-
Jalati Mashal (जळती मशाल)
एक दिवस वाड्यात एकही माणूस जिवंत राहणार नाही भकास पडलेल्या वाड्यात केवळ कावऴय़ाची कर्कश्श काव् काव् चाललेली असेल हेच स्वप्न तो पाहत होता. आणि याच दारुण जिद्दीने तो पेटला गेला होता त्या चमत्कारिक प्राण्याने अलगद आपले पाय खाली सोडले.अगदी पालीसारखा तो धाब्याला गच्च चिपकला होता. दोन्हीही बाजूना धाब्याच्याखापरीत हात रोवायला जागा मिळाल्यामुळे त्याला आपला कंबरेपर्यंतचा भाग खाली घेता आला होता.नाहीतर कमाल होती त्याची इतक्या शांतपणे आणि सफाईदार अशी हालचाल तो करीत होता की, त्याच्याऎवजी दुसरा कुणी माणूस जरी असता तरी त्याने एव्हाना जमीन गाठली असती आणि पय लावून धूम ठोकण्याची वेळ आली असती.
-
Pratarna (प्रतारणा)
तिने ठाम निश्चय केला आहे. या पुढं दुबळे राहायचं नाही. स्वतःच्या पायावर उभं रहायचं. स्त्री स्वतंत्र झाली, मनाने कठोर बनली आणि आपलं रक्षण करण्यापूरती का होईना आर्थिक दृष्टया सबळ झाली. तिच्यावर अन्याय करण्याचे साहस समाजातला कुठलाही पुरुष करू शकणार नाही. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. दातेसाहेब, आज समाजातल्या बर्याच स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत.साहशी कामं यशस्वीरित्या पार पाडत आहेत. पुरुषाइतक्याच त्या सबळ झाल्या आहेत.लाथ मारु तिथून पाणी काढू असं म्हणण्याइतपत त्यांच्यात ताकत आली आहे.ती कुणालाच जुमानणार नाही, कुणाची बटीक राहणार नाही. अन्याय तर मुळीच सहन करणार नाही. जशास तसे वागेल!...........
-
Sur-Sangat (सूर-संगत)
गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपनाऱ्या गायिका. या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईना लाभली. या घराण्याचे चार मातब्बर कलाकार उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि ख्याल गायकीच्या अनभिषिक्त साम्राज्ञी केसरबाई केरकर धोंडूताईना गुरु म्हणून लाभले. संगीताच्या क्षेत्रात ' घराणी हवीत कशाला '? असे सूर उमटत असतानाच्या काळात ' घराणी हवीतच ' असा बाणा जपनाऱ्या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणाऱ्या धोंडूताईनी त्यांच्या गुरुंविषयी आणि सांगीतिक कारकीर्दीविषायी सांगितलेल्या आठवणी म्हणजेच - सूर-संगत
-
He Vishwache Angan (हे विश्वाचे अंगण)
चार दशकांपूर्वी भारतातल्या धूळवाटांतून येऊन अमेरिकेतल्या गगनमहलाला गवसणी घालणाऱ्या मराठी माणसाचे हे प्रांजळ आत्मकथन. वास्तुरचनेतून मानवी आयुष्य सुंदर, उन्नत करण्याचा निदिध्यास, कौटुंबिक एकात्मतेवर प्रगाढ़ विश्वास, स्वतःशीच चाललेला निरंतर संघर्ष अविरत विश्वभ्रमण उत्कट कलासक्ती, उदंड कर्तुत्व दातृत्व यांची प्रतिबिंबं यात दिसतील. नामवंत आंतरराष्ट्रिय विद्यमान वास्तुरचनाकारांच्या मालिकेत अग्रभागी विराजमान झालेले अनिवासी भारतीय सुधीर जांभेकर. मराठी माणसाला अभिमान वाटावी, तरुणाईला प्रेरक ठरावी अशी एका मनस्वी वास्तुरचनाकाराची ही आगळीवेगळी कहाणी. वैयक्तिकतेकडून वैश्विकतेचा रोमहर्षक प्रवास...