-
Anandmai Garodarpan (आनंदमयी गरोदरपण)
गरोदरपणात घ्यावयाची शरीराची काळजी आणि गर्भ धारणे पासून ते बाळ जन्माला येईपर्यंत सकरात्मक विचार व उल्हसित वृत्ती कशी ठेवावी याचे साधे सोपे पण परिणामकारक उपाय लेखिका सांगते बाळ गर्भाशयात असताना त्यांचं आईशी भावनिक नातं तयार होतं. या पुस्तकामुळे ते नातं दृढ व्हायला नक्कीच मदत होईल.
-
Hawai Mulukhgiri (हवाई मुलूखगिरी)
अभिनेता असूनही गडकिल्ल्यांच्या निसर्ग वाटा पायी तुडवणारे मिलिंद गुणाजी आणि त्याचे जिवलग मित्र असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीतून साकारलेलं हे पुस्तक. हवाई छायाचित्रणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या एतिहसुच ठेव्याच्या 'याचि देही यचि डोळा' घेतलेल्या अदभूत दर्शनाचं हे सचित्र कथन. या हवाई मुलुखगिरीत कधी भोगोलिक ऐतिहासिक ज्ञानाची कसोटी लागलेली दिसते, तर कधी त्यातील मजेशीर प्रसंग हसवून लोटपोट करतात, कधी जीववरं बेतलेलं सहस निश:ब्द करतं तर कधी निसर्गच एक सुंदर काव्यरूप धरण करून समोर आलेला दिसतो! एक कवी मनाचा, संवेदनशील लेखक आणि प्रतिभावंत छायाचित्रकार यांच्या संयुक्त आविष्कारातून साकारलेली हि नितांत सुंदर, विहंगम अशी हवाई मुलूखगिरी!
-
Khawayanche Adae (खवय्यांचे अड्डे)
कुठेही भटकंतीला गेलं की रसिक खवय्ये मागे काढतात तो तिथल्या खाद्यपदार्थांच्या अडड्यांचा स्वाद. चाखू पाहतात तो तिथल्या खाद्यवैशिष्टयांचा, तिथल्या चवींचा! तुम्हीही तेच करता? मग खास हे तुमच्यासाठी हे पुस्तक... सगळ्या प्रांतातील खाऊच्या अड्ड्यांची माहिती देणारं! भटकंतीला जाताना बरोबर न्यावं असं … संग्राह्य!
-
Gost Mendha Gavachi (गोष्ट मेंढा गावाची)
मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढ्यासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण - आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे , सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगात अ[...]
-
Te Chauda Tas (ते चौदा तास)
सारं काही आलबेल असतानाच सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू... त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं... रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक, त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि कर्मचारयांनी सुरु केलेला मदतीचा ओघ... मृत्युच्या सावटाखाली घालवलेल्या 'त्या' चौदा तासंचा जीवघेणा अनुभव सांगताहेत. 'ताज' चे कर्मचारी अंकुर चावला... ते चौदा तास
-
Operation X (ऑपरेशन एक्स)
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आरोपी अजमल कसाबला फासावरं लटकवल्या जाण्याचा घटनाक्रम 'ऑपरेशन एक्स' या पुस्तकात मांडला आहे.