-
Salle Lakhmolache (सल्ले लाखमोलाचे )
आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात आणि त्यांच्याकडून कळत-नकळत मोलाचे सल्ले मिळत असतात.बरेचदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं,पण काही जण हे सल्ले किव्हा उपदेश आवर्जून लक्षात ठेवून आचरणात आणतात ,म्हणूनच ते यशस्वी आणि नामवंत होतात! हे जाणूनच विज्ञान -तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थ , मनोरंजन , जाहिरात ,चित्रपट, वैद्यक ,साहित्य आणि उद्योगव्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या ५५ नामवंताना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचे आणि उपदेशांच हे संकलन…. …नातेसंबंध सुधारण्यासाठी , व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी आणि कार्यक्षेत्र निवडण्यासाठी हे सल्ले तुमच्यासाठी लाखमोलाचे ठरतील . यातलं एखाढ पान तुम्हाला तुमचा समस्येकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोण देउन मनोबलही वाढवेल …आणी पहा तुमचंही जीवन बदलून जाईल!
-
Good Muslim Bad Muslim (गुड मुस्लीम बॅड मुस्लीम)
'चांगला' मुसलमान कोण? 'वाईट' मुसलमान कोण? - हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात 'गुड मुस्लीम', 'बॅड मुस्लीम' या संकल्पनांचा व 'राजकीय ओळखीं'चा उद्भदवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने 'शीत युध्दा'नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या 'गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम' या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद. महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे 'गुड मुस्लीम' आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो 'बॅड मुस्लीम'. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते '९/११'च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्त्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची 'धार्मिक ओळख' आणि 'राजकीय ओळख' यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे. जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक... 'गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!'
-
Tya Daha Varshantil Guru Dutta (त्या दहा वर्षांतील
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी) गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ''इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,'' असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले... ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते. गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश. अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या 'प्यासा', 'कागज के फूल' व 'साहिब बीबी और गुलाम'सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध
-
Sahakardhurin (सहकारधुरीण)
भारतातील साखर उद्योगात सहकाराची ध्वजा रोवण्याचं पायाभूत कार्य कार्य करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र. विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिद्ध केलेला 'सहकारधुरीण' हा समग्र चरित्रग्रंथ.
-
'IT'Gatha('आयटी'गाथा)
'बूमिंग' आयटी उदोयोगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक...
-
Mba @ Vay Varsh 16 (एमबीए @ वय वर्ष १६)
आजच्या या जनरेशनपुढे नोकरी- व्यवसायचे अनेक पर्याय खुले आहेत.पण पौगंडावस्थेतल्या या मुलांना व्यवसायजगत म्हणजे नक्की काय हे माहित असतं का? आपलं करिअर ठरवताना युवकांना व्यावसायिक जगाबद्दल उत्सुकता वाटावी, त्यांचं कुतूहल जाग व्हावं या दृष्टीने सुब्रोतो बागची यांनी या पुस्तकाद्वारे हा आगळा प्रयोग केला आहे. बोजड पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा मुलांना आवडेल, रुचेल अशा भाषेत उद्योग विश्वाची, प्रसिद्ध उद्योजकांची व व्यवसायातील विवध संज्ञा- संकल्पनांची ओळख हसत्याखेळत्या वातावरणात करून देणारं पुस्तक
-
Mukkam Post America (मुक्काम पोस्ट अमेरिका )
कशी आहे बुवा ही अमेरिका?.... कोणत्याही देशात थोडया दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घ वास्तव्यासाठी... त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला, तेथील शिस्त, रीतिरिवाज, पध्दती, तेथील बोली भाषा समजून घेतल्यास [...]
-
Opertion Blue Star Jass Ghadl Tass (ऑपरेशन ब्लू स्
सर्वच भारतीयांच्या मनात खदखदत असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत हे पुस्तक अनेक अफवा, गैरसमज आणि असत्य गोष्टीचं निराकरण करतं. या कारवाईच्या प्रत्त्येक टप्प्यावर नियोजनात आणि प्रत्यक्ष कारवाईत ब्रार सहभागी होते. त्यांच्याच शब्दातील ही कहाणी… पूर्णपणे सत्य, अगदी जशी घडली तशी … 'ऑपरेशन ब्लू स्टार' !
-
Sam Maneksha (सॅम माणेकशा)
१९७१ च्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला १८ दिवसांत शरण आणणार्या सेनानीचं रोमहर्षक चरित्र
-
Anandmai Garodarpan (आनंदमयी गरोदरपण)
गरोदरपणात घ्यावयाची शरीराची काळजी आणि गर्भ धारणे पासून ते बाळ जन्माला येईपर्यंत सकरात्मक विचार व उल्हसित वृत्ती कशी ठेवावी याचे साधे सोपे पण परिणामकारक उपाय लेखिका सांगते बाळ गर्भाशयात असताना त्यांचं आईशी भावनिक नातं तयार होतं. या पुस्तकामुळे ते नातं दृढ व्हायला नक्कीच मदत होईल.