-
Lok Maze Sangatee (लोक माझे सांगाती)
४०० पानी या पुस्तकात पवारांनी आपला राजकीय प्रवास उलगडला आहे. त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते, देशीविदेशी स्नेही, मोठ्या व्यक्तींबाबतची त्यांची मते, भावना व्यक्त केल्या आहेत. बारामती ते मुंबई व मुंबई ते दिल्ली असा हा दीर्घ राजकीय प्रवास ह्या पुस्तकातून वाचायला मिळेल. गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत, महत्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध....!
-
Chanderi Bhatkanti (चंदेरी भटकंती)
हे पुस्तकही भटकंतीवरचंच आहे,पण थोडं वेगळं,अधिक मनोरंजक,कारण इथे प्रवासातल्या गमतीजमती बरोबरच रुपेरी पडध्यामागचे दिलचस्प किस्सेही आहेत.शब्दांत आणि सुंदर छायाचित्रांत टिपलेली देशी-विदेशातली ही 'चंदेरी भटकंती'
-
Gaye Chala Ja (गाये चला जा)
सिनेसंगीतातील झपाटून टाकणाऱ्या सूरांच्या निर्मात्यांना शिरीष कणेकरांनी वाहिलेली ही भाबडी आदरांजली.
-
Saigalswaryug (सैगलस्वरयुग)
कुंदनलाल सैगल ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातील गायकनटाचे हे सांगीतिक चरित्र. सैगलच्या चित्रपटांबरोबरच त्या त्या सालातील प्रमुख हिंदी आणि मराठी चित्रपटांचे तसेच सैगलच्या गाण्यांची आणि त्याच्या संगीतकारांची चर्चा करताना त्या त्या सालातील गाजलेल्या अन्य गाण्यांचे, ती गाणार्या गायक-गायिकांचे आणि त्यांच्या संगीतकारांचेही उल्लेख येथे येतात. त्यामुळे सैगलच्या काळातील एकूण चित्रपटसृष्टीचे आणि खास करुन त्यातील संगीताचे बदलते स्वरूप या पुस्तकातून आपोआप उलगडले गेले आहे. सैगलवर जे संगीतसंस्कार झाले त्या संदर्भात त्याच्या बालपणी म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतीय समाजात संगीतपरंपरा काय होती, त्याचीही माहिती या लेखनातून मिळते. 1933 ते 1947 हा सैगलचा सुवर्णकालखंड. `सैगलस्वरयुग’ म्हणता येईल अशा या कालखंडाची ही एक संगीतसफर. त्या कालखंडातील अनेकांचे भावविश्व आणि मनाच्या सांस्कृतिक क्षितिजाच्या सीमा विस्तारण्यात सैगलचा नि:संशय वाटा होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
-
Glanirbhavati Bharat (ग्लानिर्भवति भारत)
अनुकरणीय लेखनशैली नसूनही अरुण साधू यांची विषयाची निवड आणि रोख-ठोक मांडणी यामुळे त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचा वेगळाच बाज असतो. भाषेतून नव्हे तर मांडणीमधूनच कथाविषयासंबंधीची त्यांची अतूट बांधिलकी तीव्रतेने व्यक्त होते. ‘बिनपावसाचा दिवस’, ‘माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘मुक्ती’, ‘मंत्रजागर’ आणि ‘बेचका’ या कथासंग्रहानंतर साधू यांचा हा संग्रह आहे वेगळ्याच विषयावर वेगळ्या धाटणीची मांडणी घेऊन. सर्व कथांमधून एक सूत्र आहे, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या विषयाचे. देशाची, समाजाच्या नीति-मूल्यांची, संस्कृतीची होत असलेली सर्वांगीण अधोगती. आजच्या सामाजिक वास्तवाचे दाहक चित्रण असलेल्या या कथा विचार करायला लावणार्या आहेत तशा अस्वस्थ करणार्याही.
-
Baji (बाजी)
शिवराय व संभाजी महाराजांनंतर मराठेशाहीचे नाव दुमदुमत ठेवले ते पहिल्या बाजीराव पेशव्यांनी. हिंदू धर्म, मराठ्यांची सत्ता दिल्लीपर्यंत पोचविण्याचे स्वप्न तेजस्वी बाजीने पाहिले आणि पेशवेपदाची वस्त्रे अंगावर चढल्यानंतर पुढील २० वर्षे अतुल्य पराक्रम करीत ते पूर्ण केले. स्वराज्याचा डोलारा एकहाती तोलून धरणार्या बाजीरावाचे आयुष्य अनेक नाट्यमय, संघर्षमय घडामोडींनी भारलेले आहे. त्याचा वेध कुंदन तांबे यांनी ‘बाजी’ या कादंबरीत घेतला आहे. बाजीरावाच्या प्रेमाची, त्याच्या जीवलगांची कहाणीही यात आहे. पेशवा म्हणून त्याने गाजविलेला पराक्रम प्रेरणादायी आहे.