-
Anandashram
जगात घडणार्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे. शरीर मनाच्या बिघाडासही मीच कारणीभूत आहे. हे सगळं दुरुस्त करायचं असेल तर, प्रत्येक गोष्टीची सुरुवातही मलाच करावी लागेल. अशी आहे ही आनंदाश्रमाची गोष्ट.
-
Shabdavrati Shantabai
अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असणा-या 'आपल्या' वाटणार-या प्रा. शांता शेळके, यांच्या वाड्मयीन कार्यकर्तुत्वाचा ललितरम्य शैलित घेतलेला हा आलेख. शांताबाईंच्या वाड्मयीन कर्तुत्वाबरोबरच त्यांच्या घरंदाज, शालीन व्यक्तीमत्वाचा आणि त्यांच्या प्रांजळ, निर्मळ वृत्तीचे, सुभग दर्शन घडवणारा!
-
Rutuvaibhav
वसंतॠतू ते शरदॠतू अशा सहाही ऋतूंमधले, सृष्टीच्या विविध आविष्कारांचे, पशुपक्ष्यांचे, नयनरम्य डोंगरद-याचे, निर्झरांचे... वर्णन. डोळ्यांचे पारणे फेडणा-या अशा सौंदर्याबरोबरच देश-विदेशातील कला, संगीतासह संस्कृती-संमेलनाचे चित्रदर्शी आरेखन म्हणजेच 'ॠतुवैभव!' निसर्गातल्या विविधतेने नटलेल्या, रंग-गंध-लय-ताल-नाद-स्पर्श या संवेदनाचं विश्व अमर्याद आहे. मन:पूत भटकंतीतून या निसर्गसौंदर्याचा रसिकमनाने घेतलेला हा आस्वाद वाचकांना मोहित तर करीलच, शिवाय पर्यटनालाही उद्युक्त करील.
-
Franklin Roozvelt
1928च्या त्या काळया गुरूवारी अमेरिकेतील शेअरबाजार साफ गडबडला, पार कोसळलाच! उद्योगधंदे ठप्प. बँका बंद. महामंदीचे सावट. प्रचंड बेकारीचे अरिष्ट. जनता पुरती हवालदिल.त्या अंधारलेल्या वातावरणात एका पोलियोग्रस्त नेत्याने देशाला दिलासा दिला. चाकोरीबाहेरचे नवे धोरण आखले. सर्व थरांतील बेकारांना हाताशी धरून त्याने असंख्य प्रकल्प उभारले. अर्थव्यवस्थेला चालना दिली आणि देशाचा कायापालट घडवला. एक संकट निवारले जाते आहे, तोच दुसरे महायुध्द समोर उभे ठाकले. तो डगमगला नाही. हुकुमशहांच्या विरोधात तो उभा ठाकला. त्यांचा नि:पात करून त्याने जागतिक शांततेचा पाया रचला. चार वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणारा तो एकमेव नेता ठरला.फ्रँकलिन डिलॅनो रूझवेल्ट हे त्याचे नाव. अमेरिकेचा तारणहार ठरलेल्या त्या जिद्दी नेत्याची ही यशोगाथा!
-
Yahi Hai Rangroop
सलीम खान, शमशाद बेगम, बी. आर.इशारा. नंदा, राजेंद्रनाथ, बसू चटर्जी, मन्सूरखान या मला आवडलेल्या सात प्रतिभावान व्यक्ती. या सरार्वांमध्ये मला एक समानता आढळून आले की सातही जण मनस्वी आणि स्वत:शी खूप प्रमाणिक आहेत. प्रत्येकाचं आयुष्य आगीतून पारखून निघालेलं. असं म्हणतात की हिरा कितीही जुना झाला तरी त्याचं तेज झोकाळत नाही. ही व्यक्तिमत्वंही तशीच आहेत. वाचकांनासुद्धा ती भोवतील अशीच आशा आहे.