra : Harvat Chalalelya Mhani (
ज्येष्ठ साहित्यिक द. ता. भोसले यांनी या पुस्तकात साडेपाचशे म्हणींची ओळख करून दिली आहे. यातील अनेक म्हणी आज वापरात नाहीत. भोसले यांनी त्या म्हणींचा अर्थ थोडक्यात समजावून सांगितला आहे. भाषेचा अभ्यास आणि त्यातील मौज अनुभवता येईल अशा या म्हणी आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या म्हणी वापरल्या जातात, त्यादेखील इथं वाचायला मिळतात. या म्हणींमधून ग्रामीण भागातील लोकजीवनदेखील समजून येतं. एखाद्या म्हणीच्या माध्यमातून खूप मोठा आशय व्यक्त करता येतो. या पुस्तकातील म्हणी अशाच महत्त्वाच्या आहेत.
-
Shree-Shillak : Nivruttipurva Ani Nivruttipashchat
चाळीशीचा उंबरठा ओलांडलेल्या सर्वांसाठीच उपयुक्त पुस्तक. - चाळीशीतल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावता निभावता उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालून पुरेशी 'शिल्लक' कशी ठेवायची आणि ती योग्य पद्धतीने कशी गुंतवायची याचे मर्गदर्शन. - खर्च नियोजन, उत्पन्न आणि आवक व्यवस्थापन आणि धोरणी गुंतवणूक या तीनही विषयांचा मागोवा घेणारे पुस्तक. - अनाठायी जोखीम न स्वीकारता डोळस गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती. - पतमापन म्हणजे काय, ठेवी का कर्जरोखे, त्यातल्या त्यात गृहवित्त कंपन्यात ठेवी ठेवतानाचे लाभ काय, महागाईवरचा उपाय म्हणून शेअर्स कडे कसे बघावे, ते करताना काय काळजी घ्यावी अशा अनेक विषयांना स्पर्श. - निवृत्तीनंतरही आपले आर्थिक स्वातंत्र्य जपायचे असेल तर त्याची तयारी नेमकी कशी करावी हे सांगणारे पुस्तक.
-
Prasadachi Vani... Arthath Tuka Mhane (प्रसादाची व
तुकाराम महाराज स्वतःच्या कवितेचे स्पष्टीकरण करताना म्हणतात - 'प्रसादाची वाणी वदतो उत्तरे। नाही मतांतरे जोडियेली।।' तुकोबा ईश्वरी प्रसादाने वेदांचा भाषानिरपेक्ष अर्थ पाहू शकतात कारण संस्कृत भाषेतील वेद ज्या ईश्वराने ऋषींना दाखवला तोच ईश्वर आता तुकोबांना तोच अर्थ दाखवत आहे. फरक हा आहे कि पूर्वीच्या ऋषींनी तो त्यांच्या म्हणजे संस्कृत भाषेतून पाहिला तर तुकोबा तो आता आपल्या म्हणजे मराठी भाषेतून पाहत आहेत. संत बहिणाबाई तुकोबांच्या अभंगाला 'तुकाराम वेद' असे का म्हणतात हे आत्ता लक्षात यावे. तुकोबा हे मंत्रद्रष्टे ऋषी व त्यांचे अभंग म्हणजे तुकोबांची वाणी ही प्रसादाची वाणी आहे. प्रस्तुत संपादनात तुकोबांच्या 'प्रसादाच्या वाणी'तून निघालेले काही अभंग त्यांच्या अर्थासह वाचकांपुढे ठेवले आहेत. 'अग्रोवन' दैनिकातून 'अध्यात्म' या वाचकप्रिय सदरातून प्रसिद्ध झालेल्या अभंगातील निवडक अभंगांचा संग्रह.