-
Vaidyakacha Bajar (वैद्यकाचा बाजार)
डॉ. श्रीराम गीत यांनी या पुस्तकात एका वेगळ्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्रात ज्या गैरप्रवृत्ती शिरल्या आहेत त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. हल्ली आजारी पडणं हे महाखर्चिक झालं आहे असं सर्रास बोललं जातं. याच मुद्द्याचा त्यांनी सविस्तर वेध घेताना विविध आजार, त्यावरील उपचार पद्धती, तसंच कोणत्या बाबींमुळे खर्च वाढतो, याची चर्चा केली आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायातील निरीक्षणे, विविध सेमिनारमधील सहभाग, त्यानंतर एका रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सहभागी झाल्यावर घेतलेला सहभाग यातून आलेला अनुभव याआधारे त्यांनी काही निष्कर्ष या पुस्तकात नोंदवले आहेत. वैद्यकीय व्यवसायाची चिकित्सा, त्याचबरोबर आपलं शरीर कसं चांगलं राखलं पाहिजे व काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी नेमकं मार्गदर्शन व जागरूक करणारं हे पुस्तक आहे.
-
Kashmir Dhumasate Barph (काश्मीर धुमसते बर्फ)
काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल, माजी सनदी अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री श्री. जगमोहन यांच्या मूळ "My Frozen Turbulence in Kashmir" या इंग्रजी ग्रंथाचा हा मराठी अनुवाद. हा अतिशय वेधक ग्रंथ, इतिहासाचा वेध घेत, ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर करतो. नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी किती विस्तृत विषयांचा परामर्श यात घेतला आहे याची कल्पना येते. वैशिष्ट्य हे की या सर्व प्रश्नांचं विश्लेषण करताना त्यांनी कुठेही कशाचाही आग्रह धरलेला नाही. लेखकापाशी ज्याचा अकाव्य पुरावा नाही तो मुद्दा त्यांनी मांडलेला नाही. घोंघावत येत असलेल्या वादळाचे 'धोक्याचे इशारे' कसे उपेक्षिण्यात आले आणि त्याचे परिणाम किती महाभयंकर झाल्रे ते त्यांनी अत्यंत कळकळीने पटणाऱ्या शैलीत मांडले आहे. सखोल अंतर्दृष्टीने मुलभूत प्रश्नाच्या मुळाशी जाऊन श्री. जगमोहन यांनी 'बोटचेप्या' व 'खपवून घेणाऱ्या अनुज्ञा-धोरणापायी' काय काय भोगावे लागत आहे ते निर्भीडपणे मांडलंय. भ्रम पाळण्याची मनोवृत्ती, कठोर वास्तवांना सामोरे जाण्याऐवजी बनवाबनवी आणि फसवाफसवीचं व दुटप्पीपणाचं राजकारण कसं होत गेलंय, दुबळं प्रशासन व सरकारातील भ्रष्टाचार यांच्यामुळे काश्मीर व केंद्र यांच्यातील संवैधानिक संबंध विघटनवादास प्रोत्साहन देण्यास कसे कारणीभूत होत आहेत आणि एकंदरच नकारात्मक वृत्ती-प्रवृत्ती कशा कार्यरत आहेत याचा अतिशय चिंतनिय असा ताणाबाणा या पुस्तकात विणला आहे. दहशतवादाचं पाशवी स्वरूप आणि विद्रोहाचे चित्र फारच चिंतनशील मनीषीप्रमाणे लेखकानं रेखाटलं आहे. भारतीय राजकारणातील गोंधळ आणि अंतर्विरोध यांचं लेखकानं केलेलं विश्लेषण व वर्णन अंतर्मुख करणारे आहे. विपर्यास आणि विकृत यांचं चित्र फार मार्मिकपणे दाखवून दिले आहे. वरपांगी विचार करणारे हितसंबंध कोणता खेळ खेळत आहेत, ते त्यांनी क्ष किरण यंत्रासमोर उभे राहिल्यावर दिसते तितक्या स्पष्टपणे बिनचूक दाखवून दिलं आहे. ते अत्यंत हिरीरीने आपल्याला सांगतात की समस्या अतिशय जटिल आहेत, जुनाट आहेत आणि देशाच्या भावविश्वात खोलवर रुजलेल्या आहेत. काश्मीर हे अत्यंत खडतर आव्हान फक्त सुधारीत आणि परिष्कृत भारतच पेलू शकेल, असा भारत की ज्याच्यापाशी 'उद्या' चा वेध घेणारी दृष्टी आहे व वास्तवाचं भान ठेवून व्याहारिक उपाय योजण्याची जिद्द आहे. श्री. जगमोहन हे एक जोमदार कृतीशील आणि गहन चिंतनशील व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाचा ठसा त्यांच्या या आगळ्या वेगळ्या ग्रंथाच्या पानोपानी आढळतो.
-
Vidnyan Visharada (विज्ञान विशारदा)
कमला सोहोनी यांनी सारं आयुष्य शास्त्रीय संशोधनात घालवलं. अनेक जागतिक राष्ट्रीय मानसन्मान मिळवले. उत्तरायुष्यात ग्राहक चळवळीचं व्रत हाती घेतलं. आपल्या वैज्ञानिक बुद्धीनं काही नवे उपक्रम आणले. त्यांच्या आठवणींच्या आधारे साकारलेली त्यांची ही चरित्रकहाणी...
-
Balasaheb Kher (बाळासाहेब खेर)
एक सज्जन मुख्यमंत्री... बालासाहेब खेर हे मुंबई राज्याचे लोकप्रिय सरकारचे पाहिले मुख्यमंत्री होते.
-
Purva Apurva (पूर्व अपूर्व)
"द्वारकानाथ संझगिरीचं हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की, ते माझ्यासमोर बसले आहेत आणि त्यांचे पर्यटनाचे अनुभव मला कथन करतायत. त्यांची शैली अशी ओघवती आहे." -विजय तेंडुलकर
-
Akshay Gaane (अक्षय गाणे)
स्वरसम्राज्ञीने आपल्या खास मैत्रिणीकड़े उलगडलेले अंतरंग आणि तिचा सांगीतिक प्रवास टिपणारे एक संग्राह्य पुस्तक!
-
Durgvarasa (दुर्गवारसा)
जेष्ठ गिर्यारोहक मिलिंद आमड़ेकर यांनी महाराष्ट्रातील १५० व त्या व्यतिरिक्त देशातील ८० किल्ले पाहिले आहेत एवढच नव्हे, तर अभ्यासले आहेत. भारताच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या त्या प्रत्येक दुर्गाला आपला एक स्वतंत्र इतिहास आहे. हे दुर्ग इथल्या पर्यटन विभागाचे अविभाज्य अंग झाले आहे. आपल्या देशाचा हा दुर्गवारसा प्रत्येकाने समजून घ्यावा तो पुढे जोपासला जावा म्हणून हा पुस्तक प्रपंच..
-
Aai Orkut Ani Metkut (आई ऑर्कुट आणि मेतकूट)
बायका आणि विनोदाचा एक अनोखा पैलू...
-
-
Ayushyawedi (आयुष्यवेडी)
जीवघेण्या अजारातून परतलेल्या एका डॉक्टर ची कहाणी तिच्याच शब्दात..