-
Anuvishwatil Dhruv Dr Anil Kakodkar (अणुविश्वातील
अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव'सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज', `शिक्षण पंढरी' यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या 'व्हिजन २०२०'नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५' डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत. अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव'पद प्राप्त करणाNया या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!
-
Ladha Takalelya Striyancha (लढा टाकलेल्या स्त्रिया
नवर्याने सोडलेल्या बायकांचा प्रश्न आपल्या समाजात खूप जुना आहे. अगदी पुराणकाळापासून सीता, अहिल्या यांसारख्या परित्यक्तांची उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत. आजही आपल्या समाजात परित्यक्तांसाठी `टाकलेली', `सोडलेली', `बैठीली' असे अत्यंत अपमानकारक शब्द सहजपणे वापरले जातात. घटस्फोट न देता-घेता इच्छेविरुद्ध हाकललेली विवाहित स्त्री म्हणजे `परित्यक्ता'. `ज्याची-त्याची वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाब' असं म्हणून टाळला जाणारा हा प्रश्न वास्तविक एक गंभीर सामाजिक समस्या आहे. अलीकडील काळात हा प्रश्न ऐरणीवर आणला तो समता आंदोलनाने. या आंदोलनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्यांसाठी दिलेल्या लढ्यांचा विविधांगी आढावा या पुस्तकात घेतला आहे. त्याशिवाय परित्यक्तांच्या बोलक्या कहाण्या, परित्यक्ता होण्यामागची कारणं, स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक असे पोषक विचार आणि रचनात्मक व संघर्षात्मक कार्यामधून टिपलेल्या नोंदी या सर्वाचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळेल. पुस्तकाच्या लेखिका अॅड. निशा शिवूरकर या हाडाच्या कार्यकत्र्या असून त्यांनी या प्रश्नावर गेली अनेक वर्षं अनेक स्तरांवर झपाटल्यागत काम केलं आहे. या प्रश्नाची धग जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या लिखाणात व्यापक असा सहानुभाव आहे. माणूस म्हणून आपल्या जाणिवा रुंदावणारं हे पुस्तक शिवूरकरांनी ओघवत्या आणि थेट शैलीमध्ये लिहिलं आहे. सामाजिक भान देणारा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज... अर्थात लढा `टाकलेल्या' स्त्रियांचा
-
Tumchya Aamchya Leki (तुमच्या-आमच्या लेकी)
आरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो. त्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत? अशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो...आणि `डॉक्टर' लिली जोशी यांच्याकडे येणार्या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई' होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो. वैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन लागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात...! डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील ! आजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्या, धडपडणार्या, अडखळणार्या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्या या...तुमच्या-आमच्या लेकी !
-
Nabhitun Ugavlelya Vrukshacha Rahasya (नाभितून उगव
खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते... आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो... आचकट बोलणार्या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते... आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही... एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं... आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो... जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!
-
Yanni Kela Vinodvishwa Samrudha (यांनी केलं विनोदव
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि. वि. जोशी, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, गंगाधर गाडगीळ, दत्तू बांदेकर, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले या बारा विनोदवीरांची मैफल जमवून विनोदी लेखनाच्या वाचनाचा आस्वाद घेता घेता आपली जाण समृद्ध करणारं व त्यात भर टाकणारं पुस्तक...
-
Khar Sangayach Tar (खरं सांगायचं तर)
खरं सांगायचं तर...मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार...गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान...! अशा पाश्र्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY' हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत...आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर...’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे... आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन! - प्रदीप चंपानेरकर (प्रकाशक) ---------- ``पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल. आता एका अर्थाने, यश आणि अपयश याबाबतीत माझ्या भावना बधीर झाल्या आहेत.'' ``माझे सिनेमे तुम्हाला आवडले नाहीत तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसतं. तुम्हाला माझं काम आवडलंच पाहिजे किंवा मी तुम्हाला आवडलोच पाहिजे, असं माझं अजिबात म्हणणं नाही.'' ``रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने आणि एनर्जीने मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेडमिलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लिव्हर्स माझ्या हातात आहेत.'' ``मी जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मसात केल्या. मला सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. मला सर्वांपासून वेगळा राहणारा, लांब राहणारा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता बनायचं नव्हतं. मला `सोशलाईट' दिग्दर्शक बनायचं होतं.'' ``मला जे मैदानात खेळांमध्ये करता आलं नाही त्याची कसर मी स्टेज गाजवून पुरेपूर भरून काढली. मी स्पर्धांमधला सर्वोत्तम वक्ता बनलो.'' ``आज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याला निश्चित वळण देणा-या घटना कोणत्या असा विचार केला तर मी बोर्डींग स्कूलमधून परत येणं, माझ्या आईने त्यावरून मला खणखणीतपणे सुनावलेले चार शब्द आणि स्पर्धेत पटकावलेला तो पहिलावहिला पुरस्काराचा कप या तीन गोष्टी सांगाव्या लागतील.'' ``मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही.'' ``व्यभिचार हे आयुष्यातलं वास्तव आहे. ज्यामध्ये, व्यभिचाराला संधी होती पण ते अजिबात बळी पडले नाहीत, असं एक लग्न, एक वैवाहिक नातं मला दाखवावं.''
-
Telecom Kranticha Mahaswapna (टेलिकॉम क्रांतीचा मह
सत्यनारायण गंगाराम पित्रोदा... ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण ‘स्वप्नभूमी’ अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणार्या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय! ...