-
Akrosh ( आक्रोश )
बेरडांनी चोरी करावी, प्रतिष्ठितांची चाकरी करावी, पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन- लाचार, दरिद्री! देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचं पतिपतापण शाबूत राहतं. उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणार्या जागत्या चळवळीची सत्यकथा.
-
Sparshgandh (स्पर्शगंध )
आयुष्यरंगातील अस्वस्थ पदर व्यक्त करणारा, मन ढवळून काढणारा कथासंग्रह. या कथांचे आपणही सहप्रवासी असल्याची अनुभूती देणा-या आगळ्या-वेगळ्या, जिवंत कथांचा अमूल्य ठेवा.
-
मनातल्या वावटळी
या कथांमधून, निवेदनांमधून लेखिका रोजच्या जगण्यातल्या संगती विसंगती सांगत प्रश्नांची भेंडोळी निर्माण करते. त्या त्या कथेतील व्यक्ती रेखा कधी आपण जगलेली, पाहिलेली असते, त्यांचे प्रश्न परिचयाचेही असतात. वाचकाने उत्तर देण्याचे आवाहन त्यात असते. आपणही त्यावर नकळत विचार करू लागतो, सुन्न होऊन !
-
Madmaya ( माडमाया )
निसर्गाच्या कुशीत वावरणारी आणि वडपिपंळात महापुरुष पाहणारी नजर लाभलेली कोकणी माणसं ! कुळथाच्या पिठीसारखी तिखट . कोंड्याचा मांडा करण्याचा हातखंडा . नजरेत भरणाऱ्या निसर्गाची मिजास बेताबेतानि सांभाळून आपल्याच जगण्याची खूशी कशी मिरवतात नि जगणं जिरवतात त्याची ही वानगी!
-
Pudhalya Haka (पुढल्या हाका)
सुबोध जावडेकरांच्या या कथा माणसांच्या वेगवेगळ्या प्रश्र्नांना भिडणार्या कथा आहेत. त्या विज्ञानकथा आहेत असं म्हणण्यापेक्षा विज्ञान आणि माणूस याचं आज जे एकसंध रसायन झालं आहे, त्या संबंधीच्या कथा आहेत. माणूस आणि विज्ञान यांचा संबंध काय हे या कथांतून दिसून येतं. माणूस विज्ञानाला कसा प्रतिसाद देतो आणि प्रतिकार करतो. असं दोन्ही आहे. त्या रंजक आहेत पण रंजन नाही करत, उलट अंगावर येतात. एक प्रकारचं शोकात्म भान देतात. त्या जे नैतिक प्रश्र्न निर्माण करतात ते प्रश्र्न आजचे, ह्या घटकेचे नसतात, आणि त्यावेळी ते विज्ञानाच्याही पलीकडे जातात. वास्तव जीवन काय आहे, जगताना माणसाला कोणकोणत्या पेचांना तोंड द्यावं लागतं, कोणत्या प्रश्र्नांना सामोरं जावं लागतं-आणि भविष्यात जावं लागेल. हे या कथांतून येतं. या दृष्टीनं पाहिलं तर रखरखीत वास्तव, जीवनाबद्दलचं भाष्य आणि भाष्यातून निर्माण होणारं जीवनाचं रहस्य, या तीनही अंगानं या कथा मला महत्त्वाच्या वाटतात. अभिजात वाटतात.
-
Hi Aaplich Manas! (ही आपलीच माणसं)
महाराष्ट्रात राहणारा तो मराठी अशी व्याख्या आता पुरेशी नाही. जगाच्या पाठीवर कुठेही राहून महाराष्ट्राबद्दल जिव्हाळा असणारा तो मराठी माणूस ! या दृष्टीनं बर्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्थिरावलेली, तेथील नागरिकत्व स्वीकारलेली माणसं ही आपलीच असतात. त्यांचं भावविश्व जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
-
Rasikho! (रसिकहो! )
आपल्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातले एक चैतन्यशील, समृद्ध व्यक्तिमत्व, विनोद, नाट्य, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, सामाजिक चिंतन अशा अनेक अंगांनी पु. लं. चे लेखन गेले अर्धशतक मराठी मनाचे रंजन आणि उद्बोधन करीत आले आहे. त्याबरोबरच रंगमंच आणि रजतपट यांवरील अभिनय आणि संगीताच्या क्षेत्रातले विविध अविष्कार यांच्या योगानेही त्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. आपल्या विविध आणि विपुल लेखनातून पु. लं. नी वाचकांशी दृढ नाते जोडले. रंगभूमीवरील नाटके आणि ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’ सारखे एकपात्री प्रयोग व ‘वार्यावरची वरात’ सारख्या बहुरंगी कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांशी परोक्ष संवाद साधला; त्याबरोबरच वेळोवेळी साहित्य, संगीत, नाट्य, अभिनय, सामाजिक संदर्भ घेऊन आलेले विषय यांवरील आपल्या अनेक भाषणांनी ते श्रोत्यांशी प्रत्यक्ष बोलत राहिले. वक्तृत्व हा पु. लं. च्या वाङ्मयीन आणि कलाप्रेमी व्यक्तिमत्वाचाच एक रसरशीत, संपन्न, सुंदर अविष्कार. प्रदीर्घ, व्यासंग, संदर्भसंपन्नता, प्रसन्न विनोद आणि गंभीर चिंतनशीलता यामुळे पु.लं. चे कोणतेही भाषण हा श्रोत्यांच्या दृष्टीने एक मनोज्ञ अनुभव असतो. निखळ प्रांजळपणा हा या भाषणांचा प्राण आहे आणि पु. लं. च्या अंगभूत अभिनयगुणांनी त्यांना एक वेगळे समर्थ परिमाण दिले आहे. आजपर्यंत केवळ स्थानिक लोकांनीच ऐकलेली, किंवा वृत्तपत्रांतून त्या त्या वेळी छापून आलेली पु. लं. ची भाषणे आता प्रथमच ग्रंथरुपाने प्रसिद्ध होत आहेत. वाचकांना ही एक आनंदपर्वणी वाटेल यात शंका नाही.
-
Mitraho! (मित्रहो! )
आपल्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातले एक चैतन्यशील, समृद्ध व्यक्तिमत्व, विनोद, नाट्य, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, सामाजिक चिंतन अशा अनेक अंगांनी पु. लं. चे लेखन गेले अर्धशतक मराठी मनाचे रंजन आणि उद्बोधन करीत आले आहे. त्याबरोबरच रंगमंच आणि रजतपट यांवरील अभिनय आणि संगीताच्या क्षेत्रातले विविध अविष्कार यांच्या योगानेही त्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. आपल्या विविध आणि विपुल लेखनातून पु. लं. नी वाचकांशी दृढ नाते जोडले. रंगभूमीवरील नाटके आणि ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’ सारखे एकपात्री प्रयोग व ‘वार्यावरची वरात’ सारख्या बहुरंगी कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांशी परोक्ष संवाद साधला; त्याबरोबरच वेळोवेळी साहित्य, संगीत, नाट्य, अभिनय, सामाजिक संदर्भ घेऊन आलेले विषय यांवरील आपल्या अनेक भाषणांनी ते श्रोत्यांशी प्रत्यक्ष बोलत राहिले. वक्तृत्व हा पु. लं. च्या वाङ्मयीन आणि कलाप्रेमी व्यक्तिमत्वाचाच एक रसरशीत, संपन्न, सुंदर अविष्कार. प्रदीर्घ, व्यासंग, संदर्भसंपन्नता, प्रसन्न विनोद आणि गंभीर चिंतनशीलता यामुळे पु.लं. चे कोणतेही भाषण हा श्रोत्यांच्या दृष्टीने एक मनोज्ञ अनुभव असतो. निखळ प्रांजळपणा हा या भाषणांचा प्राण आहे आणि पु. लं. च्या अंगभूत अभिनयगुणांनी त्यांना एक वेगळे समर्थ परिमाण दिले आहे. आजपर्यंत केवळ स्थानिक लोकांनीच ऐकलेली, किंवा वृत्तपत्रांतून त्या त्या वेळी छापून आलेली पु. लं. ची भाषणे आता प्रथमच ग्रंथरुपाने प्रसिद्ध होत आहेत. वाचकांना ही एक आनंदपर्वणी वाटेल यात शंका नाही.
-
Sujanho! (सुजनहो! )
"संगीताचा जो उपासक तो माझा आप्तच. तो माझा नातलगचं. मग कोणी वयानं वडील, कोणी वयानं धाकटा, कोणी मित्र. एखादा माणूस गातो, एवढं मला कळलं म्हणजे आनंदच होतो. या जगामध्ये इतकी माणसं आचरट उद्योग करीत असतात की, त्यांत कोणालातरी आपण गावं असं वाटणं हा दुर्मिळ योगच आहे. जीवन सुरेल ठेवण्यापेक्षा बेसूर करण्याकडेच प्रवृत्ती असल्याचं आपल्याला दिसतं. या जगामध्ये कोणीतरी सुरांच्या शोधामध्ये निघालेलं आहे असं दिसलं की तोच माझं सगळं काही. विचार करायला लागलं की असं वाटतं, आपलं जीवन अशा रितीनं श्रीमंत करण्यामध्ये हजारो लोकांनी मदत केलेली आहे, हजारो गीतांनी मदत केलेली आहे. रस्त्यावरून चाललो असताना नकळत एखाद्या वेळेला रेडिओवरून लता मंगेशकरांची एखादी लकेर येते आणि आपल्या श्रीमंतीत भर टाकून जाते. अलंकार केवढा मोठा आहे याला काही किंमत द्यावी असं मला वाटत नाही. तो किती सुंदर आहे, किती आल्हादक आहे, यालाच किंमत द्यायला पाहिजे."
-
Udai ( उदई )
अशिक्षण, दारू, चोऱ्यामाऱ्या आणि रुढीपरंपरेची उदई म्हणजे वाळवी लागलेला पारधी समाज आजही बहुतांश त्याच मानसिकतेत जगतो आहे. अशा या शापित समाजातील एक बाप आपल्या मुलाच्या शिक्षणाचा ध्यास धरतो. मुलाच्या शिक्षणासाठी सारे कष्ट झेलतो. मुलाला मात्र शिक्षणाचा तिटकारा आहे. रडतखडत मुलगा दहावीपर्यंत पोचतो. दहावी नापास झाल्यावर बाप मुलाचं नाव टाकतो. येता-जाता साऱ्यांसमोर मुलाला बॉल लावतो. बापाचं हेच वागणं मुलात जिद्द निर्माण करतं. मुलगा पदवीधर होतो. शिक्षणाचं महत्व समजतो आणि समाजातील लोकांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त करू लागतो. अशिक्षित आणि दुर्लक्षित समाजातल्या मुला-बापातला हा संघर्ष. त्यासोबत आहे पारधी जीवनाचं भेदक वास्तव.
-
Zale Mokale Aakash (झाले मोकळे आकाश )
उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय या दोन्ही विचारसरणीचे आपआपसात जमणे , त्यांचा मेळ बसणे तसे अवघडच ! अशा वेळी ते कुटुंब सावरायचा थोडासा साहसी , बराचसा धोक्याचा आणि नाट्यमय असा मार्ग सांप्रत कथेत वाचायला मिळेल .
-
Lakshyavedh (लक्ष्यवेध)
सुलतानी राजवटीविरुद्ध उठाव करून हिंदूंचं स्वतंत्र राज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी उभं आयुष्य वेचलं स्वराज्य उभ करताना सुरुवातीला अनेक संकटं उभी राहिली. या संकटापैकी सर्वात पहिलं आणि मोठं संकट म्हणजे अफझलखानाची स्वारी. प्रचंड सैन्यानिशी खानानं स्वराज्यावर चढाई केली. राजांना जिवंत पकडून नेण्याची त्याची गर्वोक्ती होती. तर खानाला मारल्याशिवाय स्वराज्याबद्दल दबदबा निर्माण होणार नाही हे राजे जाणून होते. शिवाजी अफजल भेटीत जे भीषण नाट्य घडले आणि जी अभूतपूर्व कत्तल मराठ्यांनी केली त्याला इतिहासात तोड नाही. या विलक्षण नाट्याचे चित्रण करणारी ही कादंबरी.
-
Udhan ( उधाण )
श्री. कुंभार गुरुजी यांची कथा प्रामुख्याने ग्रामीण समाजाचे अंतरंग उकलून दाखविणारी आहे. त्यांची कथा वास्तवातील नाट्य हेरणारी आहे. त्यांच्या कथेचा तो गाभाच असतो. ते कथेतील पात्रांना जिवंत करतात. वाचकांसमोर ही पात्रे या संवादांमुळे साकार होतात, त्यांना प्रत्यक्ष समोर घटना घडते आहे, असे वाटू लागते. गुरुजींच्या कथांतील विषयही हलके फुलके, वरवरचे नसतात. या कथा एकूण मानवाच्याच सखोल, सूक्ष्म, तरल मनांचा शोध घेणा-या आहेत. अनेक कथांना शेवटी ज्या कलाटण्या दिलेल्या आहेत; त्यातूनही मानवी मनाची ऐनवेळी आकाराला येणारी वृत्तीच प्रकट होताना दिसते. एकंदरीतच कुंभार गुरुजींच्या कथांचं अनुभवविश्व अंतर्बाह्य विविधतेनं नटलेलं आहे. पात्रांच्या विविधतेमुळे, तिच्यातील कलाटणीमुळे ती वाचकाची उत्सुकता वाढवते, ती वाचकांना गुंगवत ठेवते.
-
Igin ( ईगीन )
महादेव मोरे यांच्या 'ईगीन' या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखीत करतात. काही गंभीर, तर काही गंमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलित-पददलितांचे, कष्टकर्यांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्ष-खेदाच्या, व्यथा-विवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हींग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणार्या ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणार्या, विचार करायला लावणार्या व काही वेळा त्याच्या गालांवर स्मित हास्याची रेषा फुलविणार्या ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तीचित्रे हेही ह्या कथांचे सामर्थ्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे.
-
Pagora (पागोरा)
आत्मकथनपर लेखनाचे सामर्थ्य घेऊन अवतरलेली रमेश अंधारे यांची एक लक्षणीय कादंबरी.