-
Tumbadche Khot Khand 1 Ani 2( तुंबाडचे खोत खंड १ आणि २)
मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार ही श्री. ना. पंडसे यांची आजची पदवी आहे. रसिकांची व श्री. पेंडसे यांचीही आजवर समजूत अशी होती की 'रथचक्र' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी. 'एल्गार'पासून सुरू झालेल्या त्यांच्या कादंबरीयात्रेचा अखेरचा मुक्काम म्हणजे 'रथचक्र'! आणि असे वाटत होते की त्यानंतर स्वभावधर्मानुसार ते कादंबरीलिखाण करतच रहातील पण 'रथचक्र' नंतर काही भव्यतर आलोक असेल, अशी त्यांना व रसिकांना बहुतकरून कल्पनाही नसणार. - पण मराठी कादंबरीचे भाग्य असे की 'रथचक्र' नंतर आता आणखी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी पेंडसे यांनी लिहिली आहे, 'तुंबाडचे खोत'. मुळात या दुखंडी कादंबरीचा आवाकाच प्रचंड आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम दशकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी. म्हणजे जवळपास सव्वशे वर्षांचा हा प्रदीर्घ कालखंड आहे. तुंबाडकर खोतांच्या आद्य पूर्वजांपासूम विद्यमान वंशजांपर्यंत या इतिहासाची व्याप्ती आहे. या चित्रविचित्र इतिहासाच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष अशा व्यक्ती आणि त्या व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्या अनिक घटना भेटत रहातात. त्यात पुन्हा एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीसारखी नाही. एक घटना दुसरीसारखी नाही. एकूणएक सर्वच व्यक्ती व घटना स्वत्वविषेष अशा. आणि काळ सव्वाशे वर्षे असला तरी स्थळ मात्र एकच: तुंबाड आणि तुंबाडचा परिसर. तुंबाडच्या खोतांच्या कुलवृतांताची ही बखर ही एखाद्या रम्याद्भुत आणि उग्रभीषण कहाणीसारखी आहे.
-
Swa-gat(स्व-गत)
नाना तर्हेच्या लोकांची विविध आयुष्यं कधी एकमेकांत गुंतत, तर कधी सुटीसुटी धावत असतात. त्यांतलंच नशिबी आलेलं एक आयुष्य पकडून धावणार्या आणि वाटेत भेटणार्या इतर आयुष्यांविषयी मनात असंख्य प्रश्न मांडणार्या आणि त्यांची उत्तरं हरवून बसणार्या शिवनाथ हरबा ओटवणे याचं हे स्व-गत.
-
Pradashin( प्रदक्षिणा)
व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेणं हा दळवींच्या एकूण साहित्याचा केंद्रबिंदू. माणसाच्या आयुष्यातील आत्यंतिक दु:खाचा संबंध बहुतेक वेळा दळवींनी स्त्री-पुरुष संबंधांशी जोडलेला आहे. लैंगिकता, वेड आणि वेदनेची विविध रूपं दळवी कादंबर्यांतून न्याहाळतात. दळवींच्या बर्याच कथा-कादंबर्यांतून दिसणारं विजोड संसाराचं चित्र हे त्यांच्या ऐकीव अनुभवांतून उभं राहिलेलं आहे. या संसारचित्रांतील स्त्री-पुरुष संबांधाचा विशेष हा की हे संबंधसुखाचे नाहीत, सुरळीत नाहीत, कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे. मग ते संबंध विवाहपूर्व असोत; विवाहोत्तर असोत किंवा वैधव्यदशा वा विधुरावस्थेतले असोत! दोघांपैकी एकानं पुरतं उद्ध्वस्त व्हावं, दुसर्यानं ते उद्ध्वस्त होणं सुन्न मनाने बघावं, आणि बघताबघता अखेर त्या नजरेतील ओळख हरवून जावं, असेच या अनुभवांचे स्वरूप असतं. ‘प्रदक्षिणा’ या दळवींच्या कादंबरीतूनही मानवी नातेसंबंधातल्या गुंतागुंतीविषयी दळवी आपले निरीक्षण मांडतात. एका नाटककाराच्या आयुष्याविषयी- त्याचा कलंदरपणा आणि शेवटी त्याची झालेली शोकात्मिका याचे प्रभावी चित्रण या कादंबरीतून दळवींनी केले आहे. नाटककार आणि त्यांची पत्नी – त्यांच्यातील ताणतणाव, नाटककाराच्या मुलींच्या आयुष्याची झालेली परवड याचे सुन्न करणारे दर्शन इथे घडते. आणि हे सर्व घडत असताना अवतीभवतीचा समाज, त्यातल्या व्यक्ती, त्यांचे अंतर्गत ताणतणाव यांबद्दलचे दळवींचे भान कधी सुटत नाही, याचा प्रत्यय त्यांच्या ‘प्रदक्षिणा’ या कादंबरीतूनही येतो.
-
Mahananda (महानंदा)
महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा ! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपण नाही. किंबहुना ही प्रेमकथा असली, तरी ती एका ‘जुगारा’चीच चटका लावणारी कथा आहे, असे म्हणावे लागेल !
-
Jeta Mi Bhagyavan Kartutvan (जेता मी भाग्यवान कर्त
डॉ. ज्ञानराज गायकवाड यांच्या या आत्मचरित्रात त्यांना करावा लागलेला संघर्ष तर कळतोच, शिवाय ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्नही कळतात. हिंदी विषयातील त्यांची रुची आणि त्यासाठी त्यांनी घेतलेल[...]