-
Smarangatha (स्मरणगाथा)
सर्वांना परिचित असलेल्या लेखकाच्या अत्यंत रसाळ अशा शैलीत सांगितलेली आणि शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांनी नटलेली ही `स्मरणगाथा’ ही वाचीत असताना पानापानांतून आपल्याला असे जाणवते, की बालवयापासूनच प्रचंड जिद्द उरात घेऊन या माणसाने जीवनाच्या धकाधकीत उडी घेतली. कडूगोड, भीषण भयानक, क्वचित जीवघेण्या अनुभवांच्या आगीत त्याच्या श्रद्धा तावूनसुलाखून निघाल्या. त्याच्यातला माणूस स्वातंत्र्यपूर्व भारतात इंचाइंचाने वाढतच गेला आणि त्यामुळे गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हा कधी कलंदर वाटला, कधी अवलिया वाटला, तरी मूलतः ज्याने स्वतःविषयी खूप काही सांगावे आणि ज्याच्याविषयी तुम्ही-आम्ही खूप काही ऐकावे, असा निखळ, हाडामासाचा, छाती आणि काळीज दोन्ही असलेला, असा माणूस राहिला. `स्मरणगाथे’च्या सहाशे पानांतून या माणसाचे संपन्न व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे. दांडेकरांच्या आजवरच्या विपुल आणि गुणसंपन्न साहित्यात, त्याचप्रमाणे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयातही, `स्मरणगाथा’ हा एक संस्मरणीय मैलाचा दगड आहे.
-
Thought Leaders (थॉट लिडर्स )
आपण जर चाकोरी बाहेरचे काही करू पहात असाल आणि हे कितपत जमेल असे आपल्याला वाटत असेल तर हे पुस्तक आपण ओळ न् ओळ वाचलेच पाहिजे कारण ह्या पुस्तकात केवळ तात्विक/बौद्धिक दृष्ट्याच नव्हेतर असे केलेल्या एक-दोन नाहीतर तब्बल दोन व्यक्तींचे कार्यच वाचकांपुढे ठेवले आहे ते हे अश्या रीतीने की वाचनाचा कंटाळा तर येणार नाहीच पण असे काही करण्याचे मनातही नसणार्यांच्याही मनात तसे विचार पिंगा घालू लागतील. अनू आगा, रवी खन्ना, राजाभाऊ चितळे, प्रताप पवार, मनोज तिरोडकर असे हे बावीस जग कसे पुढे जात राहिले हे तर प्रत्यक्ष त्यांना भेटूनच लेखकाने जाणून घेतले आहेच न् त्यांच्यातील समान धागे शोधून त्याचेही विस्ताराने विवेचन केले आहे. या पुस्तकात जो आपवादात्मक व्यावसायिक जीवनांचा मूलस्त्रोतसंग्रह आहे तो प्रत्येक तरुणाला (आणि तरूणीलाही) मार्गदर्शकपर वारसालाच आहे.
-
Bharat 2020 (Navya Sahastrakacha Bhavishyavedh) (भ
इसवीसन २०२० पर्यंत किंवा जमल्यास त्याच्याही आधी प्रगत भारत उभा करणे हे हस्तिदंती मनोर्यात बसून चितारलेले मिथ्या स्वप्न नव्हे किंवा केवळ आशावादही नव्हे. खरे तर, ही अथक परिश्रमांची मागणी करणारी आणि अव्याहत चालणारी मोहीम आहे. आपण सारे त्यात मनापासून सहभागी होण्याचा अवकाश... मोहीम यशस्वी झालीच म्हणून समजा!
-
Gharoghari Dnyaneshwar Janmati ( घरोघरी ज्ञानेश्वर
श्री. ज्ञानेश्वरांसारखा युगपुरुष युगायुगांतून एकदाच जन्माला येतो, हे खरं असलं, तरी मुलगा अथवा मुलगी ज्ञानेश्वरांसारखा सदगुणी, तेजस्वी आणि प्रगल्भ होणं आई - वडिलांच्याच हातात असतं, असं लेखक डॉ. ह. वि. सरदेसाई सांगतात. मुलांचं संगोपन, आई - मुलाचं नातं, संस्कार, शिक्षण यांच्यासह भावनांवर ताबा आदी मुद्यांचा पुस्तकात विस्तृत ऊहापोह करण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये आई - वडिलांचा वाटा सिंहाचा असतो. यासंबंधात डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी मौलिक मार्गदर्शन केलं आहे.
-
Shikuyaya Anande ( शिकू या आनंदे)
आपणच शिकणारे असतो नि शिकवणारे असतो. मजा येते दोन्ही भूमिका एकदम करताना! यात आनंदही असतो. काळ बदलताना कधी सुंदर पावलांचे ठसे सापडतात, त्यावरून चालताना आपलीच वाट सापडते. शब्द औपचारिक असले तरी, अर्थाचे नवे आकाश कोणतेही असो. त्यात खूप अवकाश असतो. हा आहे शिकण्यातला अवकाश. ‘ज्ञानरचना’ ह्या वेगळ्या, कधी पूर्वीच्याच भासणार्या संकल्पनेचा घेतलेला शोध.
-
Cheaper by the Dozen (चीपर बाय दी डझन)
चिपर बाय द डझन' हे फ्रँक गिलब्रेथ या गृहस्थावर त्याच्या एका मुलीने व मुलाने लिहिलेले पुस्तक. चरित्रात्मक असूनही अत्यंत मनोवेधक व मनोरंजक आहे. फ्रँक गिलब्रेथ व्यवसायाने इंजिनिअर. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावी, यावर ते संशोधन करत व त्याचे प्रयोग आपल्या मुलांमुलींवर करत. त्यानी स्वत:ला जाणीवपूर्वक, ठरवून बारा मुले होऊ दिली. आपल्या मुलांना टंकलेखन, मॉर्सकोड, मोठमोठाल्या रकमांचे तोंडी गुणाकार, भागाकार त्यांनी स्वत:च्या पद्धतीने शिकवले. त्याचप्रमाणे फ्रेंच, जर्मन, भाषा, भूगोल, खगोलशास्त्र शिकवून प्रवीण केले होते. मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून शिष्टाचार, रीतरिवाज, याबरोबरच मुलांच्या समित्या बनवून त्यांच्यावर वर्षभराची धान्यखरेदी, वस्त्रप्रावरणांची खरेदी, वगैरे कामे सोपवली होती. घरात कोणत्याही गोष्टीत उधळमाधळ व बेजबाबदारपणा होऊ नये म्हणून एक काटकसर समितीही होती. या समितीतली मुले घरभर हिंडून जरूर नसताना पंखे, दिवे, पाणी वाया जात नाही ना हे पहात व चूक करणार्यास दंडही करत. फ्रँक गिलब्रेथ यांच्या सर्व उपक्रमात मानसशास्त्राची पदवीधर असलेली त्यांची पत्नी लिली सहभागी असे. जागतिक पॉवर परिषद व व्यवस्थापन परिषद (आंतरराष्ट्रीय) इंग्लंड व झेकोस्लोव्हाकियात भरणार होत्या. या दोन्ही परिषदात भाषण करण्यासाठी फ्रँक गिलब्रेथ यांना आमंत्रण होते. तिकडे जायला निघालेले असताना त्यांना, स्वत:च्या गावातच टेलिफोनवरून आपल्या पत्नीला काही सुचना देत असतांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू येतो. त्यानंतर घरच्या कौटुंबिक मंडळाची बैठक घेऊन लिली फ्रँक गिलब्रेथ, पतीच्या जागी आपण या दोन देशात भाषण देण्यास जाण्याचे ठरवते. तिच्या गैरहजेरीत सर्व मुले अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून सर्व सांभाळण्याचे तिला आश्वासन देतात.
-
Grahan.(ग्रहण )
धारप हे नाव आताच्या वाचन करणा-या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता, ही गोष्ट कधीच न विसरण्यासारखी आहे. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. मराठी साहित्यात रहस्यकथेचे आणि कादंबरीचे दालन समॄद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र्य लेखन करणारे लेखक आहेत, त्यांत नारायण धारपांचे स्थान अव्वल आहे. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत, वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, इतकेच नाही तर त्या वातावरणाचा एक भाग बनविण्याचे कसब ज्या काही लेखकांना साध्य झाले; त्यापैकी नारायण धारप एक आहेत, ही गोष्टही आवर्जून नमूद करण्यासारखी आहे.
-
vatvruksha (वटवृक्ष)
" जीवन हा वटवृक्ष कौटुंबिक पारंब्यांचा - आपल्या हातात आहे, विस्तार कसा करायचा …" "संकट टाळण मुश्किल जरी, प्रार्थना करणं शक्य आहे मनोधैर्याच्या भरवशावर, काहीही करणं शक्य आहे …"
-
Das Dongari Rahato ( दास डोंगरी राहातों )
या लोकोत्तर महानुभावानं जन्मभर समाजचिंतन केलं रात्रंदिवस एकच ध्यास ``निशिदिनिं जनचिन्ता लागलीसे उदारा’’ अश्या जगा आगळ्या छंदानं वेढलेल्या विरक्त- पण देशाच्या संसाराची चिंता वाहणार्या श्रीसमर्थ रामदासांचं लीळाचरित्र सांगणारी रसमयी कादंबरी ``दास डोंगरीं राहातो’’
-
Lagebandhe (लागेबांधे)
अजाणत्या वयात जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तींनी केलेल्या मानसिक-भावनिक पोषणाचे संस्कार आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणारे ठरतात. दारिद्यातही मनाची श्रीमंती जपणार्या काही व्यक्ती मधु मंगेश कर्णिक यांच्या आयुष्यात आल्या. त्यांच्याशी असलेले `लागेबांधे’ या पुस्तकातून हळूवारपणे व्यक्त झाले आहेत. आयुष्यभर पुरेल अशा अगणित कडूगोड आठवणींची शिदोरी देणार्या मंगेशदादा, आतेबाय, होनीआजी, वारणामावशी, अनू, प्रेमा यांसारख्या सुहृदांविषयी केलेले आत्मीय लेखन.