-
Aaplyala He Mahit Have! (आपल्याला हे माहीत हवे!)
चौकसबुद्धीने जगाकडे पाहणार्या आणि वाचन करणार्याला अनके प्रश्न पडत असतात. कुतूहल वाटत असते, मात्र त्या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी हाती लागत नाहीत. अशा काही प्रश्नांची उत्तरे दिगंबर गाडगीळ यांनी संकलित केली आहेत. सामान्य ज्ञान वाढवण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरू शकते. या प्रश्नांमध्ये फुलांना गंध का असतो, चंद्रावर धूळ का नव्हती?, सागरी तळातील लोखंडी अवशेष, जगातील पहिले पेटंट कुठले?, मायक्रोवेव्हमध्ये धातूचे भांडे का ठेवू नये, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
-
Band Khidkibaher (बंद खिडकीबाहेर)
सुलभा ब्रह्मनाळकर यांचा ललित लेखांचा हा संग्रह. हे ललित लेख म्हणजे प्रवासवर्णने आहेत. मौज आणि पद्मगंधा दिवाळी अंकातील लेखांचा हा संग्रह आहे. भारत आणि परदेशांतील अनेक ठिकाणे त्यांनी बघितली.त्या सार्यांचे त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने वर्णन केले आहे.आपल्या प्रवासात त्यांनी काही लेखकांच्या शहरालाही भेट दिली. त्यांच्या लेखनात केवळ स्थळांची वर्णने नाहीत, तर तिथली संस्कृती, लोकजीवन, आदीचा तपशील येतो. तसेच नृत्यकला आणि शिल्पकला याचीही माहिती येते. संगीत, चित्रकला या विषयांची माहिती देत त्या प्रवासाचे वर्णन करतात, त्यामुळे केवळ प्रवासवर्णनपर लेख, इतकेच स्वरूप या लेखांना राहत नाही. लेखिकेने लेखनाचा वेगळा प्रयोग केला असून, तो वाचनीयही झाला आहे.