-
Guide (गाइड)
आर क़े .नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक . त्यांच्या ' द गाइड ' या इंग्रजी कादंबरीला १९६० मध्ये ' साहित्य अकादमी ' पुरस्कार प्राप्त झाला आणि एका श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली . १९६५ मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ' गाइड' हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कांदबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी ,तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या . आज पाच दशंक उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले . एका सामान्य भोगवादी राजू गाइडच अध्यात्मिक 'स्वामी 'मध्ये रुपांतर होऊ शकत ? एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेण , राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चोकटीत बसत? मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता ? तो योग्य होता का ? यांसारखा अनेक प्रश्नांचा उलगडा हि कांदबरी वाचल्याशिवाय होण अशक्यच . सर्जनशीलतेचा ध्यास,ज्ञान-संशोधनाच ध्यास , भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणाऱ्या मूळ इग्रजी कांदबरीचा उल्का राउत यांनी सिद्ध केलेला हा अनुवाद कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी , अत्यंत रोचक व तत्वाण्यानात्मक डूब असलेली हि कांदबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते-गाइड
-
Happy Lagna.com Bhag-2 (हॅपी लग्न .कॉम भाग-1)
लग्नाला पांच-सहा वर्ष झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार निरास आणि कंटाळवाणा होऊन जातो तेव्हा आपल्या या सर्वांत जवळचा नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे. विजय नागास्वामी यांनी लग्नाच्या नात्यात ऊदभवणाऱ्या अनेक नाजूक आणि जटील समस्याची ओळख करून दिली आहे. वरवर क्षुलल्क वाटणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन क्लिष्ट समस्येच रूप कसं धारण करू शकतात हे त्यांनी अनेक उदाहरणामधून स्पष्ट केल आहे. नवरा व बायको यांचे भिन्न स्वभाव, वेगळ्या आवडी-निवडी, दोन टोकाची ध्येय,लुडबुड करणारे त्यांचे नातेवाईक इथपासून ते लैंगिक समस्या आणि विवाहबाह्य संबंध असा एक मोठा पट या पुस्तकात त्यांनी मांडला आहे . केवळ समाजाला घाबरून किंवा सोयींच आहे म्हणून लग्न टिकवण्यात अर्थ नाही . तुम्हाला ज्याच्या जोडीने आयुष्याचा आनंद उपभोगायचा आहे , कौटुंबिक सुख वृद्धिंगत करायचं आहे , अशा नात्याला कायम बहरत ठेवण्यासाठी वाचा....
-
Happy Lagna.com Bhag-1 (हॅपी लग्न .कॉम भाग-1)
लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा मानला जात असला, तरी निकोप सहजीवनाकडे वाटचाल होणं म्हणजेचं खऱ्या अर्थाने लग्न यशस्वी होणं, असा कानमंत्र क्वीचितच मिळतो. आणि मग बरेच जण 'पदरी पडल अन पवित्र झालं' म्हणत लग्न रेटत तरी राहतात किंवा मागचा-पुढचा विचार न करता 'काडीमोड' तरी करतात. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ विजय नागास्वामी यांनी या पुस्तकात लग्न यशस्वी होण्यासाठी लग्न आधी पासूनच त्याचा पाया भक्कम कसा करावा, सहजीवन कसं 'फुलवत' न्यावं, हे सहजसोप्या भाषेत समजावून सागितलं आहे. गेल्या काही वर्षात, स्त्री-पुरुष याचे संसारातले 'रोल्स' बदलल्याने नातेसंबंधांवर झालेला परीणामाचाही यात विचार केला आहे. पुस्तकात नागास्वामी यांनी पुढील विषय उदाहरणासह स्पष्ट केले आहेत. * जोडीदाराची निवड * भावनिक व लैंगिक नात्यांचा विकास * लग्नाचा बदलत स्वरूप * एकमेकाच्या कुटुंबाशी असलेले नातेसबंध * व्यक्तिगत स्पेस * कॅरिअर व कुटुंबाचा समतोल इत्यादि.... लग्न झालेला किंवा होऊ घातलेल्या अन सुखी सहजीवनाच्या शोधात असलेल्या प्रयेत्कासाठी उपयुक्त आणि हो, भेट देण्यासाठी उत्तम!
-
Te Aani Mi (ते आणि मी)
शकुंतला पुंडे यांच्या ललित लेखांचं हे पुस्तक. पुण्यासारख्या शहरातील अनुभव, कोकणातील निसर्ग याबद्दल त्यांनी खूप जिव्हाळ्याने लिहिले आहे. शहरातील घराच्या गॅलरीबाहेरचा हिरवा रंगमंच असो किंवा कोकणातील मुक्त घनदाट विस्तीर्ण निसर्ग या साऱ्याबद्दल पुंडे वाचकांशी संवाद साधत सोप्या शब्दांत आणि ओघवत्या भाषेत लिहितात. पुस्तकात चारच प्रकरणे आहेत; पण यातून खूप मोठा पसारा आपल्यासमोर उलगडला जातो. केवळ माहिती न देता त्या भाष्यही करतात. त्यामुळे पुस्तक आणखीनच वाचनीय झाले आहे.
-
Officemadhye Raha Fit !
मिटीग्ज...कामानिमित्त प्रवास...सतत बाहेरचं खाणं...डेडलाइन्स... आणि या सगळ्यामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव! …ऑफीस म्हटलं की,हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे,मधुमेह, उच्च रक्तदाब,स्थूलपणा,हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार! या सगळ्या समस्यांच्या मुळाशी गेल्यास,त्याचं मुख्य कारण असतं-बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार-अशी अनियमित जीवनशैली. या पुस्तकात सुप्रसिद्ध आहारतज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा,हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच 'फास्ट लाइफ स्टील'मुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर मत करण्यासाठी 'प्रक्टिकल' व सहज शक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत.
-
Udyog Tumcha Paisa Dusryacha (उद्योग तुमचा पैसा दु
आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडीत अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या घटनांचा उहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे. केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यवसायिक वृत्तीचं! हा मुलभुत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी लागणाऱ्या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रांडींग,प्लनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत. जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो,तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकासाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणारया तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील. 'उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो' असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्ष यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणाऱ्या हावरे यांचे अनुभवाचे बोल नव उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील.
-
Asahi Pakistan (असाही पाकिस्तान)
साहित्य,संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान... पाकिस्तानसारख्या शेजारी समजायला संवेदना हवी आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची उच्च पदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी.. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्य स्थळांबद्दल आस्था हवी. अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली. पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती-कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरतिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रुपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा -असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात 'असाही पाकिस्तान!'