-
Gaat Aahe Lagnashi (गाठ आहे लग्नाशी)
लग्न… का? कधी? कसं? कशासाठी? कोणासाठी? कुठवर? काय किंमत मोजून? लग्नाविषयी चौफेर विचार मांडणारं… विचारांना चालना देणारं… तरुणतरुणींनी व त्यांच्या पालकांनी वाचलंच पाहिजे असं पुस्तक!
-
The Associate (द असोसिएट)
पेनिसिल्वानिया मधील यार्क गावातल्या वकीलांचा मुलगा काईल मॅकअवॉय ये कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतो. "येल लॉ जर्नल'' चा मुख्यसंपादक म्हणून शेवटच्या वर्षी मान पटकावतो. कॉलेजच्या चार वर्षांमधले त्याचे आणि त्याच्या मित्रांचे एक काळे गुपित काही लोकांच्या हाती लागते आणि ते काईलला जाळ्यात अडकवतात. वरवर चांगला वाटणारा, लॉच्या अनेक विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटणारा पण काईलला नको असणारा जॉब त्याला घ्यावा लागतो. एका मोठ्या फर्मचा असोसिएट बनण्याचे आमिष त्याला - दाखविले जाते. एका मोठ्या लॉ फर्ममध्ये तो जॉब स्वीकारतो. अमेरिकेसाठी एअरक्राफ्" बनविणाऱ्या कंपनीकरता ही फर्म काम करीत असते. आपल्या अस्तित्वासाठी काईलला परिस्थितीशी जबरदस्त झगडावे लागते. मोठ्या निग्रहाने सामना करावा लागतो. त्यात तो यशस्वी होतो का? हे या कादंबरीतच वाचायलाच हवे.
-
Antarbahya (अंतर्बाह्य )
मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणारया रत्नाकर मतकरी यांच्या गुढकथांचा ताजा संग्रह. भीतीच्या विविध स्वरूपांमधून मानवी मनाचे अथांग व्यापार शोधणाऱ्या आणि म्हणूनच मराठी कथा साहित्यात आढळपद मिळवणाऱ्या रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथांचा ताजा संग्रह .