-
Ganimi Kava (गनिमी कावा )
मराठ्यांच्या या युद्धतंत्राची प्रेरणा घेऊन हिंदुस्थानात १८५७ चा उठाव झाला जगातील ४२ गुलाम राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा आणि ताकद या शिवतंत्राने दिली. शिवतंत्राचा उपयोग करून जी राष्ट्रे स्वतंत्र झाली त्यामध्ये क्युबा, व्हिएतनाम, जर्मनी, जपान अगदी शेजारील बांगलादेशही आहे. व्हिएतनामचे गुरिल्ला वार, जर्मनीची ब्लीट्स क्रिग, जपानची छापामारी, माओत्सोतुंगचा स्वातंत्र्य लढा ही सर्व शिवछत्रपतींची गनिमी काव्याची आधुनिक रूपे. म्हणून खऱ्या अर्थाने मराठ्यांचे युद्धतंत्र जागतिक कीर्तीचे आहे. या देशातील क्रांतीकाराकांनी जेव्हा सशस्त्र क्रांतीचा लढा उभारायचे ठरविले तेव्हा त्यांच्या समोर एकच नाव, एकच प्रदेश आणि एकच युद्धतंत्र होते. ते म्हणजे शिवशंभू छत्रपती, महाराष्ट्र आणि मराठ्यांचा गनिमी कावा. शंभूराजांच्या २०० व्या जयंतीचे (१४ मे १६५७) अवचीत्य साधून या देशातील क्रांतिकारकांनी पहिला उठाव केला. तो म्हणजे १८५७ चा राष्ट्रीय उठाव. आणि हाच गनिमी काव्याचा वणवा पेटता ठेवून आझाद हिंद फौज आणि इतर संघटनांनी मिळून पुढील नव्वद वर्षात हा देश स्वतंत्र केला आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान आणि यशस्थान जर काय असेल तर तो मराठ्यांचा गनिमी कावाच. आता याच गनिमी कावा युद्धतंत्राचा उपयोग जगातील प्रगत ३५ राष्ट्रांमध्ये केला जातो. आपण या शिवतंत्राचा उपयोग आजही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी निश्चित करू शकतो.
-
Panipatcha Vijay (पानिपतचा विजय)
विदेशी आक्रमकांना कायमचा धडा शिकविणाऱ्या महायुद्धाचा खरा वेध या युद्धात जसे मराठ्यांचे नुकसान झाले तसेच मोठ्या प्रमाणावर अब्दालीचेही झाले. विजय म्हणावा तसा अब्दालीला या युद्धातून ना पैसा मिळाला, ना मुलुख, ना एखादी सत्ता. मग विजय तो कसला आणि कशाचा? या युद्धातून मराठ्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागल्याचे क्षणिक चित्र दिसते तर दुरगामी दृष्टिकोनातून पाहिले तर मोठा दीर्घकालीन निर्णायक विजय मराठ्यांनी या युद्धात नोंदवला. या युद्धानंतर ३५ वर्षे दिल्लीवर भगवा फडकला. मराठ्यांचा या पार्थ पराक्रमामुळे पंजाबातील शिखांनाही परकीय आक्रामकांविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळाली. स्वातंत्र्यासाठी अनेक दशके लढणाऱ्या शिखांच्या स्वातंत्र्याची पायरी मराठ्यांनी बसविली हे विसरून कसे चालेल. अब्दाली स्वतःच्या अटीवर नव्हे तर मराठ्यांना हवा तसा तह करून या प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू इच्छित होता ते याच कारणामुळे. मराठ्यांनी अब्दालीला दिलेला तडाखा एवढा जबरदस्त होता की खुद्द अफगाणिस्थानात अब्दाली जिवंत राहील का? असा प्रश्न लोकांना पडला. कांदाहारात अनेक प्रकारच्या बातम्या पसरू लागल्या. त्यात अब्दालीचा दारूण पराभव झाल्याची बातमी सराव मोठी होती. आता हिंदुस्थानात तर काही मिळाले नव्हते. आणी तिकडे दोन वर्षे अब्दाली भारतातच अडकल्यामुळे त्याच्या प्रभावाची बातमी तिकडे पोहोचल्यामुळे तिथले तख्तही बुडण्याच्या भीतीने अब्दालीला पाळणे भागच होते, तो जिवंत राहिला होता हेच त्याचे नशीब आणि हाही इतिहास जाणून होता की सिकंदर सारख्या जगजेत्याला हिंदुस्थानातील लोकांनी तांगडून मारला होता आणि बेबीलोनला तो जिवंत पोहचू दिला नव्हता. आपलाही मराठे सिकंदर करतील या भीतीने गाळण उडालेल्या अब्दालीने असेल तशा परिस्थितीत मोकळ्या हातांनी खिन्नावस्थेत हिंदुस्थान सोडला.
-
Niramay Kaamjivan (निरामय कामजीवन)
कामजीवन हे श्र्वसन, पचन, निद्रेसारखेच अगत्याचे; तरीही पर्यावरण, आहार, निद्रेविषयी जितकी जागरूकता आढळते, तितकी कामविज्ञानाविषयी आढळत नाही. विवाह पूज्य, मातृत्व पूज्य पण यातील दुवा म्हणजे कामजीवन हे अश्र्लील मानले जाते. स्त्री-पुरुष मीलनाचा आनंद घेणे नैसर्गिक असले, तरी त्याविषयी उघडपणे चर्चा करणे शिष्टसंमत नसल्यामुळे कामविषयक परंपरागत अज्ञान व गैरसमजुती आजही टिकून आहेत. ही जळमटे नाहीशी करणारा हा ग्रंथ. विसाव्या शतकाच्या मध्यानंतर आल्फ्रेड किन्से, डॉ. मास्टर्स व जॉन्सन, डॉ. हेलन सिंगर कॅप्लान यांच्या प्रदीर्घ संशोधनामुळे कामजीवनासंबंधीच्या विचारात जगभर आमूलाग्र बदल घडून आला. कामवृत्ती (Sexual Behaviour) कामप्रतिसाद (Sexual Response), कामअसमर्थता (Sexual Inadequacy) या विषयांची अधिक जाण आली. नपुंसकत्व, शीघ्रपतन, योनिआकर्ष, कामउदासीनता यांसारख्या लैंगिक समस्यांसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांनी सुचविलेले उपचार या ग्रंथात दिले आहेत. लैंगिकता शिक्षणावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. यौवनात पदार्पण, विवाहपूर्व मार्गदर्शन, विवाह, कामक्रिया, विवाहाची अपूर्तता, लैंगिक आगळीक, गर्भधारणा, संततिनियमन, एड्स, गुप्तरोग, जनननिवृत्ती, थोडक्यात-कुमारावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतची कामजीवनाची संपूर्ण माहिती सोप्या, सरळ, सुबोध भाषेत विवेचन करणारे हे एकमेव संग्राह्य पुस्तक.
-
Ra.Dho.Karve (र.धों.कर्वे )
विसाव्या शतकाच्या शुभारंभाच्या वर्षात (१९०१) रघुनाथ धोंडो कर्वे नावाच्या अवघ्या एकोणीस वर्षाचा तरुण, संततिनियमनविषयक मते मांडतो, त्याचं महत्व ओळखतो, ही गोष्टच इतकी महत्वाची आहे, की एकविसाव्या शतकातला आपल्या देशातल्या लोकसंख्येचा विस्फोट पाहता, या दृष्ट्या माणसाने संततिनियमनाचे महत्व शंभर वर्ष आधी ओळखले होते; याचा विस्मय वाटतो. प्रो. रघुनाथ धोंडो कर्वे यांचे हे कार्य आज कालबाह्य वाटण्यासारखे तर नाहीच; उलट आजच्या विज्ञानप्रगत काळातही त्याचे महत्व जास्तच अधोरेखित होते.
-
Sambhav-Asambhav (संभाव असंभव)
माणसाच्या आकलनापलीकडे काही अदृश्य, पारलौकिक, अधिभौतिक स्वरूपाच्या शक्ती आहेत, अशी समजूत माणूस बाळगून आहे. देव या संकल्पनेवरची श्रद्धा ही त्यातली सर्वांत आदिम. पण देवाप्रमाणेच माणसाचा आत्मा, साक्षात्काराचे अनुभव, समाधिवस्था, आतला आवाज, मृत्युसमीप व मृत्युपश्चात अनुभव यांवरही लोक विश्वास बाळगून असतात. माणसाच्या या श्रद्धांचा जगभरातले शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्षं रीतसर अभ्यास करत आहेत. विज्ञानाच्या कसोटीवर माणसाच्या समजुती तपासून पाहत आहेत. या संशोधनाचा आणि त्यातून निघणा-या निष्कर्षांचा धांडोळा.
-
Marathi Riyasat (Chhatrapati Dhakate Shahuraje,Pes
'गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत.
-
Marathi Riyasat (Chhatrapati Ramraja,Chhatrapati D

'गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत
-
Marathi Riyasat (Nigrahak Madhavrao,Apeshi Narayan
'गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत.
-
Marathi Riyasat (Peshwa Bajirao) Khand-4 (पेशवे बा