-
Kon Hote Sindhu Lok (कोण होते सिंधू लोक)
पद्मश्री डॉ. म. के. ढवळीकर. पुरातत्त्वातील अनेक कूटस्थळांचा वेध घेणारे जागतिक कीर्तीचे पुरातत्त्वज्ञ. सहजसोपी लेखनशैली अन् नेटकी मांडणी यामुळे पुरातत्त्वासारखा व्यापक विषय त्यांनी रंजक आणि रुचिपूर्ण बनवला. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे विविध विषय त्यांनी अनेक पुस्तकांमधून वाचकांसाठी सुबोध बनवले. इसवीसनपूर्व तिसरे सहस्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृतिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात मागोवा घेत आहेत एका आजवर न उलगडलेल्या प्रश्नाचा – कोण होते सिंधू लोक ?
-
BhagatSinghcha Khatla (भगतसिंगचा खटला)
भगतसिंगच्या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा नि:संशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण ‘लाहोर कटा’च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला, १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी – हाच या वटहुकमाचा हेतू होता.
-
Swarthatoon Sarwarthakade (स्वार्थातून सर्वार्थाकड
हवेतले इमले बांधून पृथ्वीतलावर कुणीही सुखाने जगू शकत नाही. जगायचे जर जमिनीवर आणि तेही समाजाचा एक घटक म्हणून, तर समूहाचे अर्थशास्त्र आणि मानस समजून घेणे भाग आहे. सुखी समाज निर्माण करण्यासाठी आदर्श हवेतच. पण आदर्शांच्या पतंगाची दोरी किती लांब ठेवायची; आणि ती हातातून सुटली, तर पतंग कुठेही भरकटू शकतो, याचे भान येण्यासाठी अर्थशास्त्राचे भान हवे आणि मानसशास्त्राचेसुद्धा ! अर्थशास्त्रामागील मानसशास्त्राचा रंजक मागोवा घेणारे चार्ल्स व्हीलन यांचे ‘नेकेड इकॉनॉमिक्स’ हे जगप्रसिद्ध पुस्तक आता मराठीत.
-
Nahi Mi Ekala (नाही मी एकला)
आमच्या वाडवडलांच्या हाती पाटी-पुस्तक आले नाही, परंतु त्यांच्याकडे जन्मजात शहाणीव होती. गरिबी होती, लाचारी नव्हती. दैन्य होते, दारिद्र्य नव्हते. संघर्ष होते, वैर नव्हते. अंधश्रद्धा होती, अमानुषता नव्हती. जीवनाने कधी क्रूर थट्टा केली, तरी त्यांनी प्राणपणाने श्रद्धेच्या वातीचे रक्षण केले आणि श्रद्धेने त्यांना तारले. श्रद्धेसाठी ते ‘भावरत’ असा शब्दप्रयोग करीत. पिढ्यान् पिढ्यांचा ‘भावरता’चा वारसा जपणारे स्फटिकासारखे स्वच्छ, पाण्यासारखे प्रवाही, निसर्गासारखे निर्मळ आत्मकथन.
-
Share Bazar Jugar Che Buddhibalacha Dav (शेअर बाजा
शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
-
Chandralok (चंद्रलोक)
लक्षावधी वर्षांपूर्वी चंद्रजन्म कसा झाला? समुद्राला चंद्रामुळे भरती-ओहोटी का येते? चंद्राच्या लहरीप्रमाणे मानवी मनावर तरंग उमटतात का? सूर्यचंद्रांना लागणारी ग्रहणे, त्यांचा घास गिळायला टपून बसलेले राहू-केतू... यासारख्या गोष्टींचे खरे वैज्ञानिक स्पष्टीकरण काय? या व अशाच इतरही असंख्य प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे देतानाच गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये रंगत गेलेल्या अवकाशस्पर्धेचा आढावा घेणारा हा देखणा ग्रंथ. रशिया-अमेरिकेतल्या स्पर्धेचे विविध टप्पे, अपोलो-11 मोहिमेसारख्या आजवर योजल्या गेलेल्या सर्व चांद्रमोहिमा आणि त्यांचे यशापयश...या आणि अशाच इतरही असंख्य घटनांचा सुबोध परामर्श घेणारा हा बहुरंगी ग्रंथ.
-
Pu.L.Chandane Smaranache (पु.ल.चांदणे स्मरणाचे)
तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला... अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला... मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा... हा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! पुलंचं असणं... पुलंचं नसणं... ह्याचं ज्यांना अगत्य आहे, त्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पुलंना शोभेशा शैलीत घेतलेला वेध पुलंच्या जीवनाचा, त्यांच्या काळाचा, काळावर त्यांनी उमटवलेल्या अमिट नाममुद्रेचा ! पु.ल. चांदणे स्मरणाचे
-
Abhyas Kasa Karava (अभ्यास कसा करावा)
दहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरुकिल्ली. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा विशेष विभाग, विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. स्वत:चा स्वत: अभ्यास - तोही कमी वेळात जास्तीत जास्त आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र |