-
Jeshthansathi 4 Goshti Yuktichya (ज्येष्ठांसाठी ४
आज बदललेल्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाचं विभाजन होऊन विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं आहे. कोणाला वेळ द्यायला किंवा कोणाचा वेळ घ्यायलाही आपल्याकडे फुरसत नसते. तरीही, बरीच कुटुंबं अशी आहेत जी गुण्यागोविंदाने एकत्र राहाता आहेत, एकमेकांशी संवाद ठेवून आहेत. अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांसाठी भा. ल. महाबळ काही बोलक्या व्यक्तिरेखांमधून व प्रसंगांतून नात्यात जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नकळत मार्गदर्शन करून जातात. घरात सशक्त व आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी घरातील सदस्य -- विशेषत: ज्येष्ठ व्यक्ती विधायक व परिपक्व भूमिका बजावू शकतात. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केल्या व दुसऱ्याचा विचार केला तर कुटुंब कसं सुखी व समाधानी राहू शकतं हे लेखक विविध लेखांमधून पटवून देतात. नुसतं वयाने 'ज्येष्ठ' न राहता वागण्यातून 'ज्येष्ठ' होण्यासाठी ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या....
-
Sathinantarcha Aahar Va Arogya (साठीनंतरचा आहार व
वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधनांमुळे माणसाची आर्युमर्यादा वाढली आहे. आज वृध्दत्वाची व्याख्या नव्याने करण्याची वेळ आली आहे. साठीनंतर आयुष्यातली प्रमुख कर्तव्यं बहुतांशपणे पार पडलेली असतात, थोडा निवांतपणाही लाभला असतो. पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या टप्प्यावर आरोग्याच्या थोड्या कुरबुरीही सुरू होत असतात. या पार्श्वभूमीवर साठीनंतरही सर्वांना चांगलं आयुष्य जगता यावं हा विचार मनात ठेऊन डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. साठीनंतरच्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, तो किती व कोणत्या वेळी घ्यावा, कोणते व्यायाम करावेत, यासाठी त्या या पुस्तकात मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे साठीनंतर उदभवू शकणारे ज्ञानेंद्रियांचे आजार कोणते, विस्मरणावर मात करण्यासाठीचे उपाय कोणते, एकटेपणा, नैराश्य व दैनंदिन जीवनातील ताण यावर मात कशी करावी यासाठीही डॉ. वर्षा जोशी मार्गदर्शन करतात. मुख्य म्हणजे हे सर्व त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून व सोप्या पध्दतीने सांगितलं आहे. विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून साठीनंतरचं जीवन व्याधीमुक्त व आनंददायी कसं करता येईल यासाठी या पुस्तकातून निश्चितच नवा मूलमंत्र मिळेल.
-
-
Bhokarwaditil Rasvantigruha (भोकरवाडीतील रसवंतीगृ
दुकानदारीची सदोबांची काय कल्पना होती, कोण जाणे! गिऱ्हाईक वाढवण्यासाठी नित्य काही नवे करावे लागते, निरनिराळ्या योजना आखाव्या लागतात, दुकानाची आकर्षक सजावट करावी लागते, या गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या. अर्थात हा त्यांचा दोष नव्हता. गावचे वातावरणच तसे होते. सगळेच दुकानदार एकाच छापातले गणपती होते. दुकान मांडून बसायचे, गिऱ्हाईक आले तर सौदा करायचा, नाही आले तर निवांत बसायचे. मुद्दाम कसलीही हालचाल करायची नाही, अशीच एकूण पद्धत होती. आधुनिक विक्रीकलेचा गंधही त्या काळात गावाला नव्हता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भरभराटीची आणि सुबत्तेची काही वर्षे संपली. गिऱ्हाईक कमीकमी होत गेले. फार हाल झाले त्याचे... शेवटी सदोबा नेवासकर अन्नान्न करीत मेला!
-
Goshtich Goshti (गोष्टीच गोष्टी)
जादू-बिदू काही नसते; सगळी बनवाबनवी असते, हे दाखविण्यासाठी बाबू बनला भोकरवाडीतील ‘जादूगार’! हॉटेलमध्ये चोरी झाल्याची ‘कम्प्लेंट’ बजाबाने दिली, मात्र चोरी झालीच नाही, असेही लिहून दिले! भोकरवाडीतील ‘गावगुंडी’ला कंटाळून नव्या शिक्षिकेने गावच सोडले! रामाच्या वाट्याला आलेला ‘वनवास’ बाबू आणि चेंगट्याच्या वाट्यालाही आला! सरकारने वटहुकूम काढून ‘भ्रष्टाचार’ कायदेशीर ठरवला, पण बाळू सरकारी नोकर असल्यामुळे त्याचे काम दुप्पट झाले! बापू पाटल्याच्या मुलाचा दत्तक-विधी तर झाला, पण बाबू आणि चेंगटाने घोटाळा केला! चौथीच्या गणिताच्या मारकुट्या मास्तरांचा ‘तास’ एकदा दगडू गवळीने घेतला! शिवा जमदाडे, रामा खरात, गणामास्तर, नाना चेंगट आणि बाबू पैलवान ही सर्व ‘कंपनी’ ट्रिपला निघाली! ‘गोष्टी’ म्हणजे गमती... उपहास... उपदेश... आणि बोचरी टीका अन् व्यथाही... हेच आहे ‘गोष्टीच गोष्टी’चं सूत्र!
-
Stones Into Schools (स्टोन्स इनटु स्कूल्स)
ग्रेग मॉर्टेन्सन. बेस्ट सेलर म्हणून जगभरात गाजत असलेल्या 'थ्री कप्स ऑफ टी' या पुस्तकाचा लेखक. हे पुस्तक पाकिस्तानमधील काराकोरम या अतिशय उंच व दुर्गम पर्वतराजीतील कोर्फे या गावात ग्रेगच्या 'सेंट्रल एशि[...]
-
Gappa Goshti (गप्पागोष्टी)
`माझा कै. वृत्तपत्रव्यवसाय` मधला नायक आपल्या बौद्धिक बाणेदारपणामुळे आपली पत्रकारिता कशी कैलासवासी` झाली हे स्वत:च सांगतो... शहरात राहणाऱ्यांना खेडेगावाबद्दल किती गैरसमज असतात याचा उपरोधिक शैलीत समाचार `खेड्यातील एक दिवस` मध्ये आढळतो... भिकू इंगळे कारकून होण्यापेक्षा मास्तरकी करण्याचं ठरवतो आणि त्याचा `एका वर्गातील पाठ` आयुष्यभराचा धडा ठरतो!... आणि पुण्यातल्या जलप्रलयाने हळहळलेली भोकरवाडीतली मंडळी मदत मागायला निघतात आणि त्यांनाच `मदत` करायची पाळी येते... केस हरणार असं ठाऊक असूनही केवळ प्रतिष्ठेकरिता केस लढणारा, दिलदार पण इरसाल `गणपत पाटील` शेवटी सखूला माफ करतो, तर गणपत वाघमोडे वेगळीच शक्कल लढवून `निकाल` आपल्या बाजूने लावून घेतो... मानवी स्वभाव, त्यातली विसंगती, इरसालपणा आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उस्फूर्त कथनशैलीमुळे यातल्या कथा या `गप्पागोष्टी`च वाटतात.