-
For Your Eyes Only
ती टेबलापाशी पोहोचली. बॉंडची नजर तिच्यावरच खिळलेली होती. "काही उपयोग नाही," त्यानं निराशेनं स्वत:शीच म्हटलं. "आपल्याकडे कसली येते ती ? ती नक्कीच तिच्या कुणा दोस्ताला भेटायला येत असणार. असली सुंदर पोरगी नेहमी दुसर्याच कुणाच्या नशिबात असते. हं ! काय पण नशीब आहे !" पण त्यानं स्वत:ला सावरण्याआधीच ती त्याच्या जवळ आलेली होती. एवढंच काय,चक्क त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसलीही होती. "सॉरी मला उशीर झाला. आपल्याला लगेच निघावं लागेल. तुला ताबडतोब ऑफिसमध्ये बोलावलंय." भराभरा ती बोलली आणि मग तिनं हळूच दोन शब्द उच्चारले, "क्रॅश ड्राईव्ह." अचानक आलेल्या अडचणी आणि दिसतात त्यापेक्षा कुणी वेगळ्याच असलेल्या सुंदर पोरी, या दोन्ही गोष्टी जेम्स बॉंडच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनून गेल्या आहेत आणि जेव्हा एखादी कामगिरी त्याच्यावर सोपवलेली असते, तेव्हा ही सगळी कहाणी उत्कंठावर्धक असणार हे नक्की असतं. - एखाद्या क्यूबन गुंडाच्या हत्येची अमेरिकेतली कहाणी असो. हेरॉईनचा व्यापार करणार्या आंतरराष्ट्रीय टोळीचा नायनाट करण्याची कामगिरी असो किंवा सेशेल्समध्ये अचानक झालेला एखादा मृत्यू असो, बॉंड ती कामगिरी त्याच्या खास पद्धतीनंच पार पाडणार...
-
Ketkarvahini
गेल्या शतकाचा पूर्वार्ध. स्त्री-शिक्षणाची सुरूवात. शहरातली एक मुलगी लग्न करून कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात गेली.उराशी सुंदर संसाराची स्वप्नं बाळगून. कडू-गोड अनुभवामधून जाताना तिच्या जीवनात वादळ आलं. आणि मग सुरु झला तिचा प्रतिकूल परिस्थितीशी झगडा. त्यातच मिसळली कायद्याची लढाई. ज्या कायद्याच्या लढाईत पतीची हत्या झाली, त्या युद्धभूमीला पाठ न दाखवता यशस्वीपणे लढत- झगडत राहणार्या केतकरवहिनींची कहाणी. गेल्या शतकातील स्त्रीजीवन आणि तिची आंतरिक शक्ती यांचं मनोज्ञ दर्शन घडवणारी वास्तव कहाणी. उमा कुलकर्णींच्या ओघवत्या शैलीत. त्यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती.
-
Sambhaji (संभाजी)
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंâवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
-
Operation Molasys (ऑपरेशन मोलॅसिस)
परदेशात काम करणारा एक तरुण, जिज्ञासू भारतीय संशोधक. संशोधन करताकरता हाती आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुपितापायी मारला जातो, आणखी एक अनाकलनीय गुपित मागे ठेवून. त्या गुपिताचा एक हिस्सा असते त्याची बहीण. एक सामान्य मुलगी. ही सामान्य मुलगी त्या अनोळख्या देशात आपल्या मृत भावाचं शरीर ताब्यात घ्यायला निघते. तेथील अपरंपार अडचणींची जाणीव असूनही स्वत:ला खंबीर बनवते. प्रत्यक्षात मात्र संकटांची एक जीवघेणी मालिकाच तिच्याभोवती सुरूहोते... तिचा अक्षरश: अंत बघू लागते... ते गुपित आणि त्या जीवघेण्या गुपिताची पाळंमुळं जिथपय|त पोहोचली होती, तो भयानक मार्ग ! सारंच गूढ, अतर्क्य...
-
Sex Worker
स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर एखादीच्या आयुष्याची वाट इतकी वळणावळणाची आणि काटेरी का असावी? समाजाच्या रूढ, नौतिक चौकटीबाहेरचं जीवन स्वीकारावं लागलेल्या, देहविक्रय व्यवसायात येऊन जीवनाशी विलक्षण संघर्ष करत, करकरीत वास्तवाशी थेट नजर भिडवून वाटचाल करणार्या स्त्रीच्या प्रांजळ लेखणीतून उतरलेली ही आत्मकथा "ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन"चा अनुभव देते. अत्यंत वैचित्र्यपूर्ण घटना-प्रसंग कथन करत, समाजाच्या बेगडी नौतिकतेवर सहज शब्दांत पण भेदक प्रहार करत वाचकाच्या मनाचा ठाव घेते.
-
Chhava
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा' च्या जोरदार स्वागतानं तर हे सिध्द झालं आहे. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमत एअकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिध्द केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!