-
Majha Desh,Majhe Manasa (माझा देश, माझी माणसं)
तिबेटचे आणि बौद्धांचे प्रमुख दलाई लामा यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांवर त्यांच्याच लेखणीतून टाकलेला प्रकाशझोत, मराठीत प्रथमच. दलाई लामांच्या आशीर्वादाने केलेल्या या अनुवादात चीनने तिबेटची केलेली घोर फसणूक, तिबेटमध्ये केलेली हत्याकांडे आणि निर्वशीकारनाचे प्रयत्न या सगळ्याचे साक्षीदार असलेल्या दलाई लामांचे हे आत्मचरित्र विसाव्या शतकातील जागतिक राजनीतीवर देखील भाष्य करते.
-
Mandela (मंडेला)
नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, सा-या जगासाठी प्रकाशा[...]
-
Vedh (वेध)
आपण कोण आहोत हे आपल्यालाच तोंडावर काधिकाळी सांगण्यात येईल असं त्याला वाटलं नव्हतं. पण ते नागाडं सत्य होतं. जगातल्या काही मोजक्याच लोकांना ते माहीत होतं. आणि ते लोक याची कुठेही वाच्यता करणार नाहीत याची मला खात्री होती. तरी प्रतापसिंह भनोतना समजलं होतं. कोणाला तरी आपला जीव नकोसा झाला होता. तो कोण?
-
Priya Babu Aanna (प्रिय बाबुआण्णा)
ख्यातनाम कथाकार जी. ए, कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही वेगळे, हृद्य पैलू "प्रिय बाबुअण्णा' या पुस्तकातून प्रकाशात आले आहेत. जीएंच्या मावसभगिनी नंदा पैठणकर यांनी आपल्या मावसभावाच्या आठवणी समरसून[...]
-
Sobat.... (सोबत)
कवितेचे लेणे हृदयामध्ये घेऊन जन्मलेला लेखक नकळत गद्यातही कविता लिहू लागतो. मधु मंगेश कर्णिक हे असे एक काव्यात्म गद्य लिहिणारे लेखक आहेत. अनेक वर्षापूर्वी, `सत्यकथे’मध्ये `चेहरा असलेली झाडे’ या शीर्षकाने त्यांचे काही अगदी वेगळे लेखन प्रसिद्ध झाले; आणि त्याने साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले. आजूबाजूच्या, नेहमी दिसणार्या झाडापेडांवर कर्णिकांनी मोठ्या काव्यात्मतेने लिहिले होते. कर्णिकांनी ज्या नजरेने वृक्षवल्लरींना, प्राणिजगताला, निसर्गाला न्याहाळले, त्या नजरेत अजाण बालकाचे कुतूहल, जाणत्याची जिज्ञासा, कलाकाराची संवेदना, रसिकाची तन्मयता आणि कवीची सहृदयता होती. आज जवळ जवळ चार दशकांनंतरही `सोबत’मधील लेखन त्या वेळेएवढेच ताजे, टवटवीत आढळते, हा मधु मंगेश कर्णिकांच्या अमोघ लेखणीचा महिमा होय.
-
Aharatun Upchar (आहारातून उपचार)
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. अंजली मुखर्जी यांच्या Healing with Food या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ‘आरोग्य आणि पोषक आहार’ याचे दुसरे नाव म्हणजे डॉ. अंजली मुखर्जी! अन्नामध्ये रोग बरा करण्याची जी अंगभूत ताकद असते, तिचे यथायोग्य सादरीकरण डॉ. अंजली मुखर्जी यांनी या पुस्तकातून केले आहे. आधुनिक जीवनपद्धती आणि त्यातले ताणतणाव यामुळे जास्तीत जास्त लोक निरनिराळ्या व्याधींनी त्रस्त झालेले दिसतात. त्यातूनही हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सर हे सर्वाधिक मृत्यू होण्यास कारणीभूत ठरणारे तीन रोग आधुनिक जीवनशैली व खानपान यांचे परिणाम आहेत. त्यामुळेच योग्य खाण्या-पिण्याच्या सवयी रोगप्रतिबंधक असतात, याचाच पुरस्कार करणार्या डॉ. अंजली मुखर्जी यांनी आहारातून उपचार या पुस्तकातून रोग बरा करण्याचे साधनही अन्नच आहे हे सिद्ध केले आहे.
-
Kalndar (कलंदर)
'ह्त्या' कादंबरीचा 'कलंदर' हां पुधील भाग;- पण किती तरी वेगळा. 'ह्त्या' तील आत्मकथानाची शैलीच केवळ इथे बदलली आहे, असे नाही, तर पेंडसे यांच्या कालेने आपल्या विकासाचा पुढील टप्पा गाठला आहे. निसर्ग येथे कथेच्या भावगुणाशी एकजीव आणि म्हणून अधिक समृध्हा झाला आहे.; व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य तसेच रसरशीत आहे. पण ते अधिक विविध रुपे धारण करते आहे; कथानाकाची गुंफण अधिक सूक्ष्म आणि म्हणून अधिक वेधक झाली आहे. 'एल्गार','हृदयपार' गारंबीचा बापू' ,'ह्त्या' या आपल्या पूर्वीच्या कादंबर्यात पेंडसे यांनी रंगविलेले जीवनाचे चित्र अधिकाधिक सुक्ष्म व् संमिश्र होत गेले आहे. 'कलंदर'मध्ये तर पाचात्य संगीतातील अनेक वाद्यांच्या स्वरामेलाची आठवां व्हावी, इतके ते संमिश्र, चढ़ते आणि अनेक बिंदुभोवती रुंजी घालुनाही एक केंद्राकडे झेप घेणारे व् अनेक पाताल्यान्वर विकास पावुन्देखील एकात्म व् सुसंवादी आहे.
-
Common Man (कॉमन मॅन)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात या वेळी कोणीही न सांगता सामान्य माणूस सहभागी झाला. सामान्य माणसाची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अशाच सामान्य माणसाचं चित्रण या पुस्तकात आहे. सामान्य माणूस गांजला जात असतो, पिचला जातो. त्याचे सर्व बाजूंने शोषण होत असते, शोषणातच उद्रेकाचं बीज असतं. लाव्हा अचानक उसळत नसतो. अनेक घटना घडल्यावर तो उसळतो. या पुस्तकात सामान्य माणूसच केंद्रस्थानी आहे. बबन मिंडे यांनी लिहिलेल्या या कादंबरीतल्या सदाशिव नारायण नवगिरेची अस्वस्थता वाचकाला अस्वस्थ करते. मिंडे यांच्या लेखनाचे हे यश आहे.