-
Garudjanmachi Katha (गरुडजन्माची कथा)
ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का? भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? देव इतरांची फसवणूक करतात का? आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात.
-
Be Careful What You Wish For Part-4 (बी केअरफुल व्
‘बी केअरफुल व्हॉट यु विश फॉर’ हा ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’चा पुढचा भाग आहे. या कादंबरीची सुरुवात होते, ती एमाला सॅबेस्टियनचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजते, अशा थरारक आणि भावपूर्ण प्रसंगाने. या कादंबरीचा प्रवास नंतरही रोमांचकतेने आणि भावात्मकतेने सुरू राहतो. सॅबेस्टियन या अपघातातून वाचला आहे आणि आपला मुलगा ब्रुनो अपघातात मरण पावला आहे., हे समजल्यावर डॉन मार्टिनेझ संतापाने वेडापिसा होतो आणि मग बॅरिंग्टन कुटुंबाच्या तो हात धुऊन मागे लागतो. बॅरिंग्टन कंपनीच्या बकिंगहॅम जहाजाच्या बांधणीचं काम चालू असताना तिथल्या डायरेक्टरला हटवण्याचा प्रयत्न करणे, शेअर बाजारात बॅरिंग्टन यांची कंपनी भुईसपाट होण्यासाठी प्लॅन करणे, जेसिकाचा खून करणे आणि बकिंगहॅम जहाजावर बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखणे इ. थरारक घटनांतून बॅरिंग्टन कुटुंब आणि डॉन मार्टिनेझ यांच्यातील तीव्र संघर्ष रंगविणारी ही रहस्यमय, उत्कंठावर्धक कादंबरी वाचलीच पाहिजे.
-
Parvana Jagnyacha (परवाना जगण्याचा)
"‘लायसेन्स टु लिव्ह’ ही एक स्फूर्ती देणारी थरारकथा आहे. ज्याला स्वतःची प्रगती करायची आहे, अशा व्यक्तीचा स्वतःमधील मोठेपणाचा शोधप्रवास आहे हा. ज्या दिशेने तुमची प्रगती होण्याचे नियतीने ठरवले आहे ते शोधून आपल्या मनाप्रमाणे हवे ते प्राप्त कसे करता येते, याचे सुंदर वर्णन करणारी ही कथा आहे. एक यशस्वी उद्योजक जगताची शिक्षक योगायोगाने यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका जगप्रसिद्ध प्रशिक्षकाने आयोजलेल्या कार्यशाळेत दाखल होते. तेव्हा होणाऱ्या, तिचे आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकणाऱ्या प्रवासाचे वर्णन या पुस्तकात आहे. सात दिवसांच्या या कार्यशाळेत तिचा प्रवास तीन देशांत होतो. त्या वेळी तिला आत्मशोध घ्यावा लागतो, आत्मपरीक्षण करावे लागते, स्वतःच स्वतःचा गुरू आणि मार्गदर्शक व्हावे लागते. इतरांना तसे वागायला ती उत्तम रीतीने शिकवत असे; पण स्वतःच्या बाबतीत तिने हा मंत्र वापरून पाहिला नव्हता. वाचक तिच्या या प्रवासात सामील होतो आणि अनेक धडे शिकतो. त्याच्या आयुष्यात बदल होण्यास, सतत आत्मपरीक्षण करण्यास तो त्यामुळे उद्युक्त होतो. आपल्या विद्यार्थ्याला जे ज्ञान सर्वांत जास्त आवश्यक आहे, ते त्याला शिकू देईल, शिकवेल तोच खरा शिक्षक. या दृष्टिकोनातून कुर्ट अतिशय उत्तम प्रशिक्षक होता. ‘जगण्याचा परवाना’ हे पुस्तक प्रत्यक्ष वास्तव जगात कसे वावरावे याची माहिती सांगते व त्याच्याआधी जगाच्या वास्तवाची ओळख करून देते. या वास्तव जगात चांगले आणि आणि वाईट यांची बेमालूम सरमिसळ झालेली दिसेल. तसेच समजूतदार, शहाण्या लोकांबरोबरच भ्रमिष्टपणाचे कातडे पांघरलेल्या लोकांचा भरणा सापडेल. तुम्हाला क्षणात योग्य मार्ग सापडेल, तर काही वेळाने तुम्ही भरकटत आहात असे वाटेल. या सर्वांमधून नियतीने तुमच्यासाठी आखलेला मार्ग शोधून काढून तुमची आयुष्याबद्दलची स्वप्ने योग्य प्रकारे प्रत्यक्षात उतरवायची कशी, हे या पुस्तकात सांगितले आहे. तुम्हाला न समजणाऱ्या लोकांबरोबर कसे निभावून न्यायचे, आपल्या नियंत्रणात नसलेल्या पेचप्रसंगांतून कसा मार्ग काढायचा आणि हे करता करता आपण त्यातून कसे प्रगल्भ व्हायचे, हे या पुस्तकावरून समजेल. तुमच्या रोजच्या जीवनातील निवड करताना, निर्णय करताना तुमची अध्यात्मिक वृत्ती त्यात कशी प्रकट होईल, याबद्दल हे पुस्तक आहे. काही वेळा आपल्याला आपले इतरांशी असलेले बंध दिसत नाहीत. आपल्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होईल याचा आपण बऱ्याच वेळा विचारच केलेला नसतो; पण आपला इतरांशी काहीच संबंध नाही असे समजणे आणि आपल्याच विश्वात मग्न असणे, हे चुकीचे आहे. इतरांच्या दृष्टीने आपण कःपदार्थ आहोत असे समजणे चूक आहे. आपले अस्तित्व, आपल्या कृती इतरांच्या दृष्टीने निश्चित महत्त्वाच्या आहेत "
-
Blue Bird (ब्लू बर्ड)
"बोस्निया-हरझेगोविना या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाल्यावर लेखिका आणि तिची बहीण निर्वासित म्हणून इंग्लंडला आल्या. इंग्लंडला आल्यावर तिथली संस्कृती, राहणीमान हे आपल्यापेक्षा भिन्न आहे हे त्यांना समजले. या भिन्नतेमुळे लेखिका आणि तिची बहीण यांना अनेक मजेदार प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. त्याच स्मृतिचित्रांचे वर्णन लेखिकेने केले आहे. इंग्लंडसारख्या देशात बोलली जाणारी भाषा हेच सर्वांत मोठे आव्हान लेखिकेपुढे होते. वेळोवेळी सॉरी, प्लीज, थँक्यू सारखे शब्द वापरणे, हा त्यांच्यासाठी विनोदच होता. परंतु केवळ एकच वर्षात लेखिका ही भाषा सराईतपणे बोलू लागली. पुढे ती अनुवादाचे कामही करू लागली. अपरिचित, अनोळखी अशा ठिकाणी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी नाइलाजाने स्थलांतरित झालेली लेखिका इंग्लंडच्या संस्कृतीशी- वातावरणाशी एकरूप झाली. शिक्षणाद्वारा तिने आपली प्रगती साधली. बोस्नियाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नवे अनुभव घेत तिने इंग्लंडमधील संस्कृती आपलीशी केली. या तिच्या जीवनप्रवासाचे वर्णन तिने तिच्या शब्दांत मांडले आहे. "
-
Work Less Do More (वर्क लेस डू मोअर)
या पुस्तकात कमीत कमी कष्टात अधिक श्रम कसे करता येतील याविषयी चर्चा केली आहे. परंतु कष्ट कमी करायचे असतील तर त्यासाठी प्रथम आपण कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च करतो याचा विचार करावा लागेल. त्याकरीता आपला दिनक्रम कसा आहे, याचा आधी विचार करावा लागेल. आपल्या दिनक्रमात असणाऱ्या चुका शोधण्यात मदत करण्यासाठी पुस्तकात तालिकांचा समावेश केला आहे. त्या तालिकांच्या आधारे कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च होतो व तो वेळ योग्य ठिकाणी कसा वापरता येईल, वेळेचे सुव्यवस्थापन कशा पद्धतीचे असावे याची चर्चा पुस्तकात केली आहे. त्याचप्रमाणे कामाचे नियोजन व उद्दिष्ट निश्चिती वरही लेखकाने भर दिला आहे. उद्दिष्ट कशी निश्चित करावीत, दीर्घकालीन उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट, कामाच्या संदर्भातील उद्दिष्ट, वैयक्तिक संदर्भातील उद्दिष्ट असे उद्दिष्टांचे वर्गीकरण करून त्यानुसार नियोजन कसे करावे हे सांगितले आहे. कामाबरोबर वैयक्तिक आवडीनिवडी, आरोग्य, कुटुंब यांना योग्य पुरेसा वेळ कसा देता येईल? यांचाही विचार केला आहे. कामाबरोबरच येणारा ताण उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या मदतीने कसा टाळता येईल याचेही विवेचन पुस्तकात आले आहे. नकारात्मकता, चिडचिडेपणा, कामात दिरंगाई या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जरी उद्दिष्ट ठरवली तरी त्यांना अति महत्त्व न देता योग्य विश्रांती (ब्रेक) घेऊन त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे. एकूणच योग्य वेळ व्यवस्थापन, कामाचे योग्य नियोजन यांच्या मदतीने कमी कष्टात अधिक श्रम हे ध्येय साध्य करणे निश्चितच सोपे आहे.
-
Karmachari
You who stand in a queue, who try to board a running local, who tolerate your boss's snide remarks and the trials and tribulations of marital life - you still manage to discuss politics with enthusiasm, to finish a game of cards, to laugh and to make others laugh ... You are a true karmachari. A collection of unforgettable short stories about ordinary people, Karmachari is a mirror held up to society. Set in suburban Mumbai of the 1970s, yet universal, it is peopled by characters we might meet in real life. They come alive under V.P. Kale's sharp but compassionate gaze, and prod us gently towards a world of greater kindness and understanding.