-
Lek bhuichi.. (लेक भुईची)
लेक भुइची हा कथा संग्रह म्हणजे विदार्भाच्या ग्रामीण स्त्रीजिवानाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. लेखिकाचा एका विशिष्ठ परिसराशी त्या भुइची लेक म्हणून आणि एक सवेंदनशील लेखिका म्हणून असा तिहेरी संबंध आहे. नांत आहे. आणि ह्या नातेसंबंधतुन त्यांच कथा लेखन अनायास सहजपणे या कथासंग्रहातील कथामधून फुलत जाताना दिसते. विधार्भातिल आजचा ग्रामीण परिसर झपाट्याने बदलत आहे. शहरी दिखुवुपना आणि पैसा यांच्या आकर्षणामुळे ग्रामीण परिसर आपली स्वतः ची अस्मिता आणि संस्कृती गमावत चालला आहे. त्यांच्यात एक कोरडा शुश्कपना येत चालला आहे. मानसामाणसाच्या नातेसंबंधातील ओलावा नष्ट होत चालला आहे. यापरिवर्तन ग्रामीण जीवनभर उमटत आहेत. या कथासंग्रहतिल बहुतेक कथा ह्याच्य केन्द्रभोवती फिरताना दिसतात. या परिवर्तनचे ग्रामीण स्त्रीजिवानावर होणारे सूक्ष्म परिणाम आणि त्यातून तिच्या जीवनात निर्माण होणारे संघर्ष यांचे सवेंदनशील चित्र या कथामधुन पहावयास मिळते.
-
Sugrancha Khopa ( सुगरनचा खोपा)
सुगरणचा खोपा संग्रहातील कथांचा आकार व आशयघनता घाटावर आहे. ग्रामीण जिवनातील सामन्याच्या दुःखचा आविष्कार इथे उत्कृष्ट परिणाम साधतो. अशिक्षित दरिद्री माणसाची तथाकथित सुशिक्षित पण मतलबी स्वार्थी मानसानी केलेली फसवणूक लेखिकेला कथातुन मांडावीशी वाटते गरीबी पोटी ज्यानी कायदा सांभाळायचा त्या पोलिस यंत्रनाही कश निरुपयोगी ठरतात ह्याच्याही प्रभवि चित्र ह्या कथातुं उमटते. लेखिकेची भाषा साधी, सोपी, वेधक आहे. त्यात भर पड़ते. आकर्षक सवांदाची ह्या कथामध्ये संवाद खरोखरच लक्षणीय आहेत. हे संवाद वर्हाडी बोलीत आहेत. त्यामुळे त्या भाषेतील गोडवा आपोआप संवादात उतरतो. ग्रामीण भाषेशी चांगला परिचय असल्याने भोवंडा धुइधानी इनवसे असे शब्द ग्रामीण वक्याप्रचार म्हणी आपल्याला जागोजाग आढळतात. त्यात निवेदानातिल अर्थगर्भता वाढते. सुगरणचा खोपा कथा तरुण मनाच्या स्वपनाच वेधक दर्शन घडवीते
-
Dairy Of Anne Frank (डायरी ऑफ ऑन फ्रँक)
ऍन फ्रँक ही एक तेरा वर्षाची ज्यू बालिका. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे घाबरून तिच्या कुटुंबातली चार व आणखी चार माणसे मिळून ऍम्स्टरडॅम येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर जवळजवळ दीड दोन वर्षे लपून रहातात. या अवधीत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरीही आज ना उद्या आपली सुटका होईल या आशेवर ती जगत राहतात. ऍनला तिच्या तेराव्या वाढदिवशी तिचे वडील एक रोजनिशी बक्षीस देतात. त्या दिवसापासून ती रोजनिशी लिहायला सुरवात करते, ती त्या सर्व मंडळींना पकडून छळगृहात नेईपर्यंत. तिथे अतिशय हालअपेष्टा सोसताना त्या आठांपैकी सात जणंना मृत्यू गाठतो. फक्त ऍनचे वडील ऑटो फ्रँक जगून वाचून सुटून परत येतात. त्यांना ऍनची रोजनिशी सापडते. तिचे संकलन करून ती ते छापतात. त्यात व्यक्तींची नावे काल्पनिक होती. परंतु युद्धसमाप्तीला अर्धशतक लोटल्यानंतर परत संपूर्ण रोजनिशी काही काटछाट न करता छापलेली आहे. 1995 साली हे लोक ज्या ठिकाणी अज्ञातवासात राहिले होते ती इमारत आता विकत घेऊन तिथे ऍन फ्रँकचे स्मारक केले आहे. ऍन वापरत असलेल्या काही वस्तू, तिचे हस्ताक्षर तिथे ठेवलेले आहे. तिच्या रोजनिशीची आजपर्यंत जगातल्या जवळजवळ सत्तर (70) भाषेत भाषांतरे झाली आहेत. ती सर्व, त्या ऍम्स्टरडॅममधल्या तिच्या स्मारकाच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवली आहेत.
-
Shodh Swami Vivekanandcha (शोध स्वामी विवेकानंदांच
स्वामी विवेकानंदांचा शोध आजवर काही कमीजणांनी घेतला नाही. त्यात अनेक देशांमधले सर्व प्रकारचे लोक आहेत. आघाडीचे वैज्ञानिक म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली ते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर हे आता या मांदियाळीत येऊन बसले आहेत. वैज्ञानिक दृष्टीची सोबत आणि असंख्य विषयांचे जागते कुतूहल असणारे दाभोळकर आज प्रस्थापित झालेल्या विवेकानंदांपेक्षा निराळ्या विवेकानंदांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करतात. ''मी केवळ हिंदुस्थानचा नाही, तुम्हा काही मूर्ख हिंदूंचा तर मिळूच नाही.मी सार्या जगाचा आहे आणि दक्षिण ध्रुवापासून ते उत्तर ध्रुवापर्यंत प्रज्वलित होत जाणारी ज्वालाग्राही तरुणांची संघटना मला उभारायची आहे.'' आपल्या गुरुबंधूंना पत्रातून असे सांगणाऱ्या समाजवादी विवेकानंदांची खरी ओळख करून देणारे हे पुस्तक.