-
Arab Jag (अरब जग)
युद्ध आणि क्रांती या गोष्टी समाजाला ढवळून काढणाऱ्या असतात. त्यांचे परिणाम अल्पकालीन नि दीर्घकालीन असतात. त्यात भाग घेणाऱ्या लोकांनाच त्याचे चटके बसतात असे नाही, तर रणांगणापासून दूर असणाऱ्या लोकांनाही त्याचे चटके बसतात. जे युद्धाचे परिणाम तेच क्रांतीचेही होतात. सहा अरब जगातल्या क्रांत्यांचे चित्र हेच दाखवून देत होते. इस्लामी जगात प्रस्फोट घडविणारे काय विचार प्रवाह आहेत, त्या प्रस्फोटांची मूळे कुठे आहेत, अरब तरुण जगाच्या काय आकांशा आहेत. शिवाय अरब जगातील क्रांतिकारक घटनांची ताजी, सत्य, रंजक नि विस्मयकारक माहिती मराठी वाचकाला मिळावी, या हेतूने सदर ग्रंथाची निर्मिती केली. त्याचे निश्चित स्वागत करतील
-
Jagale Jashi (जगले जशी)
बोलण्यातून एका सहजपणे जी माणसे लिहिण्यास पोचतात त्यांच्या शैलीला एक वेगळाच ओघ, एक सहजता, अकृत्रिम डौल असतो. हाडाच्या लेखिका नसलेल्या लालन सारंग यांच्या लेखनाला एक वाचनीयता प्राप्त झाली आहे त्याचे कारण हे आहे. कोणाच्या बोलण्यात गुंतावे तसे आपण या पुस्तकात गुंततो. एका वेगळ्याच जगात पोचतो. हे जग एका मनाचे जग आहे आणि हे मन एका प्रौढसमजुतीने, निकोपपणे, स्थिरपणे आणि शांतपणे आपल्या गतायुष्याकडे पाहते आहे. एका प्रमाणात चिकित्सेत अधिक बिकट - या पुस्तकात भेटते आणि एका अभिनेत्रीच्या लेखनात असे काही प्रत्ययाला यावे याने आपण चकित होतो
-
Romanchkari Railway (रोमांचकारी रेल्वे)
दळणवळणाचं मुख्य साधन म्हणून रेल्वेची निर्मिती झाली. यामुळे व्यापार-उदीम सोपा झालाच,पण प्रवासालाही गती मिळाली. आपल्या माणसामध्ये येण्यासाठी एक वेगवान मार्ग माणसानं निर्माण केला आणि रेल्वे माणसांच्या भावनांशी जोडली गेली. कशी निर्माण झाली ही धूर सोडणारी गाडी, तिचे मार्ग, तिची यातायात, देखभाल. हा संपूर्ण गाडा चालतो तरी कसा. याचं कुतूहल आजही तितकंच आहे, गावं आणि राज्यांमधून देशाला जोडणारी ही रेल्वे अद्याप नवेनवे प्रयोग करतेच आहे. अशा या भारतीय रेल्वेची गोष्ट सांगणार पुस्तक....