-
Ekach Mulgi (एकच मुलगी)
पंडित जवाहरलाल नेहरू, बिल क्लिटेन, शरद पवार, गुलजार, निळू फुले, बेगम परविन सुलतान, सुलोचना, मृणाल गोरे, रिमा, आरती अंकलीकर-टिकेकर, नीलम गो-हे, सदा कर्हाडे, राझिया पटेल, ना. सं. इनामदार, अरुण शेवते या सर्वांना एकच मुलगी आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणजे मुलगा हवा ही सनातन परंपरा त्यांनी नाकारली आहे. मुलीला वाधावाताना किती सजन आणि सृजनशील असेल पाहिजे हे या पुस्तकातून वाचायला मिळते. एकविसाव्या शतकात स्त्री भ्रूणहत्येच्या बातम्यांनी मन अस्वस्थ होते. अशावेळी या मोठ्या माणसांनी समाजापुधे आदर्श ठेवला आहे. तुम्ही सुद्धा स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात आवाज उठावा. लेक वाच वा. समाज निरोगी बनवा.
-
Roopavedh (रूपवेध)
मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपटांमधल्या अनेक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारा रंगकर्मी, ‘रूपवेध’ ही नाट्यसंस्था सुरू करून चाकोरीबाहेरची अनेकानेक उत्तम नाटके रंगमंचावर आणणारा दिग्दर्शक, निर्माता, नाटकांबरोबरच साहित्य, संगीत अशा कलांमध्ये गती असणारा रसिक, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, विचारस्वातंत्र्याची चळवळ अशा समाजोपयोगी चळवळींशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता असे डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे पुस्तक ‘रूपवेध’. मराठी रंगभूमी, चित्रपट, सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अंधश्रद्धानिर्मूलन अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपली स्पष्ट आणि परखड मते मांडली आहेत कधी लेखांतून, कधी भाषणांमधून तर कधी मुलाखतींमधून. डॉक्टरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या या विविधरंगी पैलूंवर प्रकाश टाकणारे त्यांचे लेख, भाषणे आणि पुष्पा भावे, रामदास भटकळ, निखिल वागळे, जब्बार पटेल, महेश एलकुंचवार, अतुल पेठे, सुधीर गाडगीळ, रेखा इनामदार साने, विनया खडपेकर यांच्याबरोबरच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी घेतलेल्या डॉक्टरांच्या मुलाखती यांचे संकलन ‘रूपवेध’ या पुस्तकात केले आहे. मोठ्या आकारातील पाचशे पानांच्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मांडणी सुभाष अवचट यांची असून पुस्तकाचे आशयमूल्य आणि निर्मितीमूल्य यांकडे विशेष लक्ष पुरवणार्या ‘पॉप्युलर’च्या पुस्तकांच्या परंपरेला साजेसे हे पुस्तक आहे.
-
Majhya Jivnacha Noor kohinoor (माझ्या जीवनाचा नूर
गिरनीं कामगारासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी, त्या सार्या संघर्षाचा मी साक्षी. राष्ट्रीय मिल मजदुर संघातून नंतर गिरिणी कामगार सेना अश्या संघटनाच्या माध्यमातून माझा सक्रिय सहभाग होता. या संघर्षाचा मी साक्षिच नव्हे, तर एक अविभाज्य भाग झालो. अजुनही माझा संघर्ष संपलेला नाही आता तर मी ' कामगार कर्मचारी कल्याण फोरम ' च्या माध्यमातून माझा लढा लढतोच आहे. गिरानी कमागारावर झालेल्या या अन्यायबाबत , संघर्षाबद्दल कुणीही कुठेच नोंद घेतलेली नाही. आमच्या ह्या, जिवाच्या अकंतात लढलेल्या लढ़याविषय , आपणच सांगायला हव. असं माला तीव्रतेने वाटायला लागल. कुणीतरी विपरीत लिहण्यापेक्षा मला माझ्या चळवळीऩ जे करता आलं त्या कामगारासाठी किती केल राज्यकर्त्यानी किती मदत केली अणि कसं फसवल .... हे सगळ मला लिहायच होत. हा इतिहास आहे. कपोलकल्पित कथानक नव्हे
-
Vishwache Arta (विश्वाचे आर्त)
पर्यावरण हा तसा आपल्या सर्वाच्याच जगण्याला वेढून असलेला विषय, तरीही आपण पर्यावरणाच्या संदर्भात कमालीचे गाफील आणि बेफिकीर असतो. पाणी, जमीन, जंगल अशा सर्वच घटकांबाबत असलेली आपली बेपर्वाई एक दिवस आपला कडेलोट करणार, असे आपण वारंवार वाचतो, ऐकतो, तरीही याबाबत आपण किंचितही गंभीर नसतो. सर्वच पातळ्यांवर दिसून येणारी ही अनास्था हा अतुल देऊळगावकर यांच्या 'विश्वाचे आर्त' या पुस्तकाचा गाभा आहे. पर्यावरण ही बाब केवळ नैसर्गिक नाही तर त्यात बेमालूमपणे सामाजिक आणि राजकीय रंगही मिसळले आहेत, हे साधार दाखवून देतानाच सध्या जैवविविधता जपणारे व नष्ट करणारे यांच्यातल्या संघर्षांचे अनेक पैलू देऊळगावकर उलगडतात. अभ्यासकांच्या अहवालापासून ते समकालीन साहित्य, चित्रपट, छायाचित्रे अशा विपुल संदर्भासह त्यांनी हा विषय मांडला आहे. तरीही केवळ संदर्भ किंवा आकडेवारीत हे पुस्तक गुरफटले नाही तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत ते आपल्याला भानावर आणण्याचे काम करते. प्रश्नांची उकल, दुसरी बाजू आणि उपाय अशा पातळ्यांवर विषयाचा धांडोळा घेत असतानाच आपल्यातल्या विवेकबुद्धीला आवाहन करण्याचे काम करते.
-
Off Line (ऑफ लाईन)
विज्ञानकथा हा प्रकार मराठीत रुजवणा-या निवडक लेखकांपैकी एक म्हणजे डॉ. बाळ फोंडके. ‘ऑफ लाइन’ या नव्या कथासंग्रहातही अशाच विज्ञानकथा जरी असल्या तरीही या कथांना पूर्णपणे विज्ञानकथा म्हणता येणार नाही. कारण या कथा म्हणजे तंत्रज्ञानाच्या आवाक्याने झपाटून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा घेतलेला वेध म्हणावा लागेल. कारण वैज्ञानिक शोधामुळे मानवी आयुष्य अतिशय गतिमान झालं असलं तरी आयुष्याला मिळालेल्या या गतीमधून कुठेतरी आपलं माणूसपण हरवत चाललं आहे. याचीच जाणीव या कथा वाचताना वेळोवेळी होत राहते.
-
Gammat Goshti (गंमत गोष्टी)
खासबातमीचं भांडवल करणाया किसन न्हाव्याची तहा... पंचनाम्यात दुरुस्ती कशी करायची याचे प्रात्यक्षिक घेणारा नारायण कॉन्स्टेबल... दिल्लीला प्रदर्शन पाहण्यास निघालेल्या पाटलांनी घेतलेले विशेष ‘दर्शन’.... डिगूनानांच्या क्रियाकर्माला केवळ पैशांमुळे मिळालेला ‘वारस’....! नवशिक्षणशास्त्राचा प्रयोग बासनात गुंडाळून; पुन्हा ‘विद्या येई’चा पाठ गिरवणारे नवशिका शिक्षक... वधूसंशोधनाऐवजी ‘बुद्रुक’ का ‘खुर्द’ या फेऱ्यातच अडकलेला वर... अन् लगीन घरात सफाईने हात मारून सर्वांसमक्ष पोबारा करणारा ‘भामटा’.... ...या आणि अशाच इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शैलीतून मागोवा घेणाया द.मा. मिरासदारांच्या ‘गंमत गोष्टी’!
-
Bhutacha Janma (भुताचा जन्म)
...ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषत: विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडेतिकडे हिंडत असते. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करीत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्या वेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेषात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात; पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे, हे धोक्याचे असते.
-
Gudgulya (गुदगुल्या)
काही वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पडल्या. या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. म्हणून त्या दिशेने वर्दळ वाढली. इतकी की बघता बघता पाऊलवाटेचा गाडीरस्ता झाला, अनेक चाकोया उमटल्या, फुपोटा उडू लागला, अनेक ग्रामीण कथा लिहिल्या गेल्या. ग्रामीणकथेच्या निशाणाखाली आज पुष्कळ शिलेदारांची गर्दी झालेली आढळते. पण मिरासदारांनी पाडलेली वाट अजून पाऊलवाटच आहे. तिच्यावर गर्दी उसळलेली नाही. कारण ती वाट सवघड नाही. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो. हेच मिरासदारांचे अपूर्व असे यश आहे.
-
Chutkyachya Goshti (चुटक्याच्या गोष्टी)
गावात आलेल्या भोंदू "महाराजा`ची साक्ष शिवा जमदाडेबाबत खरी ठरते, तेव्हा... घरात शिरलेल्या चोरांना एक " धोरण` ठरवून रामभाऊ किल्ल्या देतात, तेव्हा... गावाचा "विकास` करायला विकासयोजना अ¬धिकारी नकार देतो, तेव्हा... अपघातात सापडलेल्या तलाठ्याविषयी गावकऱ्यांना वाटणारी "हळहळ` तिरस्कारात बदलते, तेव्हा... पैज लावणाऱ्या दामूची फजिती होते अन् ती त्याच्या जीवावर बेतते, तेव्हा... बायको आजारी पडावी यासाठी खटाटोप करणाऱ्या नवऱ्याच्या प्रयत्नांना यश येते, तेव्हा... पारावरच्या पाटलांची थाप खरी ठरते, तेव्हा... ग्रामसु¬धार योजनेच्या माध्यमातून शाळेची "प्रगती` होते, तेव्हा... "हेळातील भीषण प्रकार` पोरखेळ ठरतो, तेहा... भविष्य बघण्याचा "नाद` असलेल्या दत्तूचं भविष्य खरं ठरतं, तेव्हा.... द. मां. च्या "चुटक्याच्या गोष्टी` मधून मानवी स्वभावाचे विवि¬ध पैलू आपल्या समोर येतात. त्यातील काही आपल्याला अंतर्मुख करतात... तर काही हसवतात...!
-
Mi Ladachi maina Tumchi (मी लाडाची मैना तुमची)
मराठी रंगभूमीला वगनाट्याची ओळख नवी नाही. विच्छा माझी पुरी करा च्या लोकप्रियतेने ते सिद्धही केले आहे. वगनाट्याचे हे तंत्र अगदीच लवचिक असते... कलावंताच्या प्रतिभेनुसार आणि प्रयोगानुसार त्यात सतत बदल घडत असतात... त्यामुळेच वगनाट्याची गणना ‘स्वैर’ नाट्यात होत असावी.... ...वगनाट्याची ही लोकप्रियता लक्षात घेऊन, द. मा. मिरासदारांनी मी लाडाची मौना तुमची या गाजलेल्या वगनाट्याचे पुस्तकात रूपांतर केले. या वगनाट्याचे वौशिष्ट म्हणजे यासाठी लागणारा गण, गौळण, लावणी आणि मधला वग ही सगळी गीतरचना कै. ग. दि. माडगूळकर यांनी केली आहे. ...वगनाट्याच्या ऐवजी ‘प्रहसन’ (फार्स) म्हणूनही ते रंगमंचावर येऊ शकेल. यासाठी केलेला हा पुस्तकरूपी प्रयत् निश्चितच वाखाण्याजोगा आहे. ‘सोकाजीराव टांगमारे’ या नावाने आजही त्याचे प्रयोग होत आहेत.
-
Ganara Mulukh (गाणारा मुलुख)
ठणठणपूरच्या चक्रमादित्य महाराजांकडे एक गानसेन नावाचा गवई येतो. त्याच्या अदाकारीवर महाराज फिदा होतात. गवयाची इच्छा पूर्ण करायची म्हणून एक अचाट आदेश आपल्या प्रजेला लागू करतात. त्यामुळे होणाया गंमती अनुभवा ‘गाणारा मुलुख’ या नाटिकेमध्ये.
-
Hubehub (हुबेहुब)
‘हुबेहूब’ नक्कल करणाया बबनचे वास्तविक आयुष्यही नकलेसारखेच झाले... पोटाची खळगी भरण्यासाठी स्वार्थी माणसाने देवालाही ‘घाम’ फोडायला लावला... स्वत:च्या जिवापेक्षाही मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करणारा तात्या म्हातारा... ‘तगई’साठी पैसे खाणाया प्रत्येक माणसाला जन्मभराची अद्दल घडविणारा अण्णा भागवत... ‘जेवणवेळ’ झाली की, लिंबाखाली बसणाया आबामुळे कितीतरी चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या... केस कोणती अन् कशीही असू दे; दिगुअण्णा ‘साक्षीदार’ असले की, निकाल लागलाच म्हणून समजा... मानवी स्वभावाच्या अशा नाना कळा... अनुभवा द.मांच्या खुमासदार शैलीत!
-
Phalnichya Deshat (फाळणीच्या देशात)
दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष. पूर्व आणि पश्चिम जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत आणि भारताची फाळणी या सर्व घटना म्हणजे इतिहासाचा अविभाज्य काळा भाग. कालांतराने तो वर्णद्वेष विरघळतोय. भिंत तुटतेय... वारे वाहू लागलेयत. हा नवा इतिहास घडताना, तुटलेली मनंजुळत असलेली पाहताना एका संवेदनाक्षम पत्रकाराच्या मनात उठलेल्या स्पंदनांचं हे एक शब्दरूप...