-
Veerappan Viruddha Vijay Kumar (वीरप्पन विरुद्ध वि
चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! विरप्पन विरुद्ध विजय कुमार
-
Palbharahi Nahi Hay Hay (पळभरही नाही हाय हाय)
दुसऱ्या महायुद्धात वीस लाख हिंदुस्तानी सैनिक लढले. जेथे जेथे ब्रिटिश युद्धात उतरले, तेथे तेथे हिंदुस्तानी सैन्य जाऊन पोचले. फ्रान्स आणि ग्रीसपासून ते मलायापर्यंत त्यांनी जर्मन, इटालियन आणि जपानी फौजांविरुद्ध निकराचा लढा दिला. असे असूनही भारताच्या इतिहासात या सैनिकांना स्थान नाही. आपण भारतीय त्यांना स्वत:च्या भूतकाळाचा भाग मानत नाही. भारतीय भाषांमधील साहित्य त्यांची दखल घेत नाही. भारतीय चित्रपटसृष्टी कधीही त्यांच्या जीवन-मरणाचे चित्रण पडद्यावर आणत नाही. दोस्त राष्ट्रांनी जसे त्यांना अनुल्लेखाने मारले, तसेच आपणसुद्धा त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड ढकलून मोकळे झालो. हिंदुस्तानी सैनिकांनी इम्फाळ-कोहिमामध्ये बलदंड जपान्यांना धूळ चारली म्हणून हिंदुस्तान जपानी साम्राज्याच्या पकडीत सापडला नाही. अन्यथा केवळ हिंदुस्तानचाच नाही, तर संपूर्ण जगाचा चेहरा-मोहरा बदलला असता. जपानी हिंदुस्तानात घुसले असते, तर तिकडे जर्मनी, इटली यांचेही बळ वाढले असते आणि नाझी भस्मासुराने हिंदुस्तानातही पाय रोवले असते. तसे होऊ नये म्हणून ज्यांनी जिवाचे रान केले, प्राण गमावले, अशा अज्ञात वीरांची ही कथा.
-
Punha Yankijchya Deshat (पुन्हा यांकीजच्या देशात)
‘ड्रीमलँड’, ‘वंडरलँड’ अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका. तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी. सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला. खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात...
-
Swapnamadhil Gawa (स्वप्नामधील गावां)
‘केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही : आपण तसं जगायलाही हवं’ असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी हे जोडपं ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ जगण्यासाठी २५ वर्षांपूर्वी पुण्यातून बाहेर पडून कोकणातल्या एका खेड्यात जाऊन स्थायिक झालं. त्यांच्या २५ वर्षांच्या अशा जगण्याचं हे आत्मकथन. त्यांचं हे जगणं जितकं सजगतेनं आहे, तितकंच उत्कटतेनंही. जितकं विचारपूर्वक आहे, तितकंच भावपूर्णही. परिपूर्णतेचा ध्यास आहे; पण, मर्यादांचं भानही. त्यामुळेच, हे दांपत्य ‘असामान्य’ न वाटता, चारचौघांसारखं वाटतं. त्यांची ध्येयं ही आपल्यालाही आपल्या आवाक्यातली वाटतात. त्यांच्यासारखाच प्रयत्न आपणही करावा, अशी प्रेरणा देणारं हे पुस्तक.
-
Manobhave Deshdarshan Mizoram (मनोभावे देशदर्शन मि
मिझोरम. ईशान्य भारतातले एक महत्त्वाचे राज्य. एके काळी बंडखोरीने ग्रासलेले, पण आता शांततेच्या मार्गाने विकास साधू पाहणारे... त्या सीमावर्ती राज्यातील असंख्य पर्यटनस्थळांची त्यांच्या वैशिष्ट्यांसह तपशीलवार माहिती देणारे हे संकलन हौशी पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
-
Ke Har Khwahish Pe (के हर ख्वाहिश पे)
‘...कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अदभुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो...मानवी इतिहासातला नवा साक्षात्कार आम्हाला झाला होता आणि त्याच्या प्रकाशात आम्ही न्हाऊन निघालो होतो...नव्या युगाची सुरुवात आता नक्की होणार, अशी आम्हाला मनातून खात्री वाटू लागली होती. ...ऐन तारुण्यातली बंडखोरीची ऊर्मी, त्याला पुरोगामी जीवनपद्धतीची बैठक... आणि जोडीला समविचारी तरुण मित्रांचा गट...अशी सर्व पार्श्र्वभूमी असल्यामुळे आम्ही त्या काळात स्वतःला इतरांपेक्षा खूप वेगळे समजत होतो.'
-
Jagan Kalat Tevha (जगणं कळतं तेव्हा)
‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण... माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे!’’ अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा... जगणं कळतं तेव्हा
-
Bakhar Sansthananchi (बखर संस्थानांची)
स्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन करणारे. या संस्थानिकांच्या एकमेकांमधील स्पर्धा, त्यांचे विक्षिप्त छंद, विलासी आयुष्य, विचित्र सवयी या साऱ्यांच्या कहाण्या, आख्यायिका अन् दंतकथा बनल्या. एका टोकाला फंदफितुरी, कटकारस्थाने; तर दुसऱ्या टोकाला कला-क्रीडा-साहित्य यांना उदार आश्रय. एकीकडे प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, दुसरीकडे प्रजेची पिळवणूक करणारे लहरी कुशासक. अशा अनेकविध रंगांनी रंगलेली, महत्त्वपूर्ण संस्थानांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा वेध घेणारी, तरीही कथा-कादंबरीसारखी रंजक असणारी बखर संस्थानांची
-
Bharatachi Dharmairpekshata:Dhokyachya Valnavar (भ
भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहणे अत्यावश्यक आहे. तथापि गेल्या सत्तर वर्षांतील आपली वाटचाल मात्र अत्यंत निराशाजनक आहे. आता तर देश हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वळण अत्यंत धोक्याचे ठरेल, असा गंभीर इशारा देणारे हे पुस्तक आहे. घटनापरिषदेत झालेल्या मान्यवर नेत्यांच्या चर्चेपासून असंख्य घटनातज्ज्ञांच्या, राजकीय नेत्यांच्या लेखनापर्यंत विविध संदर्भ देत एका अनुभवसंपन्न, तत्त्वनिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. निव्वळ टीकाटिप्पणी करण्यात समाधान न मानता राष्ट्रीय परिस्थिती सावरण्यासाठी व सुधारण्यासाठी काय काय करता येईल, याबद्दलच्या काही उपयुक्त सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या विचारप्रवर्तक पुस्तकाचे मोल खचितच वाढले आहे. सर्व विचारसरणींच्या विवेकी अनुयायांनी अवश्य वाचावे, विचारात घ्यावे, अशा लक्षणीय पुस्तकाचा तितकाच समर्थ अनुवाद.
-
Teenej Dot Com 1 (टीनएज डॉट कॉम १)
‘मी अशी का वागते हल्ली?' ‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत?' ‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल?' ‘माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये?' प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! ‘टीन एज'मध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा! टीनएज डॉट कॉम # १ @दहा ते चौदा वर्ष.
-
Mi Mohammad Khan Shapathevar Sangato Ki (मी महंमद
महंमद आमिर खान-जुन्या दिल्लीतील एका गरीब कुटुंबातील सालस मुलगा. दहावीच्या परीक्षेनंतर कराचीत राहणाऱ्या आपल्या मोठ्या बहिणीला भेटायला पहिल्यांदाच एकट्याने निघतो. परंतु दिल्ली सोडण्याआधीच गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट आणण्याची कामगिरी सोपवतात. अजाणतेपणी तो या कामास होकार देतो. पण कराचीत पोचल्यावर पोलिसांच्या भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन रिकाम्या हाताने दिल्लीला परततो. आणि सुरु होतात त्याच्या दुर्दैवाचे दशावतार: पोलिसांकडून अपहरण, गुप्तहेर यंत्रणेकडून अनन्वित छळ, खोट्या साक्षीपुराव्यांसह दहशवादी म्हणून तिहारमध्ये रवानगी, तुरुंगात बेदम मारहाण आणि चौदा वर्षांची एकांत कोठडी. परंतु महंमद आमिरची कहाणी म्हणजे फक्त एवढेच नाही. काळ्याकुट्ट अंधारातसुद्धा शिक्षणाचा, सच्छीलतेचा आणि आशेचा दिवा तेवत ठेवणाऱ्या जिद्दीचीसुद्धा ही कहाणी आहे. ‘मी महंमद खान शपथेवर सांगतो की...’ हे निरपराध महंमद आमिरचे उद्वेगजन्य परंतु चांगुलपणावरचा विश्वास अबाधित ठेवणारे आत्मकथन होय.
-
Savadh Aaika (सावध ऐका)
कितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत. पाकिस्तान आणि चीन... हे आपले दोन सख्खे शेजारी देश. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे, आपल्याशी लढून हरवायची खुमखुमी बाळगणारे आणि भल्याबुऱ्या मार्गांनी सतत आपल्या कुरापती काढणारेदेखील! जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वेगाने झेपावणारा चीन आणि भारतद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारा पाकिस्तान हे दोन देश संगनमताने आपल्याला आव्हान देऊ पाहात आहेत. त्या दोघांच्या व्यूहरचनेचा दीर्घकालीन आढावा घेणारे हे पुस्तक प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला सावधानतेचा अगदी समयोचित इशाराही देत आहे...