-
Raja Manus ('राजा' माणूस)
भारतातले 'पॉलमुनी' म्हणून ज्यांचा गौरव झाला आणि ज्यांना तो भूषणावहच वाटत होता, असा हा 'परांजपे' नावाचा 'राजा'. नुसताच 'राजा' नव्हेतर 'राजा' माणूसच होता; तितकाच दिलदारही होता. राजाभाऊ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राटच ! त्यांनी अभिनेता व दिग्दर्शक म्हणून आपला अबाधित असा ठसा या सृष्टीवर उमटवला; ह्याचीच ही कहाणी
-
Dhuke (धुके)
'धुके' हा कथासंग्रह प्रसिद्ध राजस्थानी लेखक माधव नगदा यांच्या 'शापमुक्ती' या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद आहे. माधव नागदा यांच्या अर्थपूर्ण आणि समाजमनातील भाव भावना अचूकपणे टिपणा-या कथा वाचून मी भारावून गेलो. या कथा मराठी वाचकापर्यंत पोहचाव्यात या हेतूने मी त्यांच्या 'शापमुक्ती' कथासंग्रहाचा अनुवाद केलाय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा वेगवेगळ्या विषयाशी निगडीत असून वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य असणारी आहे.
-
Mumbai Kalchi (मुंबई कालची)
मुंबई शहरावर जेवढं विविध भाषेत वाड्मय निर्माण झालं तेवढं अन्य कोणत्याही शहरावर नसावं. मुंबई शाहिरांनी कवींनी कविता केल्या, कथा लिहिल्या, प्रतिभावंतानी कादंब-या बेतल्या. मुंबईवर जीवापाड जीव लवायला तिच्यावर प्रेम करायला शिकवणारी अनोखी कलाकृती, 'मुंबई कालची.'