-
Gata Rahe (गाता रहे)
संगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा, हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही. जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर - ‘धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत'. संगीत जुने असो वा नवे, ‘आपले' असो वा ‘त्यांचे', शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिलो, तर सुरुवात होते कानसेन रसिक होण्यास! नवी-जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताची सुरीली मैफील -
-
Wani Ani Lekhani (वाणी आणि लेखणी)
गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन'. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस'चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. दिलीप माजगावकरांनी विविध प्रसंगी प्रकाशनासंबंधी अनुभवसिद्ध मतं मांडली आणि व्यवसायाच्या भवितव्याचा वेध घेतला. त्यांच्या वाणीनं विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती आणि साहित्यकृतींचा आस्थेवाईकपणे शोध घेतला. त्यांच्या अशा निवडक रसाळ भाषणांचं संकलन : अवधारिजो जी... अनेकांच्या लेखनावर प्रकाशझोत टाकणार्यान दिलीप माजगावकरांची स्वत:ची लेखणीही टोकदार, टवटवीत आणि आशयसंपन्न असल्याचं अधोरेखित होतं ते त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांतून. त्यांनी आंतरिक जिव्हाळ्यानं रेखाटलेली बारा विलक्षण व्यक्तिचित्रं : अंतरीचे उमटे बाहेरी... व्यक्तिचित्रं आणि भाषणांतून उलगडलेला महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक संचिताचा छोटा पट वाणी आणि लेखणी
-
Patra Ani Maitra (पत्र आणि मैत्र)
गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन'. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस'चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी ‘या हृदयीचे त्या हृदयी' घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : ‘सप्रेम नमस्कार'. ‘राजहंस'च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : ‘प्रवास श्रेयसाकडे'. ‘दिगमा' या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुहृदांचे लेख : ‘असे दिसले दिगमा'. या सार्यािचा अंतर्भाव असलेलं – महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं – पत्र आणि मैत्र
-
Sambhramachi Goshta (संभ्रमाची गोष्ट)
काळाचे निदान करणे अवघड असते. समाजचिंतक आणि सर्जनशील लेखक ते करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. काळाचा तळठाव धुंडाळून मानवी जगण्याच्या अंगोपांगांना वेढून राहणार्यास काळसंदर्भांचा उलगडा करण्याचा, आपल्या काळाला समजून घेण्याचा हा एक भाग असतो. गेल्या दशक-दोन दशकांपासून ही प्रक्रिया अधिकाधिक गुंतागुंताची आणि अतर्क्य होत चालली आहे. कारण माणूसपणाच्या विकसनशीलतेला आकार देण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या आणि गेल्या शतकापासून गतिमान झालेल्या आधुनिकीकरण - अत्याधुनिकीकरण या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्यार अनेकानेक बाबींची विपरीतता समकाळाच्या संभ्रमित रूपाला आकार देणारी ठरली आहे. त्यातील एका दुखर्याच वेदनेचा माग काढण्याच्या भूमिकेतून पी. विठ्ठल यांची ही कादंबरी आपल्यासमोर येते. डॉ. आशुतोष पाटील आपल्या जगण्याचा एक भाग असलेला गुंता उकलून त्याच्या दाहक विरूपाचे दर्शन प्रत्ययकारीपणे घडवणारी कादंबरी.
-
Sutaka (सुटका)
भारती मेहता यांची 'सुटका' ही लघुकादंबरी मी उत्सुकतेने वाचली आणि ती मला आवडली. ती एक सुरेख कुटुंबकथा आहे. कुटुंब कथेतील कुटुंब-वात्सल्याने त्यांची ही कथा परिपूर्ण आहे. कोकणातील माणगाव-मुरुड यासारख्या लहान गावातील कुटुंबे, त्यांचे परस्पर संबंध, तेथील शेतीवाडी, तीमध्ये तनमनाने गुंतून राहिलेली, परस्परांशी प्रेमभावनांचे अनुबंध जपणारी सरळमार्गी, निष्कपटी माणसे व त्यांच्यातील एक सुसंस्कृत खानदानी कुटुंबाची ही कहाणी भारती मेहतांनी वाचकाचे मन गुंतून ठेवील अशा कौशल्याने लिहिली आहे. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत जीवन हळूहळू अस्तंगत होत चाललेले दिसत असताना भारती मेहतांनी त्याला आपल्या प्रत्ययकारी लेखणीने जिवंत केलेले या कथानकांत दिसते. 'सुटका' हे कादंबरीचे शीर्षकही अन्वर्थक आहे. भारती मेहता यांनी भोवतालच्या समाजाचे बारकाईने आणि जातिवंत लेखिकेच्या नजरेने निरीक्षण केल्याचे जाणवते. मध्यमवर्गातील नातेसंबंध, रुसवे-फुगवे, मैत्रिणींमधील भांडणे व दिलजमाई, मोहिनी या मुलीचे अहंकारी वागणे व बऱ्या-वाईटाची जाणीव नसणे अशा अनेक स्वभाव वैशिष्ट्यांनी त्यांनी या कादंबरीचे लेखन केले आहे. त्यामुळेच ते प्रत्ययकारी वाचकाच्या मनाला भिडणारे झालेले आहे. साधी सरळ कुटुंबकथा किती नाट्यमय वळणे घेऊन पुढे सरकते हे वाचताना वाचकाची उत्कंठा वाढत जाते. - मधु मंगेश कर्णिक
-
Samajsevika Sudha Murty Jeevan Charitra (समाजसेविक
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय, हे जर समजून घ्यायचं असेल तर सुधा मूर्ती या आदर्श उदाहरण आहेत. इन्फोसिससारख्या भारतातीलच नव्हे तर जगातील अग्रगण्य कंपनीच्या 'इन्फोसिस फाऊंडेशन' या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. शालेय शिक्षणापासून ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वच क्षेत्रांतील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. इंजिनिअरिंग, आयटी, लेखन, सामाजिक कार्य व कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वच क्षेत्रांवर त्यांनी स्वतःचा सकारात्मक ठसा उमटवला आहे. * बालपण ते आदर्श व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास * समाजसेवेला वाहून घेणारं परोपकारी व्यक्तिमत्त्व * सुधाजींकडून शिकता येण्याजोगे महत्त्वपूर्ण पाठ * फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेले समाजकार्य.... * तरुण व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन * आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या आदर्श गोष्टी * शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रातील कामगिरी * नेतृत्व, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील योगदान * उद्योजिका, लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्तींचा प्रेरणादायी प्रवास * वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधणारी आदर्श महिला
-
Manashakti Vadhwa (मन:शक्ती वाढवा)
तुमचे मनावर नियंत्रण तुमच्या जीवनावर नियंत्रण इस बेस्टसेलिंग किताबात लेखक आणि लाइफ कोच गौर गोपाल दासते सांगतात कि आमचे मन कसे काम करते. तुमची सर्वोत्तम किस्सागोई शैली कशी आहे ते समजावून सांगू शकता की आम्ही तुमचे दिल-ओ-दिमाग समजावून सांगू शकता आणि पुन्हा त्याला अनुशासित करू शकता. या संपूर्ण किताबामध्ये ते याप्रमाणेच व्यायाम, मेडिटेशन तंत्रज्ञान आणि वर्कशीट्स पाठ सोबत सामायिक करतात ज्याप्रमाणे आम्ही तुमच्या आत बदल करून तुमचे विचार आणि व्यवहार तुमच्या नियंत्रणात ठेवू शकतो.
-
Abhagi Kanya (अभागी कन्या)
अभागी कन्या एकूणच सुभाष खिलारे यांचा 'अभागी कन्या' हा कथासंग्रह मराठी कथात्मक साहित्यात महत्त्वाचा ठरणार आहे. याचे वेगळेपण म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये बदललेले समाजदर्शन यातून घडते. समकालीन मानवी जीवनात निर्माण झालेल्या नव्या प्रश्नांची मांडणी यात येते. बेरोजगारी, भ्रष्टाचार, कर्जबाजारीपण, एड्स, अंधश्रद्धा इ. कळीच्या सामाजिक समस्यांचा शोध येथे खिलारे यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सुभाष खिलारे यांचा 'अभागी कन्या' हा कथासंग्रह नव्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरेल. त्यातील विचारप्रबोधनाच्या चळवळीला साह्यभूत ठरणार असून जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणा मानून लेखन करणाऱ्या नव्या पिढीला दिशादर्शक ठरेल.
-
Alvar (अलवार)
नसतेच कुणी । जन्मभर जागे । बुद्धीचे ही धागे । निजतात ।। अगदी सोप्या शब्दात जगण्याचं वास्तव मांडणाऱ्या ऋग्वेद देशपांडे यांच्या या चार ओळी वाचकाला आपल्या वाटून जातात. आपल्या 'अलवार' या काव्यसंग्रहात कवी म्हणून व्यक्त होताना उगाचच कुठल्याही कपोल कल्पनांत न रमता आपल्या रोजच्या जीवनात आलेल्या अनुभवांना, अनुभूतींना आणि जागृत होणाऱ्या जाणिवांना शब्दबद्ध करण्याचा ऋग्वेद देशपांडे यांचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. त्यासोबतच काव्य लेखनाच्या कुठल्या एका विशिष्ट चौकटीत अडकून न राहता गजल, अष्टाक्षरी, ओवी, मुक्तछंद, मुक्तशैली अशा विविध अंगाने त्यांनी आपली कविता मांडली आहे. ऋग्वेद देशपांडे यांची हळूहळू फुलत, उमलत जाणारी काव्यप्रतिभा उत्तरोत्तर बहरत जावो. त्यांच्या या 'अलवार' जाणिवेला आणि काव्यसंग्रहाला मनःपूर्वक शुभेच्छा.. - गुरु ठाकूर
-
Katha Shivray (कथा शिवराय)
स्वराज्य निर्मिती अन् स्वधर्म रक्षण, कल्याणकारी योजना, शेती व व्यापार वृध्दी, सक्षम आरमार निर्मिती.. थोडक्यात शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे शिवगाथा! कुशाग्र बुध्दी, चतुर युक्ती, कठोर शिस्त, अविश्रांत परिश्रम, सूत्रबद्ध नियोजन आणि शुद्ध चारित्र्य म्हणजे शिवगाथा ! इंग्रजीचा अट्टाहास नव्हे तर स्वभाषेचा अभिमान, पुतळे उभारणे नव्हे तर गडकिल्ल्यांचे संवर्धन म्हणजे शिवगाथा! चंगळवाद अन् बेशिस्त नव्हे तर कठोर शिस्त आणि पोकळ घोषणा नव्हे तर ध्येयाची उत्तुंग झेप म्हणजे शिवगाथा ! ही यशोगाथा साध्या सरळ आणि रंजक शैलीत कथन करण्याचा हेतू हा की ती छोट्या मोठ्यांना.. सर्वसामान्यांना समजावी, उमजावी! ही यशोगाथा सर्वांना कळावी, आकळावी, समजावी, उमजावी, तनमनात झिरपावी.. श्वासात भिनावी आणि कृतीत उतरावी ही प्रार्थना !
-
Doicha Padar Aala Khandyavari (डोईचा पदर आला खांद्
ही कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धूसर क्षणी अपघातानं ती एक चूक करते. पण त्यापायी तिचं सारं आयुष्यच बदलून जातं. आपल्या सार्या आकांक्षांना तिलांजली देत, ‘पापणीआडचा पाणपडदा' लपवत ती जगत राहते ! अंतरीचा पीळ, वेदना, संघर्ष सोसत जळत राहते ! यातून सुटण्याचा मार्ग तिला गवसतो का ? परतीची वाट सापडते का ? ‘पाऊल वाकडं पडलं’, तर ‘तिचं’ ! ‘निसरड्या वाटेवर घसरली’, तर ‘ती’च चुकलेली ! ही ‘ती’च्या भोवतीची काटेरी चौकट मोडेल का ? स्त्रीला वेढणार्यार कौटुंबिक, सामाजिक, मानसिक कुंपणांचा वेध घेणारी कादंबरी.
-
Nirgathi Ani Chandrike Ga Sarike Ga (निरगाठी आणि च
गौरी देशपांडे ह्यांच्या ह्या दोन दीर्घकथांपैकी ‘निरगाठी’ ह्या कथेत एका कुटुंबातल्या आईनं लिहिलेली पत्रं, डायरी आणि स्वगतं ह्यांतून कथा उलगडते. मुलांच्यामुळं आईवडिलांना जीवनात विविध अनुभव येतात, त्यामुळं त्यांचं जीवन सार्थकी लागतं, हे लेखिकेला अधोरेखित करायचं आहे आणि त्यात ती यशस्वीही झाली आहे. दुसरी कथा ‘चंद्रिके गं सारिके गं’ ही मनाला चटका लावणारी आहे.
-
Sandhiprakash (संधिप्रकाश)
अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात. अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो. सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार्याा प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी.
-
Aispais Gappa Neelamtainshi (ऐसपैस गप्पा नीलमताईंश
राजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार्यार कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार्याा नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार्याा कुशल व्यवस्थापक. तिसर्यार जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार्या् अभ्यासक. उत्तम वक्त्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.