-
Chanakyacha Mantra (चाणक्याचा मंत्र)
`चाणक्याचा मंत्र`. चाणक्य कोण हे सर्व भारतीयांस चांगलेच ठाऊक आहे. इसवीसन पूर्व ३४०. परिस्थितीने होरपळलेला पण ध्येयाने झपाटलेला एक ब्राह्मण युवक आपल्या परमप्रिय पित्याच्या निर्घृण हत्येचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो. थंड डोक्याचा, कावेबाज, कठोर व प्रचलित नीतिमूल्यांना न जुमानणारा तो युवक, भारतातील सर्वश्रेष्ठ रणनीतिकार बनतो. अलेक्झांडरच्या आक्रमणाविरुद्ध विस्कळीत झालेल्या भारताला एकसंघ बनवण्यात यशस्वी होतो. चंद्रगुप्ताला विशाल मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर विराजमान करतो. आजच्या काळात म्हणजे अडीच सहस्राद्बीनंतर चाणक्य पुन्हा गंगासागर मिश्राच्या रूपात अवतार घेतो. भारतातील एका छोट्या शहरात, व्यवसायाने शिक्षक असणारा गंगासागर अनेक महत्त्वाकांक्षी व्यक्तींना आपल्या हातातील कठपुतळ्या बनवतो.आधुनिक भारत हा प्राचीन भारतासारखाच वर्णभेद, भ्रष्टाचार आणि समाज विभाजक राजकारण ह्यांनी दुंभगलेला आहे. हा कावेबाज पंडित, भारताला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा चमत्कार करू शकेल का? याचे उत्तर मिळवण्यासाठी अश्विन सांघी या सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या या लेखकाचे `चाणक्याचा मंत्र` हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
-
Swaminathan Bhukmukticha Dhyas (भूकमुक्तीचा ध्यास)
स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (चरित्र) - हरित क्रांतीच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले कृषीवैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांचा वेध घेणारे पुस्तक.
-
Shalana Lihileli Patre (शाळांना लिहिलेली पत्रे)
जे कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांना पाठविलेल्या पत्रांचे हे संकलन आहे. 'कृष्णमूर्ती ह्या पत्रांमधून - निव्वळ पदवीलाच महत्त्व न देता विद्यार्थ्यांचा परिपू्र्ण विकास साधून त्यांना मानवी जीवनाची मौलिकता आणि प्रतिष्ठा ह्या गोष्टींची जाणीव करुन देणे, केवळ ऐहिक प्रगतीवरतच लक्ष केंद्रित न करता त्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टीचा वेध घेण्यासाठी आणि वैश्विक समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना तयार करणे ह्या बाबतीत शिक्षणपद्धतीला आलेल्या अपयशाकडे आपले लक्ष वेधतात. ही पत्रे वाचताना पालक, शिक्षक, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आणि शिक्षणाविषयी आस्था वाटणा-या अन्य व्यक्तींच्याही जाणिवा समृद्ध होतील.
-
Rujwai (रुजवाई)
नकळत्या वयात संजूला हेतुतः दुर्लक्षित करणाऱ्या मानसीची योगायोगाने त्याच्याशी भेट होते आणि जुन्या ‘ऋणानुबंधा’ची जाणीव ठेवत त्याने केलेली पाठराखण तिला स्पर्शून जाते. मुकुंदाची आई ही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मुलाला मोठे करते; पण सून आल्यावर या आईवर बेघर होण्याची वेळ येते; मात्र तिचा कसा कायापालट होतो, ते सांगते ‘कायापालट’ ही कथा. ‘नातिचरामि’ कथेतील माधवीने एका कलंदर कलाकाराच्या प्रेमात पडून पस्तीस वर्षे त्याला मनापासून साथ दिली. आयुष्याच्या उतरणीवर त्यानेही खुल्या मनाने त्याचे श्रेय तिला दिले, पण एक अबोध अदृश्य सल तिला सतत खुपत होता... मानवी भावना व नातेसंबंधाच्या मनोहारी अनुबंधाचं मनोज्ञ दर्शन घडविणाऱ्या कथांचा संग्रह ‘रुजवाई’...
-
Madam Butterfly (मदाम बटरफ्लाय)
ही गोष्ट आहे जपानच्या एका फुलपाखरासारख्या नाजूक मदाम, च्यो-च्योची. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील अमेरिकी प्रभावातल्या जपानी वातावरणातलं हे कथाबीज. स्वयंभू, आत्मनिर्भर च्यो-च्यो कष्टाळू जपानी स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण.. एका अमेरिकी माणसासोबत ती प्रेमानं संसार थाटते. पण आयुष्यातले कष्ट कमी होण्याऐवजी तिच्या आयुष्यात नव्या प्रश्नांची भर पडते. जीवनातल्या चढउतारांना कणखरपणे सामोरं जाणारी च्यो च्यो ती सारी आव्हाने पेलते. पण या फुलपाखराला जणू दुर्दैवाचा शापच असतो. तिचा अमेरिकी नवरा पुन्हा नवं वादळ घेऊन तिच्या आयुष्यात येतो..आणि आयुष्याची घटी पुन्हा विस्कटते. आता मदाम बटरफ्लाय पुन्हा आशानिराशेच्या हिंदोळयावर भिरभिरू लागते..
-
Hows That (हाऊज दॅट)
‘पॉपकॉर्न’नंतर, सुप्रिया वकील यांचा ‘हाऊज दॅट!’ हा दुसरा विनोदी ललित गद्य संग्रह. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी, होणारे बदल, स्वभावविशेष, जीवनातील विविध रंग टिपत, खुसखुशीत शैलीत लिहिलेले हे लेख वाचकांना आपलेसे वाटतील आणि खळखळून हसवतील. सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद फुलवते. अनुवादक म्हणून सुपरिचित असलेल्या सुप्रिया वकील यांचे हे स्वतंत्र लेखनही वाचकांना नक्की आवडेल.